Submitted by देवा on 20 August, 2008 - 03:08
वैभवची मूळ गझल आणि मिल्याचे त्यावरील विडंबन ह्यांवर मी आणि मिल्याने केलेले विडंबन सर्व डु. आयडींना समर्पित...:)
डुआय आहेस ऐकतो? हे कसे जमवतोस सांग ना!
एकाच व्यक्तीस दोन तोंडे कशी बसवतोस सांग ना!
अजून गेली नसेल ना ती बकावयाची सवय तुझी
कुणी न बोलावताच स्वतःस का घुसवतोस सांग ना
अता तरी आणखी न कोणी तुझ्यासवेस भांडण्या
कुणास तू हाक मारण्या ह्या कळा बडवतोस सांग ना
नवा नव्या उच्च टोमण्यांची ददात नाही तुला तरी
कशास मारून ते जुने टोमणे पकवतोस सांग ना!
खरोखरी जर तुला कथेचा आस्वाद आहे घ्यायचा
बनून तू मास्तुरे अशी राळ का उडवतोस सांग ना!!!
खड्या पहार्यावरीच नेमस्तकास नेमून ठेवले
नजर तयाची हळूच चुकवून का पचकतोस सांग ना!!!
गुलमोहर:
शेअर करा
हे हे हे..
हे हे हे.. देवा लै भारी रे...
देवा,
देवा, मिल्या....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
'स्प्लिट्सव्हिला' मधून गेल्या शनिवारी रितु बाहेर.
*** We must not avoid
***
We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus
हे तर खासच
हे तर खासच
बिचार्या वैभवला कल्पनाच नसेल आपल्या गजलेने इतकी स्फूर्ती येईल लोकांना
उच्च
उच्च टोमणे... ? हुच्च .. हा शब्दही फिट होतो...
-------------
(सूचना : हा आय डी अस्सल आहे.. )
(No subject)
जबरी रे
जबरी रे
सुपर..
सुपर..
देवा,
देवा, मिल्या लै भारी!! आसुडच ओढल्येत तुम्ही!!
हा आय.डी. डुप्लीकेट आहे
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.