धुंदी

Submitted by वर्षा_म on 2 December, 2011 - 00:24

विदिपांची क्षमा मागुन
http://www.maayboli.com/node/30924

============================

ढोसताना यापुढे सीमा ठेवायची आहे
एकदा झिंगायची संधी तुलाही द्यायची आहे

भरला जातोच जास्तीचा ग्लास ती चढते तेव्हा
अंतरी इच्छा भले दोनच खंबे रिचवायची आहे

दे उधळुन या सभ्य-शाली नी फुटकळ तोरा
बेधुंद आयुष्य ही मोठी दिक्षा घ्यायची आहे

प्रतिष्ठा खोटी हवी आहे तुला मी जाणले नाही
जीवनाची खरी मजा तूला उमजायची आहे

मी तुझ्याइतकाच नावाजेन ह्याची शाश्वती नाही
मात्र हा आनंद अनुभवायची धुरा पेलायची आहे

गुलमोहर: 

मजेदार झालंय विडंबन

"दे उधळुन या सभ्य-शाली नी फुटकळ तोरा
बेधुंद आयुष्य ही मोठी दिक्षा घ्यायची आहे"
हे अधिक आवडलं.