मांजराने केला उंदराला फोन....

Submitted by ग्लोरी on 30 November, 2011 - 02:29

मांजराने केला
उंदराला फोन
उंदीर म्हणाला
"हॅल्लो कोण ?"

मांजर म्हणाले
म्याँव म्याँव म्याँव
उंदराने घेतली
बिळामधे धाव...

लावुन घेतले
बिळाचे दार
तुटली रेंज अन
कटला कॉल

कटला कॉल पण
फुटला घाम
आत होता नागोबा
करीत आराम

- ग्लोरी

गुलमोहर: 

छान

mast

छान

>>अजुन १,२ कडवे चालले असते
अनुमोदन.

छानच आहे, पण फार छोटी वाटते आहे. माझी पोरगी जाम वैतागेल लवकर संपली म्हणून Happy Proud