बोलताना अडखळणे (Stammering) : पुण्यात कुठे उपचार होऊ शकेल ?

Submitted by Kiran.. on 2 December, 2011 - 02:08

नमस्कार

माझ्या एका सहका-याच्या मुलाला बोलताना अडखळण्याची समस्या आहे. तो आता १० वर्षांचा आहे. कुणाला पुण्यात यासाठी कुठे उपचार होऊ शकतील हे माहीत असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. अनुभव दिले तर बरंच होईल..

नेटवर माहीती मिळतेय.. पण लोकांचे अनुभव महत्वाचे आहेत असं वाटल्याने इथं प्रश्न विचारला आहे. मुंबईत सुद्धा चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.speechfoundation.com/

ह्या लिंक वर पहा. हे डॉक्टर मला वाटते पुर्वी बांद्रया ला प्रॅक्टीस करायचे. नक्की माहीत नाही. माझ्या मित्राच्या मुलाला हा त्रास होता. पण त्यान्नी खुप लहान वयात ट्रीट्मेंट केली होती. मुंबई ला पवई ला हिरानंदानी हॉस्पीटल मध्ये हे उपचार नक्की होतात. तसेच ठाण्याला आनंद नाडकर्णिंच्या आय्.पी. एच. मध्ये तर नक्किच चांगले उपचार होतिल. ते खुप फेमस आहेत.
http://www.healthymind.org/

त्यन्ना विचारुन पहा. ते लोक तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील.
एक मात्र आहे की उपचारानी नक्कि फरक पडतो.

अलियावरजंग इन्स्टीट्यूट

हे भारतातील नव्हे, अशिया खंडातील एक नंबरचे नांव आहे.

मुम्बईत आहे.

आधी ईएन्टी स्पेशालिस्टास दाखवा. तोतरेपणाचे कारण शोधून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतीलच.
पुण्यात एक सचिन गांधी नामक डॉक्टर स्वरयंत्राच्या किचकट शस्त्रक्रियाही छान करतात असे माहिती आहे. पण तोतरेपणा हा तिथपर्यंत जात नाही. ईएन्टि अन मग स्पीच थेरपिस्ट असा सोपा प्रवास आहे. साधा टंग टाय असू शकतो. किंवा अजून मानसिक ब्लॉक. मग सायकिअ‍ॅट्रिस्ट लागेल.

"किंवा अजून मानसिक ब्लॉक. मग सायकिअ‍ॅट्रिस्ट लागेल."

~ श्री.इब्लिस यांच्या या मताशी पूर्ण सहमत. काही वर्षापूर्वी एक अशी केस (पण मुलीच्याबाबतीत होती, वयही थोडे जास्तच होते - १४-१५ असेल) पाहिली होती मी. मुलगी हुशार होतीच अभ्यासात पण स्टॅमरिंगमुळे (तोतरेपणा नव्हे).....दोन वाक्यानंतर शून्यातच जायची. चेहर्‍यावरून समजत होते की ती शब्द/वाक्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत्येय, पण स्वरयंत्रात काहीतरी बिघडले असल्याने की काय ते शब्द बाहेर पडत नसल्याने ती नर्व्हस होत असे. तिच्या वडिलांनी मग एका डॉक्टरमित्राच्या सल्ल्याने तिला सायकिअ‍ॅट्रिस्टकडून ट्रीटमेन्ट दिली. अर्थात तिला आलेला गुण आम्हाला अन्य परिचिताकडून समजला. याच गावात लहानाची मोठी झाल्याने तिच्या लग्नात त्या स्टॅमरिंगवरून काही खेंगटे निर्माण होऊ नये म्हणून मग वडिलांनीचे आपली बदली अन्यत्र करून घेतली. मात्र ती त्या समस्येतून पूर्ण बाहेर पडली होती हे नक्की.

(अवांतर : किरण्यके - शक्य झाल्यास यंदाचा ऑस्करविजेता चित्रपट "किंग्ज स्पीच" जरूर पाहा. हा चित्रपट इंग्लंडच्या राजाला झालेल्या अशाच स्टॅमरिंगबाबतची सत्यकहाणी सांगतो. त्यातही राजाला त्यापासून सुटका देणारा एक सायकियाट्रिस्टच आहे.)

अशोक पाटील

मनापासून आभारी आहे मित्रांनो..

मायबोलीवर नेमकी आणि अचूक माहिती मिळेल असा विश्वास असल्यानेच इथे प्रश्न विचारला आणि खरच चांगली माहिती मिळतेय.

माझा सहकारी व्यवसायानिमित्त पुण्यातच स्थायिक आहे. मुंबई दोन तासावर असल्याने प्रॉब्लेम नाही. त्याच्या मुलाला तोतरेपणा नाही. मला माफ करा, पण स्टॅमरिंगला मराठी शब्द अजून आठवत नाही. हिंदीत हकलाना म्हणतात. स्पीच थेरपी हकलाना ( बोलताना अचानक थांबणे ) वर काम करते का हे ही जाणून घ्याचं आहे. सायकिअ‍ॅट्रिस्टची मदत घ्यायची असल्यास स्टॅमरिंग बरे झाले अशा काही केसेसची माहिती असल्यावर तिकडे जावं असं मला वाटतंय..

hai mazya sasubai oushadh detat. mazya dirala aani etar baryach jananna tyacha gun aala aahe. oushadh ghrguti aslyane tyache side effects mahit. jar chalnar aasel tar pratikriya dya. mhanji oushadh deta yeil
ethe marathi operate karta yet nahi, sry