मुलांमध्ये iron n calcium न vitamin d deficiency

Submitted by तनू on 13 December, 2011 - 00:36

माझा मुलगा सव्वा वर्षा चा आहे, काल त्याला doc कडे नेल होत तर त्यानि iron n calcium deficiency सांगितल आहे, त्यासाठी औषध पन दिली आहेत. पण आहारातुन iron n calcium n vitamin d level वाढवण्यासाठी काय देता येइल??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोह साठी : पालक व गाजर, सूप किंवा पराठे करून. त्याला पोपॉय कार्टून दाखवत पालकाची गोडी निर्माण करता येइल.

कॅल्शिअम साठी दूध, चीज. एक गोळी मिळते लहान मुलांची गंमतशीर पॅकेज मध्ये असते.
बाकी शोधून सांगते.

नाचणी सत्त्व : दर १०० ग्राम नाचणीमधून ३५० मिलीग्राम कॅल्शियम मिळते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात मुलाला नाचणीसत्त्व भरवत बसा म्हणजे दोघांनाही व्हिटॅमिन डी मिळेल.

कॅल्शियमसाठी सीताफळ खा. आयरनसाठी सफरचंद.

लोहासाठी पालेभाज्या बिडाच्या तव्यात परतून करा.

हल्ली टॉनिक आणि ड्रॉप मिळतात . डॉ. नी दिले असनारच. . Happy

सन्तुलित आहार महत्वाचा - हे नको ते नको असे तुम्ही म्हणू नका आणि मुलासमोर तुम्ही सर्व पदार्थ आवदीने खा.

दूध, दही, चीज, पनीर - पण अति नको (पोट बिघड्ते)

भाज्या -
१) भेन्डी, अळू, शेवगा, भोपळा, विविध शेन्गा भाज्या, आणि इतर पालेभाज्या बिडाच्या कढईत शिजवून (लोहासाठी)
२) ब्रोकोली, केल, आणी तत्सम पाशात्य हिरव्या पालेभाज्या
3) Note - Spinach is average like other leafy vegetable in terms on calcium content.

वेगवेगळ्या डाळी, रागि, नाचणी, जवस, कारळे, तीळ, विविध प्रकारचा सुका मेवा (सुका मेवा मुलाना दात आलयवर खूप आवडतो), काकवी, सोयाबिन (जरा जपून, फार नको), cereals (Most cereals are fortified with calcium and are good choice but are costly in India.)

फळे - सन्त्र, डाळिम्ब, वन्द (berry) प्रकारातिल फळे

Suggestion - If giving tablets, do not give those separately - mix the powder in some soup or something eatable, otherwise children may develop habit of selective eating and taking vitamin tablets later as they grow up.

माझ्या बाळाला गोड अजीबात आवडत नहि म्हणुन मी तिला नाचणी च्या पिठाची पेज देते रोज
आणि थोडीशी हळद घालुन दुध ...

Pahili sakhar band kara va gulache praman aharat vadhva. Sakhar pachvayla calcium bodytun khechle jate. Organic gulat te inbuilt aste.

माझ्या मुलीलाही (वय अडीच वर्षे) हेच निदान केले होते डॉक्टरांनी.
याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे झोपेत डोक्याला खूप घाम येतो.

हे टाळण्यासाठी खाण्यामध्ये पालक व गूळ यांचे प्रमाण जास्त असावे.

याचे कारण शोधले असता बाटलीतून दूध पिणे हे याला कारणीभूत ठरते आहे असे दिसून आले.
बाटली ही सवय बनून गेल्यामुळे ( विशेषतः झोपताना) मुले अतिरिक्त दूध पितात व त्यामुळे बाकीचे खाणे कमी होऊन असे आजार उद्भवतात.

तेव्हा तुमचे बाळ बाटलीतून दूध पीत असल्यास (नसल्यास उत्तमच, बाटलीची सवय कधीच लागू देऊ नका) ते थांबवून चमचा/वाटीने दूध भरविण्याचा प्रयत्न करा.

