Submitted by बेफ़िकीर on 20 December, 2011 - 01:08
गर्दीचे वाहत जाणेही स्तब्ध वाटते आताशा
कोसळ येथे सूर्यउबेने पेंगुळलेल्या आकाशा
विस्फोटाची निर्जिवतेच्या अंतरातली निकड पहा
सृष्टीच्या या सर्वांगाची कोसळणारी दरड पहा
खंडकाव्य रचताना त्याचा होत असावा वग येथे
ओघळलेल्या वीर्यामधुनी जन्म घेतसे जग येथे
दैवाचे स्तन कुस्करणार्या इतिहासाला चौतिस गुण
चौकांमध्ये कबूतरांनी शिटल्या पुतळ्यांची भुणभुण
एक निरागस बाळ मिळो जे अवलंबुन बस माझ्यावर
वय वाढो पण देह न वाढो जगुदे केवळ प्रेमावर
मर्दालाही पान्हा फुटुदे मानवतेचा आकाशा
नसेल जर हे जमत तुला तर जा तू गुंडाळुन गाशा
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
छान कविता!
छान कविता!
Pages