कट्टा-कॉफीहाऊसच्या गजालीगप्पा

Submitted by कौतुक शिरोडकर on 2 December, 2011 - 04:52

बायको - अग आई ग, दमले मी... थकले मी.
नवरा - अरे रे, किती करावं लागतं तुला माझं... मुलांच. राब राब राबतेस. स्वैपाक, धुणी, भांडी.. नशीब हे पटवर्धन वहीनींना माहीत नाही.
बायको - केवढं करता हो माझ्यासाठी !
नवरा - एवढं तर करू शकतो तुझ्यासाठी. मला तुझे हे हाल बघवत नाही ग. बायकोवर माझं खरच प्रेम आहे हे मला वेगळं सांगाव लागत नाही.
बायको - खरच हो.. पण एकटीला आता घरकाम झेपत नाही. तुम्ही तर इकडची काडी तिकडे करत नाही.
नवरा - पण मला सवयच नाही.. काड्या करायची. त्या ठराविक माबोकरांसाठी ठेवल्यात. बोल, मी काय करू तुझ्यासाठी ?
बायको - मोलकरीण ठेवा.
नवरा - तुला चालेल...... मी ठेवलेली ?
बायको - घरकामासाठी ठेवायचीय.
नवरा - तेच तर म्हणतोय. पण बजेटचा विचार नको का करायला ? विचार न करता बोलायाला मी काय नादखुळा आहे. परवडायला हव ना ?
बायको - माझी परवड होते.. त्याचं काय ?
नवरा - अग, तुझी जास्त धावपळ तर सकाळी असते, तेव्हा मोलकरीण येणार आहे का कामाला ?
बायको - पण बाकीची काम करेल ना ती. दुपारची, संद्याकाळची.............. बस्स.
नवरा - आणि समजा तिने भांडी घासण्याएवजी नुसती धुवून ठेवली तर ? कपडे धुण्याएवजी नुसते बुचकळून काढले तर ? @मितसारखी. आता इतकी वर्षे तुझ्या हाताच्या स्वैपाकाची सवय झालीय मला. दिनेशदाची शप्पथ. दुसर्‍या कुणाच्या हातचं कस गोड लागेल ?
बायको - किती करता हो माझ्यासाठी !
नवरा - एवढं तर करू शकतो तुझ्यासाठी. समज, त्या मोलकरणीने किरुसारखी काम वरवर उरकली तर पुन्हा सगळं तुलाच करावं लागणारं. दुसरं म्हणजे मोलकरीण तरूण असली की परत तुझच काम वाढेल.
बायको - ते कसं ?
नवरा - माझ्यावर लक्ष ठेवायचं. शेवटी बेफिकीर माणूस मी. फुकट माझा शायनी आहुजा व्हायचा.
बायको - मग आता काय करायचं ? मला तर त्या भुंग्यासारखी या सगळ्यापासून सुटका हवीय. यावर उपाय काय ?
नवरा - एक उपाय आहे. बघ तुला पटला तर.
बायको - कोणता ?
नवरा - मी दुसरी बायको आणतो.
बायको - हे तर तुम्ही नवीन पान उघडलत. त्याने माझा प्रश्न सुटेल ?
नवरा - (स्वगत) माझा सुटेल. (उघड) म्हणजे एकीला दोन झाल्या की कामाची विभागणी नाही का होणार ?
बायको - एका घरात दोघीजणी ? हे म्हणजे, एका तरहीवर गझला पाडण्यासारखं. बरं कोण काय करेल ?
नवरा - तू स्वयपाकाचं बघशील ती मुलांच बघेल, तू भांड्याचं बघशील, ती कपड्यांच बघेल.
बायको - तुम्ही काय बघणार ?
नवरा - मी दोघींकडे बघेन. तशीही मला या पानावरून त्या पानावर बागुलबुवासारखी फिरायची सवय आहेच. म्हणजे तुझ्याकडे मला जास्त वेळ बघता येईल. वाटल्यास सगळी घरची कामे ती करेल. तू बाहेरच बघ.
बायको - केवढं करता होत माझ्यासाठी !
नवरा - एवढं तर नक्कीच करु शकतो तुझ्यासाठी. आपल्याला हवं तेव्हा नाटक, सिनेमाला जाता येईल. तुला निवांत सिरियल्स बघायला मिळतील. वाट्टेल तेव्हा महिलामंडळाच्या कट्ट्यावर बसून कॉफी घेत गप्पागोष्टी,गजाल्या कर.
बायको - म्हणजे मला हवं तेव्हा माहेरी जाता येईल. गटग करता येईल. पार ठाण्यापासून पुण्यापर्यंत.