आपल्याकडे calcium चे booster dose देतात मुलांना. माझ्या डॉक ने दोन्ही मुलांना एका आठवड्याला एंक असे ६ डोसे दिले होते. दुधात घालून एंक पुडी द्यायची. तुम्ही ostocalcium पण देऊ शकता. हे calcium dose द्यावे कि नाही माहित नाही, पण डॉक नेच सांगितले होते.
आहारातून calcium देन चांगल.पण मुल अजिबात जेवत नाहीत, टाळाटाळ करतात. म्हणून अजूनही अधून मधून मुलांना एंक calcium dose देते.

सर्वांना Thanks

आता मि त्याला पालक व गाजर देते, पालक वरणातुन आणी गाजर शिजवुन रात्री जेवताना.

@प्रबोधनकार, त्याला बाटली चि सवय आहे, पण आम्हि फक्त रात्रि झोपतानाच बाटलीने दूध देतो. आणि जेवण त्याला त्याआधी १-१.३० तास भरवतो.

@सखूबाई, ostocalcium चालु आहेच आधि पासुन दिवसातुन २ वेळा.

अवंतिका,
छिलकेवाली मुगडाळ + तांदूळ+ पालक चिरुन आणि बीट किसुन+ थोडेसे तूप अशी खिचडी बनवून द्या.
माझ्या मुलीला हे बरोब्बर लागू पडले होते.

@प्रबोधनकार... असेच डॉक्टरांच्या सांगण्यावरुन आम्ही मुलीला बाटलीच्या सवयीपासून लांब ठेवले पण नंतर खूप पश्याताप करावा लागला. दिवसभरात जास्तीत जास्त अर्धा-एक कप दुधाच्या वर मजल कधीच गेली नाही. दुसर्‍या मुलाला बाटली देतोय पण तुम्ही म्हणता तसे इतर आहारावर पण लक्ष द्यायलाच हवे.

मुलांची बाटली हा खरच मोठा प्रश्न आहे. बाटली दिली नाही तर बरीच मुल दुध पीत नाहीत. बाटली दिली तर ती सोडवली कि मुल दुध पिण बंद करतात.पण बाटलीची सवय शक्य तितक्या लवकर सोडवलेली बरी.
माझी मुलगी २ वर्षाची आहे, बाटली बंद केल्यावर तिने दुध पिण बंदच केलंय, अर्धा कप दुध प्यायला 2 तास लावते.

@अवंतिका, शक्यतो रात्रीची बाटली बंद करायचा प्रयत्न करा, कठीण आहे, पण दात खराब होतात मुलांचे. माझ्या डॉक ने सांगितलं होत, मला नाही जमल आणि मुलाचे दात खरच लौकर खराब झालेत.

@ सखुबाई, हो त्रास होतो. पण त्यासाठी, दुध भात, दुध पोळी, खिर या पदार्थातुन थोडी थोडी दुधाची सवय लावायची. म्हणजे अगदी आधिसारखे दुध प्यायले गेले नाही तरी थोडे तरी पोटात जातेच.

@ रैना

छिलकेवाली मुगडाळ म्हणजे? छिलकेवाली मुगडाळ + तांदूळ+ पालक चिरुन आणि बीट किसुन+ थोडेसे तूप हे सर्व एकत्रच शिजवु का?

@सखूबाई
मुलांची बाटली हा खरच मोठा प्रश्न आहे.>> ते तर आहेच. आता मि त्याला sippy cup आणला आहे, पण त्यातुन अजिबात पाणी पित नाहि, ग्लासने पाजल तर अर्ध खालिच सांडत. पण सवय तर करायलाच हवी. माझ्या बहीनीने तिच्या मुलाला कधीच बाटली दिली नाहि, पण ती घरिच होति तर त्याच्याकडे लक्ष देउ शकत होति. तिने ६-७ महिन्यातच ग्लासचि सवय लावली.

अवंतिका,
छिलकेवाली मुगाची डाळ म्हणजे सालं असलेली मुगाची डाळ. खिचडीसाठी वापरतात ती. Split Moongdal with skin.

हो हे सगळे एकत्र शिजवायचे.