Submitted by A M I T on 14 December, 2011 - 04:24
जाहल्या काही चुका अन् दूर काही वाजले
तू दिलेले ते पराठे सवडीने चावले
बायकोच्या घोरण्यातच रात्र सारी संपली
पहाटे अंगावरी मग बादलीही ओतली
मी फटीतून चादरीच्या जुलूम सारे पाहीले
घर माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या यातना
रंग भाळावर निळे अन् जीवघेण्या वेदना
तू असे का लाटण्याने कपाळ माझे भेदीले?
संपता पगार माझा, सांग तू चिडशील का?
घेतली ना पैठणी जर, सांग तू रूसशील का?
हट्ट सारे पुरवण्या मी घाम माझे गाळले
* * *
गुलमोहर:
शेअर करा
अविवाहीत असताना वैवाहीक
अविवाहीत असताना वैवाहीक आयुष्यातील इतक्या सूक्ष्म खाचाखोचा सातत्याने जगासमोर आणण्याचे तुमचे कसब अफाट आहे. त्याला वंदन!
रंग भाळावर निळे अन् जीवघेण्या वेदना
तू असे का लाटण्याने कपाळ माझे भेदीले?>>>
अमित इज बॅक, विथ बँग ऑफ लाटणं
अमित इज बॅक, विथ बँग ऑफ लाटणं हेन्स निळं टेंगुळ ऑन कप्पाळ
लई हसवलंस मित्रा
बेस्टच
बेस्टच
बागेश्री
बागेश्री
(No subject)
(No subject)
नेहमीसारखंच मजेदार
नेहमीसारखंच मजेदार
अम्या, तुला अशी प्रेमळ,
अम्या, तुला अशी प्रेमळ, मनमिळावू बायको मिळो ही त्या श्रीच्या चरणी प्रार्थना !
अमित, बायको, अन लाटणे. कोणीच
अमित, बायको, अन लाटणे.
कोणीच कोणाची साथ सोडत नाही.
चांगलं जमलंय पण मिटरात गंडलंय
चांगलं जमलंय पण मिटरात गंडलंय काय गड्या जरा?
आलं लाटणं परत!!
आलं लाटणं परत!!:फिदी:
अमित अस्सच लिहित रहा आणि
अमित अस्सच लिहित रहा आणि मनाची तयारी भक्कम करत रहा
एक ना एक दिवस तुला सामोरं जावच लागेल. तुला त्या क्षणासाठी बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खुपच छान!
खुपच छान!
अमित अस्सच लिहित रहा आणि
अमित अस्सच लिहित रहा आणि मनाची तयारी भक्कम करत रहा
>> अरे पण हा अतिरेकी तयारी करून बसलाय, तेचढी गरज नाहीये
अम्या पुढची कविता लिही:
पोळ्या नकोत पण लाटणं आवर!!
झक्कास.
झक्कास.
जरा मिटर बघा मालक, दक्षिणा
जरा मिटर बघा मालक, दक्षिणा म्हटल्याप्रमाणे.
आभार
आभार