दसरा आणि दिवाळीतलं भांडण कसं मिटलं !

Submitted by pradyumnasantu on 6 December, 2011 - 15:39

दसरा आणि दिवाळीतलं भांडण कसं मिटलं !

सांग ना रे भाय
मोठं काय
दिवाळीचे दिवे हजार
की
दस-याचा सोनेरी चमत्कार
सोन्याची पानं, पानांना सोनं
की भाउबीजेचं भावाला ओवाळणं?
दसरा दिवाळीत झाला असा वाद
सर्वांच्याच तोंडाचा पळून गेला स्वाद
दिवाळी म्हणते मी मोठी
माझ्या दिव्यांचा बघ कसा लखलखाट
दसरा म्हणतो मी मोठा
माझ्या सोन्याचा चमचम चमचमाट
दिवाळी म्हणे मी भावा-बहिणीना भेटवते
दसरा सांगे, सोनं देताना सगळ्यांचीच भेट होते
माझ्याकडॆ वस्त्रे
माझ्यामागे शस्त्रे
माझ्याकडे शेव-चकली-लड्डू
माझ्याकडे श्रीखंडू
वाद तुटेना
झगडा मिटेना
तोवर तेथे आला एक मुसाफ़िर
म्हणाला दोघांना थोडा धरा धीर
मला ठाउक आहे तुमची कहाणी
तुम्ही तर आहात भाउ बहिणी
एकाशिवाय दुसरा नाय
मी सांगतो तुम्हाला उपाय
तुम्ही दोघे या दोन्हीकडून
पुकारा माझे नाव मला मिठी मारून
दोघांनी तसे केले
आणि काय चमत्कार
भांडण विसरूनच गेले
अनोळखी मुसाफ़िराने असे घातले अंजन
त्याचे नाव होते रक्षा-बंधन!
दिवाळीने दस-याला सुरेखशी राखी बांधली
दस-याने तिला श्रीखंड-पुरी भरवली, आणि शिवाय एक साडीही दिली

गुलमोहर: 
शब्दखुणा: