माझा व्यवसाय - कापडावर प्रिटींग आणि एम्ब्रॉयडरी - प्राईम एंटरप्राईजेस

Submitted by हिम्सकूल on 8 December, 2011 - 04:06

आम्ही सध्या कापडावर एम्ब्रॉयडरी आणि कापडावरील स्क्रीन प्रिंटींग या प्रकारचे काम करतो. टी शर्टस्‌, टोप्या, ड्रेस मटेरियल,साड्या यावरती हे काम चालते. कॉम्प्यूटरवर डिजाईन बनवून यंत्राच्या सहाय्याने एम्ब्रॉयडरी केली जाते. गिर्‍हाईकांच्या मागणीनुसार हे काम केले जाते. हा एक सेवा उद्योग आहे.

आमचा व्यवसाय १९८० साली मी आणि माझ्या पत्नीने मिळून सुरु केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात स्टेशनरी पुरवणे, टायपिंग करुन देणे आणि छपाई करुन देणे, ग्रीटींग कार्डस छापून देणे अश्या प्रकारे हा व्यवसाय सुरु केला. कालांतराने एका गिर्‍हाईकाने आमच्या सेवा चांगल्या वाटल्या म्हणून कापडाच्या टेप वर छपाई करुन देणार का अशी विचारणा केली. त्याकाळी कापडावर छपाई करण्यासाठी लागणारी शाई सहज उलपब्ध नसे. ती केमिकल्स मुंबईमधून मिळवून हळूहळू त्यात प्राविण्या मिळविले. ह्या प्रकारे कापडावरच्या छपाईत लक्ष घालून कागद छपाईचे काम कमी करत आणले. कापडावरची छपाई जोखमीचे काम असल्यामुळे ह्या व्यवसायात फार लोक काम करत नाहीत त्याचा फायदा घ्यायचे ठरवले. त्यानंतर गिर्‍हाईकांच्या मागणीनुसार एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय चालू केला. कापडावर छपाई आणि एम्ब्रॉयडरी हे दोन्ही एकमेकाला पूरक असे व्यवसाय आहेत. बर्‍याच वेळेस एकाच टी-शर्टवर पुढच्या भागात एम्ब्रॉयडरी तर मागच्या भागात छपाई अशी मागणी असते. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे गिर्‍हाईकांची सोय होते.

समस्या - सर्व व्यवसायांना भेडसावणार्‍याच समस्या म्हणजे कामगारांची कमतरता, वीजेची अनुपलब्धता, माल वेळेवर न मिळणे, इत्यादी.

नवीन कल्पना - स्क्रीन प्रिंटींग खेरीज कापडावर छपाई करण्याचे आधुनिक मार्ग म्हणजे डिजीटल प्रिंटींग, ट्रान्सफर प्रिंटींग, कापडावर प्रिंटरच्या सहाय्याने डायरेक्ट प्रिंटींग च्या प्रकारचे आहेत. ह्या पद्धतींचा वापर करून छपाई करण्याचा आम्ही विचार करत आहोत. शिवाय एम्ब्रॉयडरीचा व्यापही वाढता असल्यामुळे नवीन मशिन घेण्याचा विचारही चालू आहे.

आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येत जाते तस तसे आपण आपल्या व्यवसायाचे स्वरुप बदलत रहावे लागते.

नवीन उद्योजक बनणार्‍यांना असा सल्ला द्यावसा वाटतो की, तुम्हाला जे काम येते त्याचं व्यवसायात रुपांतर करणे हे फारसे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला व्यवसायाच्या इतर अंगांची माहिती असणे फर जरुरीचे आहे. उदा. आर्थिक नियोजन, सरकारी नियमांची माहिती घेणे आणी त्याची अंमलबजावणी करणे, मार्केटींग, व्यवसायासाठी लागणार्‍या कच्च्या मालाची फायदेशीर खरेदी, जोखीम घेण्याची प्रवृत्ती, जग कुठे चालले आहे त्याकडे बारकाईने लक्ष ठेवणे व त्यानुसार व्यवसायाची दिशा ठरविणे, इ. वरील सर्व गोष्टींचा एकत्रित सुपरिणाम म्हणजे यशस्वी व्यवसाय.

