पाऊलखुणांची सोय तात्पुरती बंद

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

तांत्रिक कारणांमुळे "पाऊलखुणांची" सोय सध्या तात्पुरती बंद ठेवली आहे.

पाऊलखुणांच्या अतिरेकी वापरामुळे सर्वरवर ताण येतो आहे का अशी शंका आहे. आम्ही पर्यायी व्यवस्था शोधतो आहोत.

विषय: 
प्रकार: 

आता बदल करता आहातच तर परत एकदा विनंती.
जुन्या माबोवरचा ट्री व्ह्यू आणि लास्ट १/३/७ डे सर्च प्लीज परत आणता येईल का बघा ना.

अहो, मला आज संयुक्ताच्या वाचनकट्यावर एक लेख टाकायचा होता. तो मी माझ्या अपूर्ण लेखात ठेवला होता. त्याची माझ्याकडे प्रत नाहीये. आता मी काय करू ? माझ्या अपूर्ण लेख मी कसा पाहू ? प्लिज लवकर मदत करा.

निर्णय विचारांती घेतला असणार ह्यात शंका नाही.

लेखन पीडीएफ मधे सेव्ह करून घ्यायचा सल्ला द्याल की लेखकाला त्याचे लेखन पहाता येणार आहे?

अर्धवट राहीलेलं लिखाण (अप्रकाशित) कुठे मिळेल ? त्याचा बॅक अप घेण्यासाठी थोडा वेळ मिळेल का ?

सगळ्यांचं अर्धवट ठेवलेलं लेखन अगदी व्यवस्थीत आहे. पण त्याकडे जायचं दार तात्पुरते बंद ठेवले आहे. कारण एकच दार होतं आणि सगळ्यांनाच त्याच दारातून जायचं असल्याने सगळ्यांनाच जाणे हळू झाले होते. त्या दारामागच्या खोल्यांमधे ज्याचं त्याचं लेखन सुरक्षित आहे.

ओह ! धन्यवाद या माहीतीबद्दल. म्हणूनच क्लिक केल्यावर वेळ लागत होता तर ..:) कारण आता समजलं !
या विषयातलं काहीच कळत नाही.. पण
पाऊलखुणा मधे प्रतिसाद हा विभाग काढून टाकला तर ?
लेखन हा विभाग बॅक अप घेतल्यावर काढून टाकला तरी चालेल Happy .

>>>> आम्ही पर्यायी व्यवस्था शोधतो आहोत.
"निवडक दहा" यात सन्ख्यात्मक वाढ किन्वा पाऊलखुणान्च्या ऐवजी "आपल्या आवडत्या धाग्यान्ची स्वतंत्ररित्या युजरने नोन्द" करण्याची सुविधा (बुकमार्क) दिली जाऊ शकली तर पाऊलखुणामुळे सर्व्हरवरील संभाव्य ताण नाहीसा होईल. पाऊलखुणामुळे ताण येत असणार असे वाटते.

अन समजा पाऊलखुणान्ची सुविधा ठेवलीच तरी तिथवर पोचेपर्यन्त चारपाच पाने ओलांडून जावे लागेल असे करावे, म्हणजे येताजाता उगाचच/अन्य पर्याय असतानाही, त्याचा वापर होणे टळेल असे वाटते.
मी शक्यतो पाऊलखुणा वापरीत नाही, त्या ऐवजी सर्च ची सुविधा, व निवडक दहा चा पर्याय वापरतो. मात्र निवडक दहा सन्ख्येने फारच अपुर्‍या आहेत.

जागोमोहनप्यारे - जागो !
सर्चची सुविधा सुरू आहे. सर्चसाठी पानाच्या शेवटी, < First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. > या ओळीखाली तुम्हाला शोधपट्टि दिसेल. तुम्हाला काही अडचण येते आहे का?

अ‍ॅडमिन. पाऊलखुणामधे लेखन विभाग असणे जितके गरजेचे आहे तितके प्रतिसाद विभाग असणे नाही, असे मला वाटते. त्यामुळे सर्वात जास्त ताण येत असावा. त्यापेक्षा निवडक १० च्या ऐवजी निवडक २० करता आले तर बघा.

अ‍ॅडमिनजी,
’संपर्क’ ही सोयदेखील बंद ठेवली आहे का ?
माझ्या प्रोफाइल मध्ये दिसत नाही.
(मी स्वत: बंद केलेली नाही)
-------------------------------------------------------------------------------------------
अ‍ॅडमिनजी,
श्री. भरत मयेकरांच्या खालील पोस्टमुळे याबद्दल खुलासा झाला.
माझा वरील प्रश्न दुर्लक्षित करावा ही विनंती.

उल्हास, तुम्हाला स्वतःशीच संपर्क करायची गरज नाही म्हणून तुमच्या प्रोफाइमधे संपर्काची सोय तुम्हाला दिसत नाही, मला दिसतेय.

अ‍ॅडमिन पाउलखुणांमधल्या प्रतिसादांच्या मुद्द्याबद्दल वरच्या सगळ्यांना अनुमोदन. त्याऐवजी फक्त 'यांनी मायबोलीवर केलेले लेखन' एवढेच दिसले तर बरे.

नमस्कार सर,
स्वतःचे माबोवर प्रकाशित लेखन सारेच सेव्ह नाही करून ठेवलेले, ते हवे असल्यास मदत कराल काय? कृपया कळवावे.

सारेच सेव्ह नाही करून ठेवलेले>>>> बागेश्री, पाऊलखुणांची 'तात्पुरती' बंद आहे, कायमची नाही Happy

धन्यवाद भरत.

"स्वतःशीच संपर्क करायची गरज नाही" हे ध्यानात आलंच नाही.
(नक्कीच "वय झालं आता" असं म्हणायला हवं :P)

उल्हास, तुम्हाला स्वतःशीच संपर्क करायची गरज नाही म्हणून तुमच्या प्रोफाइमधे संपर्काची सोय तुम्हाला दिसत नाही, >>> Biggrin (कविता रचण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी अवस्था, स्वतःचाही संपर्क नसावा)

'फक्त लेखन' शोधायला पाऊलखुणा वर जावे लागायचे. मग प्रतिसादांसकट सगळे लोड व्हायला खूSSSप वेळ लागायचा. आमच्या मनावरही ताण यायचा तर सर्वरवर येतच असणार.

'प्रतिसाद' प्रकरण पाहिजेच कशाला? कुठल्या आयडीने कुठे, कधी, काय प्रतिसाद लिहिला होता ते बघण्यात लोक फुकट वेळ घालवतात आणि ताण आणतात. 'फक्त लेखन' तेवढे दाखवा. अर्थात तेवढ्याने बराच फरक पडणार असेल तर.

नाही मला मी लेखन न केलेल्या पण प्रतिसाद दिलेल्या धाग्यांचा शोध घ्यायचा असेल तर पाऊलखुणा हेच एक प्रभावी साधन आहे शोधण्याचे. त्यामुळे "लेखन+प्रतिसाद" असा काही पर्याय असला तर बरे.
मी पाऊलखुणा नियमित वापरतो धागे शोधण्यासाठी.