नवरा - नक्कीच.
बायको - पण तिने घरातली कामं करायला हवीत हे आधी वदवून घ्या म्हणजे झालं.
नवरा - ते माझ्यावर सोड. पाहीजे तर आपण १०० रुपयाच्या स्टँपपेपरवर परेश लिमयेंकडून करारनामा बनवून घेवू.
बायको - पंताप्रमाणे मस्त आयडिया काढलीत तुम्ही. केवढं करता हो माझ्यासाठी !
नवरा - एवढं तर करूच शकतो तुझ्यासाठी.
बायको - थँक्स. पण लग्न रजिस्टरच करू म्हणजे खर्च कमी. चारचौघांना बोलावलं तर परत बिल कुणी भरायचं यावर किश्यावाद नको. आयमीन खिश्यावाद नको.
नवरा - प्रत्येकाला डबा आणायला सांगू. सगळे आपसात शेअर करतील एक 'शेपू' सोडून.
बायको - फक्त नव्या नवरीने योडीसारखा काही हट्ट केला नाही म्हणजे मिळवलं. तरीही साधारण शालू, मंगळसुत्र, बांगड्या करायच्या म्हटल तरी पन्नास हजार तरी जातील.
नवरा - या आनंदयात्रेला पन्नास हजार जास्त होतात असं नाही वाटत तुला ?
बायको - जास्त कसे ? एवढं करावचं लागतं. सवतीला एकही दागिना केला नाही तर कट्ट्यावरच्या बायका, गगोकरणी नाव नाही का ठेवणार ? ती वर्षा_म विडंबन करेल माझं आणि शुभांगी हेमंत तिला अनुमोदन देईल. नकोच ते. नाहीतरी मोलकरणीला दर महिन्याला पगार द्यावा लागला असता, तोच एकदम डिपोजिट केला असा समजा. फक्त एका माणसाचा खर्च तेवढा वाढेल. रविवारची मासळी जागूकडून घेऊ.
नवरा - मग अस करू. नोकरी करणारी बघू. म्हणजे तिचा सगळा खर्च ती उचलेल.
बायको - मग मला काय उपयोग ? किरण्यके सारखे नुसते आयडी बदलले तरी माणूस तोच. तसाच... प्रोब्लेम आहे तिथेच. आज तुमचं तिघांच करतेय. उद्या चौघांच करावं लागेल. नोकरी करणारी नकोच.
नवरा - तेही बरोबर.... (स्वगत) मलापण काय उपयोग ?
बायको - खर्चाच करु एडजस्ट. त्यात काय ? तुम्ही डॉ. गायकवाडाचे चक्रीमुशायरे अटेंड करा. तुमचा खर्च सुटेल. पण एक मात्र होईल. तुमचा त्रास वाढेल.
नवरा - विदीपाचा कसला त्रास ?
बायको - त्यांचा त्रास नाही हो. माझ्या माहेरचे आले की तुमच्या कपाळाला आठ्या पडतात. तिच्या माहेरचे आले तर मग आठ्याच काय नव्व्या आणि दश्श्या पण पडतील. मंदार जोशींसारखं कपाळ दिसेल मग ते.
नवरा - मग मागेपुढे कुणी नसलेलीच बघू.
बायको - अस कसं ? कुणीही कसं चालेल ? चांगली घरंदाज, संस्कारी बघू आपण. देशमुखांची बागेश्री कशी ? ललितात कविता करणारी. तशी एखादी. आणि मी कशासाठी आहे ? नाकीडोळी नीटस अशीच निवडेन मी.
नवरा - असू दे ग. तेवढं चालवून घेईन मी.
बायको - केवढं करता हो माझ्यासाठी ! मी ही करेन तुमच्यासाठी. उद्या कोणी द्विभार्या प्रतिबंधक कायदा घेऊन आला तर मी बघून घेईन त्यांना. दक्षिणासारखं मुस्काड फोडेन त्यांच.
नवरा - ते कशाला येतील ?
बायको - येणारच. तुम्ही दुसरं लग्न केलत तर कुणाच्याना कुणाच्या पोटात दुखणारचं. सावरकरांच्या क्रांतीवर किती जणाना पोटशूळ उठला ते बघितलत ना. मागे त्या चव्हाणाने दुसरं लग्न केलं तेव्हा टाकलं ना त्याला आत... पाच वर्षासाठी.
नवरा - अरे बापरे !
बायको - तुम्ही कशाला काळजी करता ? मी आहे ना.
नवरा - थँक्स. मग करु मी लग्न ?
