कोकण दर्शन (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2011 - 11:52

कोकण दर्शन (भाग १) http://www.maayboli.com/node/30691
कोकण दर्शन (भाग २) http://www.maayboli.com/node/30715#comment-1728200
कोकण दर्शन (भाग ३) http://www.maayboli.com/node/30776

७७) आता आमची बोट सुनामी आयलंडच्या दिशेने निघाली.

७८) सुनामी आयलंड. हे सुनामी यायच्या आधी छोट होत. सुनामी आल्यावर इथे अधीक वाळू फेकली गेली व ती जागा मोठी होऊन त्याला हे नाव देण्यात आल.

७९)

८०) सुनामी आयलंडच्या समोरच्या किनार्‍यावर बोटींग ची व्यवस्था आहे. तसेच उकडीचे मोदक व सरबतेही मिळतात.

८१) स्पिड बोट

८२) किनारा

८३) इथुनच समोर दिसणार्‍या भागाला क्रोकोडाईल पॉईंट म्हणतात त्याच्या आकारामुळे.

८४) आता आम्ही आलो स्नॉर्क्लींगला. त्या अथांग सागरात उतरायला सुरुवातीला भिती वाटली पण एक दोन वेळा स्नॉर्कलींगचा गॉगल लावून पाण्याखाली पाहील्यावर भिती दुर झाली. मला कोरल व काही मासे दिसले. ह्यासाठी टायरवर आजिबात हालचाल करायची नसते. गाईड आपल्याला बरोबर त्या दिशेने घेऊन जातात.

८५) प्रवास संपल्यावर पुन्हा एकदा बोट तितक्याच कष्टाने किनार्‍यावर आणावी लागते. मग माझ्या मिस्टरांनी आणि त्यांच्या मित्रानेही बोटवाल्यांना मदत केली. त्यांना तसे करण्यात मजा आली. बोट वाले बोट ओढताना हुय्या हुय्या काहीतरी ओरडत होते तसे ते दोघेही त्यांच्या बरोब्र ओरडत होते. हे सुद्धा त्यांनी एन्जॉय केल.

८६) इथे जेवण वगैरे आटोपून मग आम्ही मालवणात गेलो. लांबुनच मालवणचा किल्ला पाहीला.

८७) मालवणचा धक्का.

८८) आता आलो सुवर्णमंदीराकडे.

८९) देवळाचा दर्शनी भाग.

९०)

९१)

९२) घुमटावर अष्ट्भुजा गणपती आहेत.

९३) संध्याकाळी आलो रॉक गार्डन येथे. सुर्यास्त पाहण्यासाठी हा पॉइंट प्रसिद्ध आहे.

९४)

९५)

९६) रॉक गार्डनच्या पाठीमागचा भाग.

९७)

९८) माझ फोटो सेशन फुलांवरच अधिक चालू होत.

९९)

१००)

१०१) इथल नयनरम्य सुर्यास्त

१०२)

१०३)

१०४) मालवणातुन सकाळी निघालो आणि सावंतवाडी उरकून आम्ही आंबोली घाटातून कोल्हापुरला निघालो. आंबोली घाट जितका भयानक तितकाच प्रचंड सुंदर आहे. रानफुलांनी पुर्ण घाट स्वागत करत होता.

१०५) मध्ये मध्ये धबधवेही लागत होते.

१०६) मध्येच आपल्या पुर्वजांचे दर्शन झाल्याने मुलांना दाखवण्यासाठी गाडी थांबवली व काच लावूनच फोटो काढले.

१०७)

१०८) महाशयांना आम्ही केळी दिली.

१०९) आता कोल्हापुरात आलो. संध्याकाळी रंकाळा तलावावर गेलो.

११०)सकाळी ५ ला अभिषेक घालण्यासाठी निघालो. हे महालक्ष्मीच्या देवळाचे फोटो दर्शन झाल्यानंतरचे.

१११) देवळावरची कलाकुसर.

११२)

११३)

११४)

११५) त्यानंतर आम्ही शाहू पॅलेसला भेट दिली.

११६) शाहू पॅलेसच्या आवारात एन्ट्री करतानाच हे प्राणी/पक्षी लागतात.

