Submitted by deepak_pawar on 15 December, 2011 - 09:16
फ़ुललेली ती हिरवी झाडे
सुगंध पेरीत वाहणारे वारे
मोटार गाड्यांच्या धूरातून
हरवून गेले आता सारे
झुळझुळणारी एक नदी
कधी इथेही नांदत होती
आज तिला दृष्ट लागूनी
गटार बनूनी वाह्त होती
भकास झाले डोंगर माथे
भकास दिसती रानमळे
झाडावरती घाव घालता
दूर चालले पावसाळे
विज्ञानाच्या वाटेवरती
एक मात्र कळले आता
घेता घेता शोध सुखाचा
प्रदूषणाच्या आल्या लाटा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आत्ताच्या परिस्तितीच योग्य
आत्ताच्या परिस्तितीच योग्य वर्णन.
छान आहे.
विज्ञानाने केली
विज्ञानाने केली म्हणे
निसर्गावर मात
एकदा भुमी कंपली आणि
झाली सर्व वाताहात.
घेता घेता शोध
घेता घेता शोध सुखाचा
प्रदूषणाच्या आल्या लाटा >>> ह्म्म्म्म खरं आहे.
घेता घेता शोध सुखाचा
घेता घेता शोध सुखाचा
प्रदूषणाच्या आल्या लाटा
माणसाचे एका दिशेचे प्रयत्न व दुसर्या दिशेचे परिणाम बरोबर व्यक्त होतायत.
विभाग्रजसाहेब, Ulhasसाहेब,
विभाग्रजसाहेब, Ulhasसाहेब, Pradyumnaसाहेब सर्वांचे मनापासून धन्यवाद.