Submitted by शाबुत on 6 December, 2011 - 03:53
देशाचीच तिजोरी, जनतेचाच ठेवा।
खा तुम्ही मेवा आता, खा तुम्ही मेवा॥ धु॥
दारी आमच्या एकदाच, पाच वर्षांनी येता
सभा घेऊनी तुम्ही मारता, मोठ्या-मोठ्या बाता
जाहीरनामा निवडनुकीचा, नंतर खोटा का ठरावा ॥१॥
गरीब जनता रात्र-दिवस, करीतात कष्ट
तरी त्यांना खाण्यामिळते, उरलेले-उष्ट
हरामाचे खाऊन तुम्ही, शिरजोर का ठरावा ॥२॥
जनतेला लुटण्याचाच, करार तुम्ही केला
नोकरदार वर्ग झाला, महागाईने अर्धमेला
धोरणं ठरवुन श्रीमंताचाच, फायदा का करावा ॥३॥
गरीबांच्या गरजांचा कधी, विचार नाही केला
पिण्यास नाही पाणी, त्यांना देणार कोका-कोला
झोपडीत आला तो, झोपडीतच का मरावा ॥४॥
खुर्चीत बसता असते, तुमचे एक लक्ष
सरकार टिकवण्यासाठी असता, नेहमीच दक्ष
सगळ्या योजनामधे नेहमी, भष्टाचार का करावा ॥५॥
(देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा..........वर आधारीत.)
-श्यामराव.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आशय चांगला आहे. पण मीटरमध्ये
आशय चांगला आहे. पण मीटरमध्ये बसत नाही.
अमितला अनुमोदन थोडे शब्द बदल
अमितला अनुमोदन
थोडे शब्द बदल , अनावश्यक येणारा 'का' इत्यादी
मुळ गाण गाताना जशी लय तुटत नाही ते काहीस हरवलय
प्रयत्न करावा
मुखडा अग्दी परफेक्ट आहे..
मुखडा अग्दी परफेक्ट आहे.. अंतरे गंडलेत.. शक्यतो विडंअबनाला मूळचेच शब्द वापरायचे... उदा.
देशाची तिजोरी जनतेचाच ठेवा
खा तुम्ही मेवा आता खा तुम्ही मेवा
खाते लाच डोळे मिटूनी जात पुढार्यांची
मनी चोरट्याच्या का रे आस संसदेची
विरोधकांच्या नावाने शंख हा करावा
जसं सुचलं तसं लिहलं मिटरमधे
जसं सुचलं तसं लिहलं
मिटरमधे बसवुन त्याचं थोडीच गाणं तयार करायचं आहे.
तरी वरच्या सल्ल्यासाठी आभार!
ह्म्म्म
ह्म्म्म
मस्त आहे. योग्य वेळी
मस्त आहे. योग्य वेळी योग्य विडंबन