कॉफी हाऊस

Submitted by भुंगा on 1 December, 2011 - 01:05

नमस्कार मायबोलीकर,

या आपल्या आगळ्या वेगळ्या "कॉफी हाऊस" मध्ये आपलं सहर्ष स्वागत..!!!!!

वेळ मिळेल तसा एकट्याने , ग्रूपने येऊन इथे मस्त गप्पा मारा, धमाल करा.... जोडीला कॉफीचा आस्वादही घ्या Wink (फक्त फोटोत)

clip_image071.jpg

सुचलेला एखादा शेर, कविता इथे शेअर करू शकता..... दिवसभरात ऐकलेलं एखाद्या गाण्याची लिंक टाका.. इतरांनाही ऐकू द्या.....

म्हटलं तर आणखी एक गप्पांचं पान ........ म्हटलं तर चकाट्या पिटायला केलेली आणखी एक सोय. आणखी बरंच काही...... ज्याला जसं वाटेल ते.....!!!

आधी डोकवा तर खरं.... मग ठरवूया..... Happy

सर्वांचं स्वागत...!!!!!!!!!

शटर अप............ !!!!!!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण लेख मराठीतच आहेत ना

आज शुक्रवार, वीकान्त आला!
म भा दि उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी माबोकर नेहमीच उत्सुक असतात.
लेख लिहायला आणि साहित्य वाचनासाठी ध्वनिचित्रमुद्रण करायला वेळ मिळावा म्हणून खुप आधीच म भा दि उपक्रम जाहिर करण्यात आले. तरीही साहित्य वाचन आणि गोजिरे बोल ह्या उपक्रमासाठी साहित्य पाठवण्याची मुदत २५ तारखेपर्यन्त वाढवत आहोत.
आता एकच वीकान्त राहिलाय मंडळी!
शिवाय मोरपिसारा आणि विज्ञानभाषा मराठी हे उपक्रम तुमच्या लेखांची वाट पाहत आहेत!!
साहित्य पाठवण्याची तयारी करताय ना?

IMG-20190213-WA0023.jpg