ती :
मला डायबेटिस होईल बरं का सुखाचा
तू असा रे कसा
न सांगता सगळं कळतं तुला
माझं मन कळतं..
दुखलं खुपलं..व्यक्त अव्यक्त
नेत्रपल्लवी, मौनाचे इशारे
क्षितिजावरची लाली
मृगचाहुली..
माझा हेवा करतात रे सगळ्याजणी
पण मी म्हणते ..
मी आकाशवेडी !!
आकाश मुठ्ठीत आलंय माझ्या
सगळ्यांचं नशीब माझ्यासारखंच असावं..
या बाबतीत ..
नशीब..!!
खरंच नशीब लागतं नै ?
तुझ्यासारखा जोडीदार मिळायला !!
-------------------------
काय करतोस रे आत्ता या वेळेला?
रात्र झालीये ..
बाळ रडतंय
त्याच्या जन्मापासून तूच करतोयेस ..
बाळाचं सर्वकाही
मला त्रास होऊ नये.. म्हणून !!
असाच रात्रीचा उठून दूध गरम करतोस
बाळाची आईच झालाहेस
तब्येतीकडे लक्ष दे रे..
दिवसभर राबतोस
काळजी वाटते रे
------------------------
सॉरी रे
मी पडून राहते ना हल्ली
माफ कर मला
खूप असहाय्य वाटतं..
मला अशी पाहून डोळ्यातलं पाणी लपवत येतोस मला हसवायला
मला पण अॅक्टिंग करावी लागते मग
तुझं शीक्रेट न कळल्याची
तुला चांगली ओळखते मी
महाबळेश्वरहून येतांना थंडीत मला त्रास झालेला तेव्हां
तुझ्या अंगातलं स्वेटर मला घातलंस..
आणि हेल्मेटही
आणि स्वतः आजारी पडलास..
आणि जराही कुरकुर नाही
आपल्या बाळाचं सगळं करतोस
जगात सगळ्या आया करतात रे
सुरूवातीला सवय नसते तेव्हां..
नाही म्हटलं तरी तोंड वाकडं होतंच
स्वतःच्या बाळाचं करतानाही
नवरेपणाचा हेवा वाटतो बायकांना
मला त्या बायकांचा हेवा वाटतोय..
----------------------------------------
काय बघतोस ?
माझा चेहरा ?
या आठवणी वाचतोहेस सगळ्या !!
तसाच हसरा आहेस अजून
अरे पण
तुझ्या डोळ्यांत अश्रू !!
सवय नाही रे राजा
बाळ उठलं का रे
अरे ऐकतोहेस का ?
=======================
तो :
"माझा राजा बछडा..
शोना.. बाबाचं ऐकायचं
चला
रडायचं नाही आज शोन्या
ते बघ...
आई विचारतेय बाळ उठलं का
शोन्या
चल बाळा ..
आईचा हैप्पी टू यू आहे ना आज
बोट बुडवा कुंकवात...
इथं..
इथं...लाव बाळा बोट
आईच्या फोटोला.....
आणि
हात जोडा तिला !!!
नाही रे शोन्या
बाबा नाही रडत ..
अगं...
आय अॅम सॉरी..
हरलोय आज..
किती भाबडी गं तू..
माझ्या काळजीने आजही अडकून पडलीयेस माझ्यात
सगळं तर बोलत असतेस फोटोतून
मी मात्र मोकळा झालो असतो
तुझं माझ्यात असं विरघळून जाणं
नसतंच जमलं ..!
अधुरा आहे गं..खूप अधुरा
तुझ्याशिवाय..
आय अॅम सॉरी गं...!!
तुझ्या बाळाने आज बाबाला रडताना पाह्यलं..
पण आज रडून घेऊ दे सगळं ..एकदाच !
- Kiran
लिहिली तेव्हां विचित्र
लिहिली तेव्हां विचित्र मनःस्थिती होती... जमली नव्हती !
आता किंचित बदल केलेत ...
Oops ! ती आजारी आहे आणि काही
Oops ! ती आजारी आहे आणि काही होइल तिला, ही धाकधुक वाटेपर्यंत ती फोटोत.
छान लिहिलं आहेस, पण तुम्ही सगळी लेखक लोक आम्हाला दु:खी का करता रे? तु चैत्रात..... नंतर मला परत एकदा सुन्न केलंस.
किरणः मनाचा थरकाप करणारी
किरणः मनाचा थरकाप करणारी कविता केली आहे तुम्ही. मी कशीबशी एकदा वाचू शकलो. काही काही ओळी सोडून दिल्या व भानावर आल्यावर पुन्हा वाचल्या. मनस्वी अनुभव इतकेच म्हणू शकतो.
छान लिहिलीय..
छान लिहिलीय..
मनाला स्पर्शून गेलं हे स्फुट
मनाला स्पर्शून गेलं हे स्फुट .....
स्वत:च्या बाळासाठी पुरुषाचं आई होणं .... हृदयस्पर्शी
खुपच भावस्पर्शी कविता, मन
खुपच भावस्पर्शी कविता, मन हेलावून टाकणारी.
आवडली कविता.
आवडली कविता.
>>पण तुम्ही सगळी लेखक लोक
>>पण तुम्ही सगळी लेखक लोक आम्हाला दु:खी का करता रे?
अनुमोदन. सुंदर लिहीलंयस रे!!!
स्पीचलेस.
स्पीचलेस.
(No subject)
किती सुंदर लिहीलय.. म्हणजे
किती सुंदर लिहीलय..
म्हणजे मनाला सुंदरही वाटतय आणि तरिही दु:ख होतय..
ekadam hRudayasparshee !
ekadam hRudayasparshee !
(No subject)
सुन्न,खिन्नं करणारी..
सुन्न,खिन्नं करणारी..
आवडली कविता.
आवडली कविता.
वर्षू नील | 14 December, 2011
वर्षू नील | 14 December, 2011 - 10:48 नवीन
सुन्न,खिन्नं करणारी.. >>>>>>
अनुमोदन
आवडली असे नाही म्हणता येणार
धन्यवाद मित्रांनो.. हे स्फुट
धन्यवाद मित्रांनो..
हे स्फुट लिहीलं तेव्हां एक वाइत बातमी कळालेली... आता कदाचित छान लिहू शकलो असतो
२र्या प्रयत्नातही
२र्या प्रयत्नातही पुर्णपणे... नाही वाचता आली...

बापरे :(
बापरे

(No subject)
स्पीचलेस. हेच बरोबर.
स्पीचलेस. हेच बरोबर.
ओह!
ओह!
काय वाटलं वाचुन ते शब्दात
काय वाटलं वाचुन ते शब्दात नाही सांगता येणार.... अस्वस्थ करुन गेली मनाला
एक आर्त कविता
एक आर्त कविता
(No subject)
खुपच छान
खुपच छान
(No subject)
किरण्या, हा तुच आहेस
किरण्या, हा तुच आहेस ?
नि:शब्द झालो मित्रा !!!
(No subject)
कविता नाही आवडली ...तिने
कविता नाही आवडली ...तिने डोळ्यात पाणी आणले.......
Pages