एक मैफिल छानशी - कविता वाचन

Submitted by Kiran.. on 16 December, 2011 - 10:43

नमस्कार मित्रांनो

ऑनलाईन मैफिलीची ही संकल्पना इथं काहीजणांकडे बोलून दाखवली होती. सकारात्मक प्रतिसादामुळे हा बाफ आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय मैफिल अपूर्ण राहणार हे सांगणे न लगे.

मित्रमैत्रिणींनो..
प्रमोद काकांचा उत्साह घ्या.. आणि माईक घेऊन कामाला लागा बरं.. तुम्हाला आवडेल त्या फॉर्म मधे अपलोड करा आणि लिंक मात्र इथे द्या. एकाच पोस्टमधे लिंक आणि मूळ कविताही दिली तर अतिउत्तम !!

करायची सुरूवात ?

गुलमोहर: 

Happy हे गाणं ऐकायला फारच सोप्पं वाटतं आणि संदिपच्या आवाजात ऐकल्यावर तर वाटतं, कोणीही म्हणू शकेल. पण गातांना समजलं, श्वासाच्या दृष्टीने बरंच अवघड आहे ते. तुझ्याच कवितेच्या शब्दात सांगायचं तर जाणवतं... "मोजके श्वास उरले, संपले तरीही न गाणे" Proud (विडंबन ह. घेशीलच... Happy )

मित्रहो,

माझ्या अलिकडच्या "संधी" ह्या गझलेचा मतला रेकॉर्ड केला आहे. चाल माझीच आहे, आवडल्यास कळवा...न आवडल्यासही.

http://www.4shared.com/mp3/mQBrFxSO/Sandhee.html

धन्यवाद!

विदिपा, क्लास!!!! Happy कसलं सही गायलंय. खुपच मस्त पोत आहे तुमच्या आवाजाचा. कणखर तरीही त्यात एक प्रकारचा गोडवा आहे... गझल ही ऐकायलाच जास्त छान वाटते, हे आज पुन्हा एकदा पटलं! (बेफिजींची ऐकली, तेंव्हा पहिल्यांदा पटलं होतं...)

विदिपा 'संधी'चं सोनं केलंत तुम्ही खुपच छान आहे चाल.....आणि आवाज ही... Happy

सानेSSssचुटुकले... क्काय ग्गोड आवाज आहे गं तुझा 000203FB[1].gif

बाकीच्यांचे अजुन एकले नाहीयत...एकतोय...

अरे हो...या धाग्यासाठी माझ्या स्वतःचे आभार मानायचे राहुन गेले...धन्स 'किरण' ... Proud

मित्रांनो
मला इतके फोन कॉल्स आले या धाग्याबद्दल कि राहवलं नाही रे..
हळूच बाहेर येऊन नेट कॅफेत शिरलो आणि सगळ्यांचे आवाज ऐकले.

तुम्ही सर्वांनी या मैफिलीत जे रंग भरलेत ना त्याला तोड नाही. सगळ्यांना सविस्तर अभिप्राय देतोच देतो
पण विदिपा आणि सानी
तुम्ही मला आश्चर्यचकित केलेत Happy

जिओ दोस्त !

विशाल, देव काका, चातका , संध्या अरे मस्तच रे सगळे जण !!

विदिपा

राहवलं नाही म्हणून जाता जाता

ऐकताना गीत तुमचे लोटांगण घालायचे आहे !

क्या बात ! काय आवाज

गावात पाटीलकी केली असती तर एका आवाजात गाव गपगार पडला असता Proud

साने
खरी कमाल तर तू केलीस..
माझ्याकडून तुला २४ पैकी २४ गुण Biggrin

- किरण

जियो विजयशेठ! काय मस्त आवाज आहे तुमचा.
मला तुमचा इमेल-पत्ता द्या..तुम्हाला एक चाल आणि गाणं पाठवतो...तुमच्या आवाजात ऐकायला मस्त वाटेल ते.

सानी,तू छानच गातेस गं...थोडा रियाज कर म्हणजे दमसास वाढेल...बाकी गाणं आणि आवाज मस्तच.
http://www.4shared.com/mp3/v8OmGb7i/Kase_Saratil_Saye.html हे तुझंच गाणं..जरा आवाज वाढवून पाठवतोय.

अरे वा देव काका! आता आवाज अगदी व्यवस्थित मोठा येतोय... अनेक आभार Happy

रियाजाचे लक्षात ठेवीन...

सर्वांचेच आभार Happy

थोडा रियाज करुन आणि योग्य पद्धतीने श्वासावर लक्ष ठेऊन केलेला हा दुसरा प्रयत्न. Happy
पुन्हा संदिप खरेचीच... माझी अतिशयच आवडती कविता - एवढंच ना?

गाण्याचे शब्दः
एवढंच ना? एकटे जगू!
एवढंच ना?
आमचं हसं, आमचं रडं
ठेवून समोर एकटेच बघू..
एवढंच ना?

रात्रीला कोण, दुपारला कोण
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण
दिवसाला दिवस जोडत जगू
एवढंच ना?

अंगणाला कुंपण होतंच कधी
घराला अंगण होतंच कधी
घराचे भास अंगणाचे भास
कुंपणाचे भासच भोगत जगू
एवढंच ना?

आलात तर आलात, तुमचेच पाय
गेलात तर गेलात, कुणाला काय
स्वत:च पाय स्वत:च वाट
स्वत:च सोबत होऊन जगू
एवढंच ना?

मातीचं घर, मातीचं दार
मातीच घर मातीच दार
मातीच्या देहाला मातीचे वार
मातीच खरी मातीच बरी
मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना?

विदिपा

किती सुंदर गाता तुम्ही !!
आवाजही खासच.. वेगळा आणि भारदस्त Happy

सानी
ग्रेट !!
तुझ्या रूपाने आणखी एक चांगली कलाकार मिळाली.
देव काका.. सानी कडून गाणी गाउन घेता येतील.. नाही का ?
( मा़झ्या गझला गाण्यासाठी म्हस्का मारावा लागणार आता तुला Happy )

काका
डाऊनलोड केली फाईल. पण कुठल्या मेडियात प्ले करायची आता ? विंडोज मेडीया प्लेयर, प्रिझम, टोटल व्हिडीओ, जेट, रेअल प्लेयर सगळेच पाहीले ट्राय करून....

विदिपांच्या 'संधी' चे सोने करण्याचा माझाही एक प्रयत्न. (आता ते सोने आहे की पितळ, ते तुम्हीच ठरवा. Proud )

भांडतांना ह्या पुढे माणूसकी ठेवायची आहे
एकदा बोलायची संधी तुलाही द्यायची आहे

देवकाका मी पाहीलंय. आवडलं मला.

सानी..
खरंच सुंदर गं.. गाणं शिकलीस का ?
पण पुन्हा डालो !! (एमपीथ्री कन्व्हर्ट कर ना )

खुप धन्यवाद! संध्या Happy
मला नाही गं माहिती कसं कन्वर्ट करायचं ते...
गाणं नाही शिकले. सुरुवात केली होती, पण परिक्षेपर्यंत जाण्याआधीच थांबले ते.

देवकाका, विकुचे काव्यवाचन, मूळ कविता आणि नचिकेत जोशीचे काव्यवाचन, सगळेच मस्त! Happy

Pages