एक मैफिल छानशी - कविता वाचन

Submitted by Kiran.. on 16 December, 2011 - 10:43

नमस्कार मित्रांनो

ऑनलाईन मैफिलीची ही संकल्पना इथं काहीजणांकडे बोलून दाखवली होती. सकारात्मक प्रतिसादामुळे हा बाफ आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय मैफिल अपूर्ण राहणार हे सांगणे न लगे.

मित्रमैत्रिणींनो..
प्रमोद काकांचा उत्साह घ्या.. आणि माईक घेऊन कामाला लागा बरं.. तुम्हाला आवडेल त्या फॉर्म मधे अपलोड करा आणि लिंक मात्र इथे द्या. एकाच पोस्टमधे लिंक आणि मूळ कविताही दिली तर अतिउत्तम !!

करायची सुरूवात ?

गुलमोहर: 

बहुतेक सर्वांचं कविता गायन ऐकलं. खूपच चांगलं गातात इथे सर्वजण.
(गाणं न येणारा बहुदा मी एकटाच असेन असं वाटतं.)
फक्त ’चातक’ आणि ’उदय’ यांच्या कविता Format problem मुळे ऐकता आल्या नाहीत.
यावर कोणीतरी सोपा उपाय शोधायला हवा.

तसंच मायबोलीवर आपल्याला चित्र/फोटो ’खाजगी जागा’ या सदरात सेव्ह करता येतात त्याप्रमाणे
ऑडियो फाइल देखील सेव्ह करता येणं आणि ’मायबोली’ च्या माध्यमातूनच ऑडियो फाइल ऐकणं ही सोय ऍडमिन यांनी उपलब्ध करून द्यावी अशी त्यांना सर्वांनी विनंती केली पाहिजे असं वाटतं.

उपक्रम छान आहे.
जमल्यास मी माझ्या एखाद्या कवितेचं वाचन इथे सादर करेन.

http://www.divshare.com/download/16449166-96f
http://www.divshare.com/download/16449146-678
स्वर आले दुरुनी...आणि...तोच चंद्रमा नभात..ह्या दोन्ही गाजलेल्या गीतांची ही विडंबनं केलेत विजयकुमार देशपांडे ह्यांनी ...आणि मी ती मूळ चालीतच गायचा प्रयत्न केलाय.
शब्दगाऽऽरवा ह्या हिवाळी अंकात हीच गीतं विनायक रानड्यांच्या आवाजात आपल्याला ऐकता येतील.

सगळ्यांचे प्रयत्न छान आहेत.
देव काकांच्या प्रयत्नांना दाद द्याविशी वाटते. शेवटच्या पोस्टमधले गीत आता ऐकीन..

मी वळूनी हासलेया गझलेतले तीन चार शेर चाल लावून गायचा हा प्रयत्न.
http://www.4shared.com/mp3/5CFheIVr/mi_valuni_mp3.html

ऐकू शकलात तर पहा ( काही झालं तर जबाबदारी नाही घेत Happy )

मूळ गझल इथे ...वाचा Happy
http://www.maayboli.com/node/21473

संध्या...
देवकाकांनी सुचवल्याप्रमाणे इतर संगीताचा आवाज शक्यतो ठेवूच नका....

शुभेच्छा Happy

देव काका
तुमची रस्ता कवितेची चाल ऐकली आताच. ब्लॉगवर जाऊन आलो. सावरकरांवर दामोदरसुत आणि त्यांच्या नातवाने केलेले वाचन ऐकले. मी यावर सविस्तर लिहीनच आल्यावर.. सध्या गडबडीत आहे.

देवकाका, दोन्ही विडंबनं झक्कास!!!! तुमचा आवाज छान आहे. इतर गाण्यांच्या चाली मजेशीर असल्याने तुमचा खरा आवाज समजण्यात अडथळा येत होता. खुपच छान गाता तुम्ही! ते म्युझिक पीसेस तुम्ही स्वतः वाजवले आहेत का? क्लास!!!! Happy

ए संध्या, तुझा मूळ आवाज कसा आहे हे तू जी काही रेकॉर्डिंग सिस्टिम वापरत आहेस, त्यामुळे समजतच नाहीये. पीसी/ लॅपटॉपवरुन प्लिज रेकॉर्ड करशील का? काहीतरी वेगळ्याच पद्धतीने तुझा आवाज रेकॉर्ड होतोय गं... प्लीजच वाईट वाटून घेऊ नकोस! तुझ्या दरवेळीच्या प्रोत्साहनामुळे आणि मनापासून वापरलेले कौतुकाचे शब्द, दाद यामुळे मला पुन्हा पुन्हा इकडे यायची, रेकॉर्ड करायची इच्छा झाली, यासाठी मी तुझी सदैव ऋणी राहीन! Happy

बाकी विशालभौ, चातक, विदिपा, तुम्ही परत कधी पुढच्या कविता अपलोड करणार आहात? उकाकांनी सहभाग देण्याचे ठरवले होते, ते कधी येणार परत? किरण, तू ही आपल्या धाग्याला विसरलास की काय? तुझे पुढचे गीत/ काव्यवाचन कधी येणार?

Pages