आम्ही छापलेले काही टी-शर्ट्स http://sheepstop.com/index.php?zone=330 ह्या वेबसाइटवर बघता येतील

पद्मजा कुलकर्णी व रवींद्र कुलकर्णी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्या.......... भन्नाट! Happy
तुझ्यामुळे जुन्या आठवणी चाळवल्या. खरोखरीच ८० ते ९० व पुढे ९५ पर्यन्त, या काळात, एम्ब्रॉयडरीच्या तितक्याश्या सोई नव्हत्या. ८५/८६ च्या सुमारास आम्ही एक ऑर्डर घेतली होती, पन्नासएक लेडिज अ‍ॅप्रन, व तेवढेच जेण्ट्स प्यान्टशर्टची! प्रत्येकाची मापे कारखान्यात जाऊन घेतली होती, भाऊ बेतुन कापुन द्यायचा, आई शिवायची व मी इतर बटणे/काजे/मुरड/इस्त्री/नावानुसार पॅकिन्ग वगैरे करायचो. काजे बाहेरुन करण्यापेक्षा खर्चात बचत म्हणून हातीच करायचो. यावेळेस्च कंपनीच्या लोगोची एम्ब्रॉयडरी प्रत्येक शर्ट/अ‍ॅप्रनवर करण्याचा मुद्दा निघाला जो मूळ ऑर्डर मधे नव्हता. बाहेरुन पट्टीवर एम्ब्रॉयडरी करुन तुकडे शिवणे यास त्यान्ची मान्यता नव्हती, त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे ड्रेसवरच डायरेक्ट हवी होती. आम्ही बांठीया वगैरे तत्कालिक मोठ्या सप्लायर्सना भेटून बघितले, पण इतक्या थोड्या क्वान्टीटीकरता त्यान्ना शक्य नव्हते. व ज्यान्ना शक्य होते, त्यान्चे रेट्स इतके जास्त होते की आम्हाला ते परवडत नव्हते.
सबब, मी खोडरबरावर उलटे कोरुन लोगो चा स्टॅम्प बनवला, ज्या रन्गाने भरतकाम करायचे त्याच रन्गाच्या शाईने पांढर्‍या अ‍ॅप्रन/शर्ट वर ते उमटवत, व तो भाग गोल तबकडीमधे ताणुन बसवुन चक्क हाती भरत काम केले. (ते भरतकाम कशाप्रकारे, कोणत्या दोर्‍याने करायचे हा देखिल गहन प्रश्न होता कारण आम्हा तिघान्पैकी कुणालाच भरतकामात तितकी गती नव्हती, शेवटी "आर्टिस्ट" असे मला सम्बोधुन माझ्या गळ्यात ते काम टाकले गेले Proud ) हा प्रश्नच ऐन शेवटच्या क्षणी आलेला अस्लयाने वेळेचे बन्धन होते. अक्षरषः दोन दिवस, व मधली एक रात्र येवढ्या वेळात, इतर उद्योग साम्भालून ते पूर्ण केले.
आजकाल, मशिनरीच्या सुविधान्मुळे अतिशय सुन्दर भरतकाम मिळू शकते.

याच व्यवसायात असलेल्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा Happy

अरे बरेच दिवस वाचायचे राहिलेच होते. छान उद्योग व हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडे टीशर्ट साठी छान स्लोगन्स व कन्सेप्टस असतात त्या मला तुझ्याकडून बनवून घ्यायच्या आहेत. नक्की संपर्क करते.

अरे बरेच दिवस वाचायचे राहिलेच होते. छान उद्योग व हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडे टीशर्ट साठी छान स्लोगन्स व कन्सेप्टस असतात त्या मला तुझ्याकडून बनवून घ्यायच्या आहेत. नक्की संपर्क करते.

नमस्कार

माझ्या कड़े टी शर्ट साठी काही मराठी डिज़ाइ न स आहेत . तुम्ही त्याचा कही उपयोग करून घेवु शकता का ?
आणि त्या पासून मला काही फायदा होऊ शकतो का?

दवबिंदु
davbindustar@gmail.com
www.davbindu.com

Pages