संदीप खरे यांची कविता आणि आजचे कटु सत्य

Submitted by hardikaranuja on 22 December, 2011 - 08:46

"इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय
एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय?

रोज करतेस वह्या पुस्तक ढीग ढीग गोळा
शिकणे म्हणजे रमणे नव्हे दमणे झाले बाळा
पंख असून पाखरु चाले घासत घासत पाय

पाठीवरती घेऊन अवघ्या भूगोलाचा भार
एक माणूस शास्त्रे आणि भाषा झाल्या फार
तुझ्यापेक्षा जड तुझे ज्ञान होऊन जाय

काय म्हणू थट्टा की हा आयुष्याचा दट्टा
नाजूक नाजूक फुलावरती पडतो आहे घट्टा
जगणे मागे रोजीरोटी वय साखरसाय"

संदीपने अगदी correct वर्णन केले आहे... त्याचा कुठ्लाच विचार नाकारण्यासारखा वाटत नाही. या कवितेच्या ओघाने आजच्या शिक्षणाबाबत थोडेसे बोलुया.....मराठी/इंग्रजी; ssc/cbsc/icsc; शाळेची वेळ आणि फी आणि यासर्वात मुलांची मानसिकता....

की आता शाळेला Homeschooling हा पर्याय योग्य ठरेल? तुमचा अभिप्राय हवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स, हेच जाणून घ्यायची ईच्छा आहे. पण Homeschooling आणि शालेय शिक्षणाचे फायदे तोटे आधी जाणून घ्यावे लागतील.

यावर आपले विचार वाचायला आवडेल.

आज प्रत्येक मुलाची वयाच्या साधारण दुसऱ्या वर्षापासून शाळा सुरु होते ते १५ वर्षांपर्यंत तो शालेय शिक्षण घेत असतो. जवळपास या तेरा वर्षांत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात किती होतो? "मज आवडते ही मनापासुनी शाळा" असे म्हणणारी मुलेही आता कमी झालेली आहेत. सध्याच्या ई-युगात खरोखरीच शाळा मुलांना काय देते?

शालेय जीवनात घेतलेल्या पुस्तकी ज्ञानाचा रोजच्या वापरात फार उपयोग होत नाही असं आपण म्हणतो.. पण त्या ज्ञानाबरोबर आपण इतर बर्‍याच गोष्टी शिकत असतो.... त्यांचा अवलंब मात्रं होतो. एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटे ही, त्यामुळे शाळेत जाणारं मुल आपण फक्त दप्तरांची ओझी वाहताना पाहतो. पण तिथे शाळेत त्या पाल्याचा दिवस कसा असतो, ते आपण रोज नाही पाहू शकत.. त्याचं मैदानावरचं बागडणं, डबा शेअर करणं, शिक्षकांची शाबासकी, एकत्रं केलेला विज्ञानाचा प्रयोग... या आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे शैक्षणिक जीवन आनंदी आणि हलकं होतं.
होम स्कूलिंग ही गोष्ट ही चांगली आहे, फायदा म्हणजे मुलावर ओझी उचलण्याचा बोजा नाही, शिक्षकांचं संपुर्ण लक्ष आपल्या एकट्या पाल्यावर. पण शाळेत होणार्‍या दंगामस्त्या, स्पर्धा, त्यामुळे वाढणारी चिकाटी या सर्व गोष्टींना पाल्य मुकेल. होम स्कुलिंग मध्ये एकलकोंडं होत जाणारं मुल उद्या नोकरीसाठी बाहेर पडलं तर कदाचित त्या वेळी बाहेरच्या स्पर्धेला किंवा राजकारणाला तोंड देणं त्याला अवघड जाईल. Sad

