Submitted by क्रांति on 8 December, 2011 - 03:02
कुणा माहिती काल होतो कसा?
मला मीच ना आठवे फारसा !
प्रवाहातल्या ओंडक्यासारखा,
किती दूर वाहून आलो असा
दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !
खरा चेहरा दाखवू पाहता,
चरे पाडले, फेकला आरसा
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?
उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
(No subject)
गझल आवडली. मतला फार आवडला
गझल आवडली. मतला फार आवडला
छानशी गझल
छानशी गझल
२९ नोव्हेंबर ला माझी "लपंडाव"
२९ नोव्हेंबर ला माझी "लपंडाव" ही कविता पोस्ट केली होती त्यातील काही ओळींचा पुनःप्रत्यय आला.
गझल आवडली..
का असा वाहतो मी रुढींचा वसा
मीच का झाकतो आतला आरसा
आज हि त्या सुखांची असे वानवा
हा पुसावा कसा आठवांचा ठसा
खरा चेहरा दाखवू पाहता,
चरे पाडले, फेकला आरसा
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?
पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद !!!!!
नकोसा जरी वाटला जन्म
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?>> मस्त शेर
या शेरावरून आनंदयात्रींचा एक शेर आठवला. जगण्याचे ठसे पुसले की पुसले नाहीत असा, नेमका आठवत नाही आहे.
छान आहे गझल !
छान आहे गझल !
सुंदर गझल....! अप्रतिम!
सुंदर गझल....! अप्रतिम!
क्रांति तै जियो
क्रांति तै
जियो
बेस्ट....
बेस्ट....
ठसा शेर फार आवडला क्रांतीताई
ठसा शेर फार आवडला क्रांतीताई
सुंदर गझल, मनापासून आवडली.
सुंदर गझल,
मनापासून आवडली.
अजून एक मस्त गझल क्रांती
अजून एक मस्त गझल क्रांती
कुणा माहिती काल होतो कसा? मला
कुणा माहिती काल होतो कसा?
मला मीच ना आठवे फारसा !
प्रवाहातल्या ओंडक्यासारखा,
किती दूर वाहून आलो असा
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !
उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !
--- क्रांती, गझल नेहमीप्रमाणे दर्जेदार! वरील सर्व शेर आवडले. मतला खास!
--जयन्ता५२
नकोसा जरी वाटला जन्म
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?
<<<< व्वा >>>>
आवडली. विशेष आवडत्या
आवडली.
विशेष आवडत्या ओळी...
>>दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?
क ह र !!
दगा देतसे सावलीही मला, भरोसा
दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?
व्व्वा!!! किती सहज!!
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !
वावा!!!