३१ डिसेंबर कसा साजरा करणार आहात ?

Submitted by उदयन. on 14 December, 2011 - 06:27

मित्रांनो आनंदाची बातमी आहे...............................
यंदाची ३१ तारीख शनिवारी आलेली आहे.................
त्यामुळे मज्जा जरा जास्त वेळ होऊ शकेल............... Happy

मी ३१ ला घरीच असतो.. रात्रीचे १२ वाजता देवपुजा करतो ( नंतर वर्षभर करत नाही ) आणि टीव्ही वरचे कार्यक्रम बघत बघत झोपतो.. Happy
माझ्यामते वर्षाचा पहिला दिवस तरी लवकर आणि शुध्दीत उजडावा......
२-३ तारखेला काय ते सेलेब्रेशन जोरात मग...... तसे वर्षभर असतेच म्हणा. Happy

कोण कोण कश्या पध्दती ने साजरी करणार आहेत.....?
कुणाचा अनोखा कार्यक्रम असेल तर कृपया वाटुन घेवु या का........ ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हॅरी पॉटरचा ७वा भाग वाचणार आहे आणि त्यातुन वेळ मिळाला तर १ते५ हॅपॉ मूव्हीज बघणार आहे...>>>>>> अरे देवा.....बिचारा हॅरी....... त्याचे पुढील वर्ष कसे जाणार याचीच चिंता लागली आता Happy

मी वाट च बघत होते कुणी तरी यावर विचारावं.... मला ३०, ३१, १ तिन्ही दिवस सुट्टी आहे काय करावं काही सुचत नाहीए? नवर्‍याबरोबर कुठेतरी बाहेर जाव असं वाटतयं पण .. प्लीज सुचवा.. Happy

मला ३०, ३१, १ तिन्ही दिवस सुट्टी आहे काय करावं काही सुचत नाहीए?>>>>> यांना सुट्या असुन सुचत नाही आहे.... Sad

आम्हाला सुट्य्या नसुन ही खुप काही सुचत आहे. Happy

चिमुरी -------- कठीण तुझ Happy Happy Happy

आम्ही पण करतोय कार्यक्रम काही तरी मस्त .... तन्बुत रहायला जाउन मजा करु सगळे जण असा बेत आहे ...पाहु काय कस होत ते ....तुम्हा सगळ्याना आग्रहाचे आमत्रण . या सगळे ...... Happy Happy Happy

मी झोप / टिव्ही / फिरायला जाणे / वाचन करणे वगैरे करेन. म्हणजे इतर कुठल्याही वारी करेन तेच.
हे काही माझे नवीन वर्ष नाहि. मग मी कशाला प्लॅनिंग करु?

" ३१ डिसेंबर हा भारतीय (हिंन्दु) कँलेन्डर नुसार नवीन वर्ष नाहि आहे " ... यावरून वाद सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही
Light 1 घ्या.......

लोक्स
आपण सेलिब्रेशन पण करूयात नक्कीच..
मला माहीत नाही इथं लिहावं कि नाही ते..
पण पुण्यात श्री व सौ बडवे यांची निवांत ही संस्था आहे टिंगरेनगरला. अंध मुलांना स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवतात..

या मुलांना पण आनंद होईल असं काहीतरी करता आलं तर..

....

उदयवन

थँक्स.. मी सुचवणार नाही नेमकं Happy

पण माहीती द्यावी या उद्देशाने सांगावसं वाटतं. ही मुलं स्वतःच्या पायांवर उभी राहताहेत. त्यांना त्या दृष्टीने घडवलं जातं. इथंल मुलं चॉकलेटस बनवतात.. ती परदेशात मिळणा-या चॉकलेटसपेक्षाही छान आहेत. ग्रीटिंग्ज, लिफाफे , स्टेशनरी अशा ब-याचशा गोष्टी इथं बनतात..

चांगल्या पुस्तकांचे ब्रेललिपीत प्रकाशन केले जाते. ब्रेल रूपांतरणही ही मुलंच करतात. तुमचं एखादं प्रकाशित झालेलं पुस्तक मीराताईंना आवडलं तर त्याचं ब्रेलरूपांतरण केलं जाईल. जर तुम्ही त्या ब्रेलरूपांतरणाचा कौतुक सोहळा आयोजित केलात आणि प्रसिद्धी मिळवून दिलीत तर या संस्थेची जाहिरातही होते..

http://www.niwantvision.com/

आपल्या पार्टीला लागणा-या वस्तू आपण कुठून तर खरेदी करणारच असणारै ..त्याच इथून घेतल्या तर !! मुद्दामून काही करण्यापेक्षा हे सहज घडून येइल असं वाटतं.

Best way to celebrate 31st Dec is to b at UR home and relax..

ख्रिस्तीनववर्षाचे स्वागतासाठी मी विशेष काही करावे असे असतच नाही. त्यात नाही देवपूजा, नाही दानधर्म, नाही सणसूद, काही काही असत नाही. फक्त हॉटेलात जाऊन (वा घरातच) मदिराप्राशन अन मांसाहार याला "साजरे करणे" म्हणावे तर ते देखिल आमच्या पद्धतीत बसत नाही. अन उगाचच शेकडो लोक रस्त्यावर उतरुन रात्री बारा वाजता धिन्गाणा घालतात म्हणून आपणही घालावा हे आमच्या पठडीत बसत नाही.

त्यातुन मी २५ डिसेम्बर, ३१ डिसेम्बर या दिवशी सन्ध्याकाळनन्तर अज्जिबात घराबाहेर पडत नाही.
राजरोसपणे पिऊन तर्र झालेल्या लोकान्च्या गाड्यान्खाली सापडायची माझी इच्छा नाही.

तर, आत्ताच्या बेताप्रमाणे तरी, ख्रिस्तीनववर्षाचे स्वागताकरीता, आमचे पद्धतीप्रमाणे ३१ डिसेम्बरला मी कसलीतरी झणझणीत सणसणीत रस्साभाजी करणार, मग ती पावाबरोबर/भाताबरोबर खायची की पोळी/पुर्‍या करायच्या ते लिम्बी ठरवेल. ३१ला मला सुट्टी नाही (पाचवा शनिवार Sad ) त्यामुळे ऑफिसमधुन घरी गेल्यावर भाज्या निवडणे/चिरणे, मसाले तळणे/कुटणे वगैरे साग्रसन्गित प्रकार रात्री दहा पर्यन्त तरी चालतील, तोवर सगळे जण टीव्हीसमोर बाल्कनीत्/पिटांत बसलेले असतील. मग टीव्हीसमोरच सामुहिक भोजन, पुन्हा टीव्ही, बारा वाजले की लोकान्नी उडविलेल्या फटाक्यान्ची रोषणाई नि पैशाचा धुर अनुभवत साडेबारा/एक पर्यन्त (टीव्हीवर काय कार्यक्रम असेल त्यानुसार) झोपायला जाणे. बाकि लोक टीव्ही बघतच बसणार असतील तर मी कपाळाला अमृतान्जन चोपडून वर जाड टर्किश टॉवेल गुन्डाळून कानात कापसाचे बोळे किन्वा खोबरेलतेल घालुन झोपी जाणार Happy

I will b at home with family.
Something different....

>>>...

यात काय वेगळे. ही फक्त चुक दुरुस्त झाली .हे तर फार पुर्वीच करायास पाहिजे होते.

यात काय वेगळे. ही फक्त चुक दुरुस्त झाली .हे तर फार पुर्वीच करायास पाहिजे होते.

>>>> ही चुक नाही.....जरासा बदल... Happy

Pages