इथे शाळेसाठी गावातली सरकारी शाळा, खाजगी शाळा(धार्मिक संस्थेची किंवा खाजगी), होमस्कूलिंग असे तीन पर्याय आहेत. माझ्या मुलासाठी नवर्‍याच्या बॉसने होमस्कुलिंगचा पर्याय सुचवला होता, त्याची दोन्ही मुले होमस्कुल्ड होती. होमस्कूल करणार्‍या पालकांचा ग्रुप होता. त्यामुळे या मुलांना मित्र मैत्रिणी मिळायला अडचण पडायची नाही. तसेच गावातल्या सॉकर टिम, स्काऊट, 4-H, चर्चचा बायबल स्टडी ग्रुप वगैरे अ‍ॅक्टिव्हिटीतुन त्यांना गावातल्या शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांच्यात मिसळायची संधी मिळायची. वरच्या वर्गातली मुले काही विषय गावातल्या शाळेत तर काही घरी असेही करायची. माझ्या मुलाचे काही मित्र मैत्रिणी होमस्कूल्ड आहेत. अभ्यास, खेळ, समाजात मिळून मिसळून रहाणे, लिडरशिप, टीमस्पिरिट वगैरे बाबतीत ही मुले माझ्या मुलापेक्षा वेगळी नाहियेत.
होमस्कुलिंग ही लाइफस्टाइल आहे. यासाठी खूप कमिटमेंट लागते. एका पालकाने पूर्ण वेळ घरी रहाणे आवश्यक आहे. या घरी रहाणार्‍या आई/बाबांना मुलांना शिकवता आले पाहिजे. इथे पहिली काही वर्षे रिडिंग, रायटिंग, आणि अरिथमॅटिक अशा तीन 'R' वर भर असतो. तेव्हा एक युनिट घेऊन हे तिनही विषय एकमेकात गुंफत हसत खेळत शिकवावे लागते. दोन किंवा अधिक मुले असतील तर त्यांना काही वेळ एकत्र तर काही वेळ स्वतंत्रपणे वेळ देणे, त्यातच घरातील इतर कामे करणे वगैरे टाईममॅनेजमेंट जमवावी लागते. ग्रोसरी करताना एकिकडे मुलांना वाचन, गणित, कंझुमर सायन्स शिकवणे, बेकिंग करताना वाचन, मॅथ्स आणि केमिस्ट्री शिकवणे अशा प्रकारे रोजच्या कामातून शिकवायची कला अवगत असेल तर मुले हसत खेळत शिकतात. खूप पेशन्स लागतो. इथे बरेच पालक धार्मिक कारणासाठी होमस्कुलिंग करतात. तसेच मूल खूप बुद्धीमान आहे, खेळ किंवा गायन-वादन यात प्राविण्य मिळावायचे आहे, इतर काही समस्या जसे ऑटिझ्म किंवा ADHD आहेत वगैरे कारणासाठीही होमस्कुलिंग केले जाते.
आम्ही सर्व विचार करुन सुरुवातीला माझ्या मुलाला कॅथोलिक चर्चशी संलग्न असलेल्या प्रायवेट स्कूल मधे घातले होते. प्रीस्कूल आणि केजी तो तिथे खूप खूष होता. मात्र पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून १ली नंतर त्याने गावातल्या सरकारी शाळेत जायचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे ऐकून शाळा बदलतोय म्हणून बर्‍याच जणांनी तेव्हा भुवया उंचावल्या होत्या. पण आम्ही मुलाच्या मतांचा आदर केला. पुढील शैक्षणिक वर्षात त्याचा एकंदरीत नव्या शाळेबद्दलचा रिपोर्ट ऐकून अजून दो-तीन पालकांनी आपली मुले सरकारी शाळेत घातली. Happy

दक्षिणा, मैदानावरचं बागडणं, डबा शेअर करणं, शिक्षकांची शाबासकी, एकत्रं केलेला विज्ञानाचा प्रयोग... या सगळ्या गोष्टी एकदम मान्य... पण होम स्कूलिंग करणारी मुलं एकलकोंडी होत नाहीत.

होम स्कूलिंगमध्ये एक शिक्षक एकाच विद्यार्थ्याकडे देतो असे नाही. उलट पूर्वीप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी मुलाला आईवडिलांनी देणे (प्राथमिक पातळीवर) अपेक्षित असते. त्याव्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त मुलांना नवनवीन प्रात्यक्षिक गोष्टींची ओळख करुन देणे, आणि आपल्या मुलांचा कल जाणून त्या क्षेत्राशी निगडीत त्याला अधिकाधिक ज्ञान देणे... ते क्षेत्र कोणतेही असो, आणि जिथे जिथे होमस्कूलिंग करणारी मुले इतर चार भिन्न गोष्टी शिकायला जातात, उदा. स्विमिंग, म्युझिक.... तिथे तिथे आपल्या वयाप्रमाणे मित्र-मैत्रिणी शोधतात. NIOS सारख्या संस्थांमधून अशी मुले वयाच्या चौदाव्या वर्षी दहावी देऊ शकतात आणि कोणत्याही महाविद्यालयात त्यांना प्रवेशही मिळतो.

यामागची भूमिका एकच - आजच्या मुलांचे बाल्य अभ्यासाच्या ताणाखाली हरवायला नको. लाख-दीडलाख फी पालकांनी केवळ शालेय जीवनाकरिता द्यायची पण आपली मुलं मात्र कोमेजून जाणार असे व्हायला नको.

स्वाती२ ने मुलांच्या बाबत घेतलेला निर्णय आवडला. अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्वांगीण विकास, मैदानी खेळ (अगदी बारावीपर्यंत) ते आवश्यक असतात यांसाठी वेळ मिळाला पाहिजे... घडय़ाळ्याच्या काट्यांसारखी मुले रात्रंदिवस चाकोरीबद्ध फिरु नयेत.