११७)

११८)

११९)

१२०) शाहू महाराजांचे वारस इथे राहतात.

इथून आम्ही थेट घरच्या दिशेला निघालो.

कोकण दर्शनासाठी मायबोलीकर नीधप हिने स्थळे व जेवणाच्या व्यवस्थे सकट उत्तम महीती पुरवली. एक पानभर मेलच पाठवला होता. तो आम्ही नकाशाप्रमाणे बाळगत होतो. खाणावळीही लाजवाब होत्या तिने सुचवलेल्या. धन्स नीरजा.

तसेच काही कल्पना सारीका, साधना, दिनेशद यांनीही दिल्या होत्या. त्यांचेही आभार.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त मस्त मस्त Happy

लांबुनच मालवणचा किल्ला पाहीला.>>>>लांबुन का पाहिला. एक धावती भेट तरी द्यायची ना.

प्रज्ञा, जिप्सि, दिनेशदा धन्यवाद. आत जाऊन यायला १-२ तास तरी गेले असते. त्यातून आदल्या दिवशीच ४ तास पाण्यात घालवल्याने आता जाण्याची इच्छा नव्हती.

अप्रतिम !
<< खाणावळीही लाजवाब होत्या तिने सुचवलेल्या >> खरं सांगू ? त्यावरच्या तुमच्या अधिकारवाणीने केलेल्या कॉमेंटस वाचायलाही आवडलं असतं !

जागु, खुपच सुंदर... फोटो आणि वर्णन पण.. Happy
गोव्याला जाताना अंबोली घाटातुन अनेक वेळा गेली आहे. तेव्हाच्या आठवणी आल्या.. तसेच तिकडेच
तेरेखोलचा किल्ला पण आंम्ही पाहिला होता. खुपच मस्त आहे. Happy

सुंदर प्रचि , सुर्यास्त तर लाजवाब Happy

प्रचि १०७ जिप्सी च्या जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है... त फिट बसेल आशीच Lol

कंसराज, आरती, प्रिती, मानस धन्यवाद.

इनमिनतिन Lol

भाऊ धन्स. त्यात प्रॉब्लेम असा झाला की कुठल्यास खानावळीचा व पदार्थांचा फोटो मी काढला नाही. पदार्थ बघून ते सुचलेच नसावे. पुढच्यावेळी तुमची टिप लक्षात ठेवेन.

मस्त ... Happy

जागु मस्त मस्त गं. Happy
हे सुनामी कुठे आले? तारकर्लीला का? माझ्या ऐकण्यात आलं नाही.
>>मालवणला जाऊन आमचा सिंधुदुर्ग का नाही पाहिला? >> अगदी अगदी Happy
>> त्यावरच्या तुमच्या अधिकारवाणीने केलेल्या कॉमेंटस वाचायलाही आवडलं असतं !>> अनुमोदक नव्हे मोदकं Proud

<< पदार्थ बघून ते सुचलेच नसावे. >> ही कॉमेंटच - काँप्लिमेंट आहे असं गृहीत धरून - खूप बोलकी आहे ! Wink

मस्त झालीय ही पण मालिका. माझीपण कोकण सफर आठवली. फक्त आम्ही स्नार्केलिंग नाही केले. मे मधे बहुतेक नसते ते. तो त्सुनामी बीच मस्त आहे पण तिथे जायच्या आधी मला उगीच भिती वाटत होती नाव ऐकुन.

जागू, तुमची खाणावळीची व रहाण्याच्या जागेची माहीती इथे देवू शकता जी तुम्हाला मिळालीय. अर्थात, तुम्हाला जर प्रॉबलेम नसेल तरच.

धन्यवाद!

खुप सुंदर जागु ताई, मा बोवर बरीचशी कोकणकर आहेत, खरतर मी पुण्याची पण लग्नानंतर कोकणस्त झाले, तेव्हा कळाल कि कोकण खरच खुप सुंदर आहे.

आस Lol

झंपी मला काहीच प्रॉब्लेम नाही. नीरजाची मेल माझ्याकडे आहे. त्यातील माहीती मी इथे टाकते काही वेळाने.