माझे विडंबन गाणे

Submitted by विनायक.रानडे on 23 December, 2011 - 21:11

सर आले दुरुनी
गेल्या सगळ्या त्या मैतरणी ||

खुर्चीत उसासे सार्‍यांचे
होस्टेलमधिल त्या पोरांचे
कुजबुजही नव्हती पोरींची
धुसफुसही नव्हती कोणाची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी ||

वर्गात मनोरथ किति रचले
गालावर हासू पाघळले
काही हृदयातचि ते घुसले
बाणांतुनी स्पंदन जाणवले
झेली सुंदर मैत्रीण कुणी ||

प्रतिसाद सरांचा तो न कळे
अवसान परी का पूर्ण गळे
संधीच न मिळता पोरांचे
घबराट पुन्हा सर ते दिसले
चहाडी चुगली का केली कुणी ||

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे
गायक: विनायक रानडे
गाणे ऐकण्या करता हा दुवा - सर आले दुरुनी

तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीती का मनी !

खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !

सारे जरी ते तसेच संधी आज ती कुठे ?
मीही तोच, तीच तीही, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रू दोन लोचनी !

त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे
गायक: विनायक रानडे
गाणे ऐकण्या करता हा दुवा - तोच थंडगार भात

१८ डिसेंबर २०११ ला माझे स्नेही प्रमोद देव यांनी मला फोन केला व सांगितले की तूम्ही म्हटलेली हिंदी गाणी मी प्रसिद्ध करू शकणार नाही पण माझ्या जवळ दोन वाद्यवृंदाच्या ट्रॅक आहेत व तालात बसवलेले विडंबन काव्य आहे ते एम्पी ३ करून पाठवा ! मी ऑडॅसिटी प्रणालीत त्याचा प्रयत्न केला पण चांगले येत नव्हते. मग लॉजिक प्रो ची अ‍ॅपल मॅक प्रणाली वापरून माझ्या २४इंची आयमॅकने ही गाणी छान मुद्रीत केली व त्याला एमपी३ करून एक गाणे २० तारखेला व दुसरे २१ तारखेला त्यांना मेलने पाठवले. त्यांनी ते त्यांव्या शब्द गारवा ई मासिकात प्रसिद्ध केले. मला सतत प्रोत्साहन देउन प्रमोद देवांनी माझे लिखाण मराठीतून करायला मदत केली म्हणूनच मी माझा "विनायक उवाच" व त्याला जोडून ब्लॉग सुरु केले, त्यांचा मी आभारी आहे.

गुलमोहर: 

विजयकुमार देशपांडे यांच्या सुरचित शब्दांना सुरेख न्याय दिला आहेत. दोन्हीही गाणी आवडली.

विनायकराव,
गाण्यातून शब्द आणि भावना अभिव्यक्त करण्याचे आपले कसब वाखाणण्यासारखे आहे. त्याखातर आपले अभिनंदन आणि पुढील प्रकल्पांखातर हार्दिक शुभेच्छा!

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे
गायक: विनायक रानडे
दोघांनाही ___/\___
मजा आली खूप..... सासुबाईंना ओरीजनल गाण चालु आहे वाटल म्हणुन ऐकायला आल्या पण त्यांना कळेना काय गल्लत होतेय, विडंबन आहे समजल्यावर बराच वेळ हसत होत्या..... Happy