बायको - थांबा हो थोडं. घाई करू नका. मॅचुरीटी आहे की नाही काही ? माबोवरदेखील असच बोलतात तुमच्याबद्दल. तुमची एक एफडी मॅचूर होतेय ना पुढच्या वर्षी ?
नवरा - आता तिचं काय ?
बायको - तिला प्रीमॅच्युर करावी लागणार. बाळंतपणासाठी तरतुद नको करायला. हा विषय संयुक्तातला नाही.
नवरा - बाळंतपण ?
बायको - उद्या ती आई नाही का होणार ? तिच्याबरोबर काही तुम्ही जामोप्याचे धार्मिक बाफ डिस्कस करणार आहात की यो रॉक्सच्या भ्रमणगाथा? होणार ना बाप ?
नवरा - हो.... होईल ना.. अग पण खर्च खुपच वाढतोय नवकविताकारांचा कवितांसारखा.
बायको - आता एवढं तर सोसावच लागेल तुम्हाला. शिवाय मुलांच्या एडमिशनचं बघावं लागेल.
नवरा - सरळ म्युन्सिपालटीत टाकू.
बायको - अस कसं ? ड्यु आय आहेत का ते अनुल्लेख करायला ? आपली मुलं सीबीएसईमध्ये आणि सवतीची म्युन्सिपालटीत ? एडमिन काय म्हणेल ? ते काही नाही. त्याच्या एडमिशनसाठी डोनेशन तयार ठेवा.
नवरा - अग पण माझ्याकडे सोर्सेस नको का तितके ?
बायको - सोर्सेस...? त्या बेफींना बघा. बाफ, कथा, कविता, ललित, गझला, साद, प्रतिसाद, गटग, लाँग ड्राईव्ह, रेल्वे-विमान प्रवास, नोकरी......... कुठेही हजर असतात ते. त्यांच्या ड्यु आयपेक्षा ड्यु प्रतिकृती आहेत असा संशय येतो मला. एकावेळी काय काय मॅनेज करतात ते आणि तुम्ही ?
नवरा - अग त्यांची आकडेमोडच वेगळी.
बायको - ते काही नाही. एडमिशनचा सध्याचा भाव बघता पुढे साधारण ५० - ६० हजार तरी लागतील. शिवाय मुलांच्या नावावर जमा नको का करायला ? रिक्षा फिरवून प्रतिसाद गोळा करण्याएवढं सोप नाही ते मला माहीत आहे. लाख रुपयांची तरी पॉलिसी हवीच. पुढे मुलांच कॉलेजचं शिक्षण ? त्याच काय ? तिघांचे मिळून कमीत कमी ५-५.५ लाख तरी लागतील. आणि हो..... सणासुदीला नव्या नवरीसाठी वर्षभर शॉपिग करावी लागणार. तीन्-चार लाख त्यात जातील. शिवाय...
नवरा - बापरे हे तर आशुचँपच्या अमानवीयपेक्षा भयंकर आहे. मी काय म्हणतो दुसरा काही उपाय शोधला तर
बायको - दुसरा उपाय ? आहे ना..
नवरा - तो आणि काय ?
बायको - मी दुसरा नवरा आणते. मामीसारखा लटका विबासं नव्हे. कायदेशीर नवरा. तो कमवेल त्या खर्चात मोलकरीण झेपेल. तुम्ही दोघे कामावर असताना मोलकरीण येईल म्हणजे मला क्रमश: लक्ष ठेवायचा त्रास नाही. शिवाय तुमच्यावरचा भार कमी होईल. तुम्हाला ऑफीसात कवठीचाफ्यासारखा ओव्हरटाईम असला तर आम्ही दोघे सिनेमाला जाऊ शकतो. बरेच दिवस झाले कुठे गेले नाही मी. आपल्या वेळेला हनिमुनसाठी मनालीला जायची इच्छा होती माझी. ती राहीली. त्यांच्याबरोबर मनालीला जाईन. म्हणजे विशाल कुलकर्णीसारख्या काही प्रचि तरी टाकता येतील. दुसरं म्हणजे...
नवरा - एक मिनिट फोन वाजतोय...
बायको - रिंग कुठे वाजली ?
नवरा - वाजतोय... वाजतोय... हल्लो... हल्ल्लो... आपण नंतर बोलू....
बायको - थांबा हो.. मला अजून बोलायचय.
नवरा - हल्लो... रेंज नाही... हल्ल्लो..... (जातो.)
बायको - बघितलत, दिवाळी अंकाला एकवेळ संपादक पटकन मिळत नाहीत पण काही प्रश्न भांडणापेक्षा चर्चेने झटपट सुटतात. चला आता बघू कुठला बाफ पेटलाय ?

