हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ? (तरही)

Submitted by इस्रो on 12 December, 2011 - 07:36

कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ?

शोधावयास वाटा, करतो प्रयास अजुनी
हा कोणत्या दिशेचा, आहे प्रवास अजुनी ?

गगनास भाव भिडले, चर्चाच फक्त होते
थाटात खर्च करती, सारे सणास अजुनी

साथी कुणीच नाही, चिंता मला न त्याची
गातो मजेत माझ्या, गझला झकास अजुनी

नशिबास दोष सारा, देण्यात अर्थ नाही
"घामात ध्येय" हे का, कळले कुणास अजुनी ?

झालो वयस्क आता, असले खरे तरी पण
का बालपण हवेसे, वाटे मनास अजुनी ?

जेथून साथ सुटली, सखये तुझी नि माझी
वळणावरी तुझा त्या, होतो अभास अजुनी

...........................-नाहिद नालबंद
...............चलभाष : ९९२१ १०४ ६३०

गुलमोहर: 

.

जेथून साथ सुटली, सखये तुझी नि माझी
वळणावरी तुझा त्या, होतो अभास अजुनी >. चांगली गझल आहे. 'नाही' रदीफवाला शेर मात्र या गझलेत 'बसवावा' लागेल दुरुस्त करून! Happy शुभेच्छा! बाकीचे शेर स्वच्छ आहेत.

छानच!!

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.

बेफिकीरजी व प्राजुजी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आपलेही आभार. मी बदल करुन घेतोय.
धन्यवाद!