Submitted by deepak_pawar on 9 December, 2011 - 23:58
या विषयावर बर्याच कवींनी लिहीले आहे. म्हटलं आपणसुध्दा प्रयत्न करु
तुला पाहता असे वाटले
वसंतात ही बहरली फ़ुले
निळे सावळे मेघ तसे तव नयन भासती
नभापरी या तव गालांची रंगसंगती
रजनीचे काजळ तुझिया केसात गुंतले
तुला पाहता असे वाटले........
गंध फ़ुलांचा तसा तुझा दरवळे श्वास
वार्यापरी चहुकडे तुझाच पसरे भास
झुळझुळणारा झरा तसे पैजण छनछनले
तुला पाहता असे वाटले.........
रंग धुक्याचा...गोंदले तू रवीबिंब भाळी
वेलीवरची कळी जणू गालावरी खळी
रंग फ़ुलांचे तुझिया ओठावरी रंगले
तुला पाहता असे वाटले..........
(सहज सुचलेल्या काही विनोदी ओळी)
रानवेलीजश्या तव केसांच्या बटा भासती
रानपाखरापरि उवा-लिखा आनंदे नांदती
सहज फ़िरवला हात डोईतून कि गुपचूप खाजविले
तुला पाहता असे वाटले............
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सहज सुचलेल्या काही विनोदी
सहज सुचलेल्या काही विनोदी ओळी.......?????????????
विनोद कुठे झाला ते सांगावे ...हसायचे आहे!!
JOKES APART . JOKES APART . तिसर्या कडव्या पर्यंत.कविता छान आहे
काही माणसांची विनोदबुध्दी
काही माणसांची विनोदबुध्दी थोडी कच्ची असते त्याला कुणीचं काही करु शकत नाही
अभिपाप्राय दिल्याबद्दल आभार
पहिली तिन कडवि छान, चवथ्या
पहिली तिन कडवि छान,
चवथ्या कडव्यासाठी एकादी नविन कविता चालली असती.
धन्यवाद विभाग्रजजी , चवथे
धन्यवाद विभाग्रजजी , चवथे कडवे मुळ कवितेत नाही .