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळटीप - माबोकरांनो, हलकेच घ्या. कुणाला जड झाल तर लेखन अप्रकाशित करण्यात येईल याची हमी एडमिन देतीलच. मी पामर कोण ??? तळटीप वेगळी टाकण्याचा चाणाक्षपणा सुज्ञ माबोकरांच्या लक्षात आला असेलच. ज्यांची नावे नजरचुकीने यात राहीली आहेत त्यांनी कृपया माबोवर सजग राहून पुढच्या लेखात आपली नोंद होईल इतकी कार्यक्षमता दाखवावी. Lol

अफाट.....

फू बाई फू - पहिले पर्व ची आठवण झाली

फक्त स्वतःला जाणीवपूर्वक बाहेर ठेवले आहे की नवर्‍याच्या भूमिकेत टाकले आहे Wink Light 1

त्या बेफींना बघा. बाफ, कथा, कविता, ललित, गझला, साद, प्रतिसाद, गटग, लाँग ड्राईव्ह, रेल्वे-विमान प्रवास, नोकरी......... कुठेही हजर असतात ते. त्यांच्या ड्यु आयपेक्षा ड्यु प्रतिकृती आहेत असा संशय येतो मला. एकावेळी काय काय मॅनेज करतात ते आणि तुम्ही ˆ
माबो आणि बेफी अतुट नाते.

झक्कास लिहीले गड्या, कौतुक तुझे.

फू बाई फू - पहिले पर्व ची आठवण झाली>>>>>+१
मस्त जमलिये भट्टी. आता बेफिकीर आहेत यात म्हटल्यावर भट्टी येणारच ना Wink

भारीच Lol

कौतुक,
मजेदार लिहिलंयस.

वर प्रतिसादात कुणीतरी फू-बाई-फू चा उल्लेख केला त्यावरून एक कल्पना सुचली -------

वरील लिखाणात काही बदल, अ‍ॅडिशन्स, आणखी चटपटीत संवाद इ.इ. करून याचं रूपांतर एखाद्या (फू-बाई-फू टाइप) स्किट मध्ये (स्किट शब्द बरोबर आहे ना?) करून आपल्या मायबोलीवरील अभिनेते सदस्यांच्या मदतीने एक १०/१५ मिनिटांचा एपिसोड (अगदी कमी खर्चात) शूट करायचा आणि माबोवर प्रकाशित करायचा (अर्थातच माबो-प्रशासक, अ‍ॅडमिन यांच्या पूर्व परवानगीने). थोडी टीका असली तरी, कुणालाही बोचणार नाही अशा पद्धतीची विनोदनिर्मिती असल्यास ते आक्षेपार्ह नसावे ही अपेक्षा असल्याने ज्या सदस्यांच्या नांवाचा/आयडीचा उल्लेख केला जाईल ते याला मोकळ्या मनाने संमती देतील अशी आशा आहे.

लै म्हनजे लैच भारी .. गायब आयड्यान्चा अनुल्लेख ??? गटग मधे सर्व ठळक आयडी च्या तावडीत सापडच तु आता .. Happy

एकदाही हसू आले नाही. माझ्या (सदस्यत्वाच्या) नावाचा असा वापर करण्याआधी सांगितले असतेत तर आवडले असते. Happy

-'बेफिकीर'!

Pages