कळले होते... कळले नव्हते

Submitted by UlhasBhide on 9 December, 2011 - 00:58

कळले होते... कळले नव्हते

ते भाव तुझ्या हृदयीचे, मी कधीच टिपले होते
चकवून तुझ्या डोळ्यांना नजरेतुन झरले होते

त्या अधीरल्या शब्दांना, ओठांचे लगाम होते
मिटलेल्या ओठांमधुनी, स्मितहास्य बोलले होते

त्या अवचित भेटीगाठी, की योगच जुळले होते
की योग तसे भेटींचे, जुळवून आणले होते

जणु ध्यास तुझा लागूनी, मन झपाटलेले होते
बेधुंद स्वप्न प्रेमाचे, वास्तवास पडले होते

अन् व्यक्त जाहलो तेव्हा, दोघांना कळले नव्हते
ते सुप्त भाव कोणाच्या शब्दांतुन फुलले होते

.... उल्हास भिडे (९-१२-२०११)

गुलमोहर: 

त्या अवचित भेटीगाठी, की योगच जुळले होते
की योग तसे भेटींचे, जुळवून आणले होते>> ये बात!!

मस्तच उकाका, आवडली कविता Happy

भन्नाट !

उकाका... मस्तं झाली आहे कविता..

त्या अवचित भेटीगाठी, की योगच जुळले होते
की योग तसे भेटींचे, जुळवून आणले होते>> Happy मस्तं...

त्या अवचित भेटीगाठी, की योगच जुळले होते
की योग तसे भेटींचे, जुळवून आणले होते

व्वा!!

गझल लिहायचा विचार दिसतोय काका! Wink

ते भाव तुझ्या हृदयीचे, मी कधीच टिपले होते
चकवून तुझ्या डोळ्यांना नजरेतुन झरले होते>>>>>>खूप छान.

खूप सुंदर कविता.

सर्वांपेक्षा माझं मत फारच वेगळं आहे Sad
मला बिल्कूल आवडली नाही कविता.. फारच गोड गिट्ट आणि शब्दबंबाळ वाटली. Sad

उकाका सगळ्याच ओळी मस्त!!!!!!!!!!!!!
पण या विषेश आवडल्या...

त्या अधीरल्या शब्दांना, ओठांचे लगाम होते
मिटलेल्या ओठांमधुनी, स्मितहास्य बोलले होते

बेधुंद स्वप्न प्रेमाचे, वास्तवास पडले होते

खूप छान!!!!!!!

व्वा !!

Pages