खार बाई खार...

Submitted by ग्लोरी on 7 December, 2011 - 04:09

खार बाई खार, लाडाची खार
झाडाच्या अंगावर खेळते फार

मोर बाई मोर
रंगांचा चोर
चोरलेत बाई त्याने रंग हजार

भालू बाई भालू
चाले डुलूडुलू
नाचून दाखवतो गमतीदार

मनी बाई मनी
किती किती गुणी
गरम गरम दुध पिते करून गार

हत्ती बाई हत्ती
जाडजूड किती
त्याचीच भिती त्याला वाटते फार

ससा बाई ससा
धरू तरी कसा
चाहूल लागताच होतो पसार...

- ग्लोरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छानच.

खार बाई खार,
लाडाची खार
झाडाच्या अंगावर खेळते फार>>>छान आहे.

मोर बाई मोर
रंगांचा चोर
चोरलेत बाई त्याने रंग हजार>>>>फुलवी पिसारा कसा चितचोर

भालू बाई भालू
चाले डुलूडुलू
नाचून दाखवतो गमतीदार>>>नाचून दाखवतो कसा टुलूटुलू.

मनी बाई मनी
किती किती गुणी
गरम गरम दुध पिते करून गार>>>>>गरम गरम दुध पिते पाहू नका कुणी

हत्ती बाई हत्ती
जाडजूड किती
त्याचीच भिती त्याला वाटते फार>>>>>त्याचीच त्याला वाटते भिती

ससा बाई ससा
धरू तरी कसा
चाहूल लागताच होतो पसार>>>>पळायचा त्याने घेतला वसा.

छान आहे. Happy

विभाग्रज, पर्याय नाही आवडले. प्रत्येक कडव्यात कशाला यमक जुळवताय? मूळ कवितेच्या कडव्यांच्या शेवटच्या ओळीत जुळते.
"चोरलेत बाई त्याने रंग हजार" हीच ओळ मला आवडली. लहान मुलांच्या कवितेत 'चितचोर', 'वसा' इ. शब्द कशाला?