रत्नागिरी भटकंती : भाग 3 अंतिम

Submitted by डेविल on 28 November, 2011 - 15:25

रत्नागिरी भटकंती : भाग 1

रत्नागिरी भटकंती : भाग 2

आजचा दिवस शेवटचा होता. सकाळी जरा उशीराच उठालो.

IMG_3888.jpgIMG_3890.jpg

२ दिवस खुप धावपळ जाली होती. आज जास्त काही फिरायचा बेत नव्हता. हेदवीतील शंकर व गणेश मंदिर बघून परतीचा प्रवास करायचा. साधारणपणे रात्रि ९ पर्यंत मुंबई गाठायाची होती. मागचे २ दिवस एवढे समुद्र किनार्याने फिरत होतो पण मी आणि प्रशांतने गणपतीपुळेला केलेले समुद्रस्नान सोडले तर कोणी पाण्यामधे उतरले नव्हते. आज सर्वजन पाण्यात उतरतील असे ठरले. त्याप्रमाणे ज्यांच्याकडे उतरलो होतो, त्यांच्याकडे पोह्याची ऑर्डर देऊन निघालो.

IMG_3891.jpgIMG_3897.jpgIMG_3898.jpgIMG_3900.jpgIMG_3901.jpg

हेदविचा किनारा स्वच्छ होता. पान्यामधे सर्वाचीच मस्ती चालू जाली, तरीपण निम्म्याहून अधिक जणांना पोहता येत नसल्याने कमरेच्यावर पाण्यामधे कोणी गेले नाहि. जवळपास २ तासानंतर पाण्याच्या बाहेर आलो. तसेच किनारयाच्या बाजूला असलेल्या शंकराच्या देवळात गेलो. पाया पडल्यावर बाजुलाच असलेल्या खड़कावर फिरायला गेलो. तेथे असलेल्या १ कोळ्याच्या माहितीप्रमाने तेथे असलेली घळ बघन्यास गेलो. भरतीमधे यातून पानी उडताना बघून मज़ा येते. पण आम्ही गेलो तेव्हा भरती नव्हती. फ़क्त घळ बघून समाधान मानले, आणि परत फिरलो.

IMG_3902.jpgIMG_3904.jpgIMG_3911.jpgIMG_3914.jpgIMG_3916.jpgIMG_3917.jpgIMG_3927.jpg

पोहे खावून गणेश मंदिर बघायला गेलो तर १२ वाजून गेल्याने मंदिर बंद झाले होते. ते आता ३ च्या नंतर उघडेल असे सांगण्यात आले. एवढा वेळ आम्ही थांबू शकत नव्हतो म्हणून परत यायला फिरलो. गुहागर पासून पुढे खाडी पार करायला बोट होती. तेथे पोहोचेपर्यंत बोट निघाली होती त्यामुळे पाऊन-एक तास फुरसत होती. किनाऱ्यावर तासभर वेळ काढला. बोट आल्यावर त्यात बाईक चढून प्रवास चालू केला. पलीकडे दाभोळला उतरलो. घड्याळात वेळ ३ दाघवत होती, भूक तर लागलीच होती. विन्या लगेच तिथल्या एका हॉटेलमध्ये शिरला.

IMG_3929.jpgIMG_3930.jpgIMG_3935.jpgIMG_3940.jpg

सर्वांचे जेवण होईपर्यंत ४:३०/४:४५ झाले. मनसोक्त मासे खाल्लाने सर्वांनाच आळस भरला होता. बाकी कोणाला प्रश्न नव्हता पण मला दुसर्या दिवशी मला कामावर हजर होवायाचे होते. माझ्या एकासाठी सर्वांनी परत फिरणे मला पटत नव्हते. त्यामुळे मी एकट्याने परत यायचे ठरवले. मला दापोलीला सोडून बाकी सर्व केळशीला राहणार होते. सर्वाना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देऊन परतीच्या बस मध्ये बसलो.

IMG_3945.jpgIMG_3947.jpgIMG_3952.jpgIMG_3954.jpg

३ दिवसाच्या या ट्रेकमध्ये खूप धमाल आली होती. 4 नवे भटके मिळाले होते, त्यांच्या बरोबर फिरताना असे वाटलेच नाही कि आम्ही पहिल्यांदा भेटत होतो. नव्या जागा पालथ्या घातल्या होत्या. ट्रेकर सारखे राहिलो होतो देवळात / उघड्या आकाशाखाली.

IMG_3956.jpg

अवांतर : ऑफिसला हजर राहण्यासाठी परतलो होतो, तर तेथे नवीनच किस्सा माझ्यासाठी तयार होता. जागतिक मंदीचा परिणाम माझ्या कंपनीवर झाला होता. आणि मला त्यादिवशी टर्मिनेशन लेटर मिळाले.
लेटर हातात घेतल्यावर पुढच्या नोकरीची चिंता मनात आली नाही. मनात आले, आईला! उगाच परत यायची घाई केली. अजून एक दिवस थांबलो असतो आणि ट्रेक पूर्ण केला असता तर झाले असते. असेही लेटर मिळणारच होते. निलेश बरोबर बोलणे झाले तर तो नालायक पण खो-खो हसायला लागला. Biggrin अजूनही यावरून माझी टर उडवत असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान उतरवलंय सहलीचं वातावरण !
'टर्मिनेशन लेटर' घेण्यासाठी एवढी धांवपळ मग 'अपाँयमेंट लेटर'साठी तर अप्सरांच्या घोळक्यातुनही उठून पळाल तुम्ही !! विनोद सोडा, पण तुमचा 'अ‍ॅटीट्यूड' आवडला !!!

लयं भारी राव...
तुझा 'अ‍ॅटीट्यूड' खुप आवडला...
तु खुप ग्रेट आहेस मावळ्या...

'टर्मिनेशन लेटर' घेण्यासाठी एवढी धांवपळ मग 'अपाँयमेंट लेटर'साठी तर अप्सरांच्या घोळक्यातुनही उठून पळाल तुम्ही !! >> Biggrin
जल्ला ट्रेकर्सचा 'अ‍ॅटीट्यूड' असाच असावा... >> एकदम बरोबर !!!
पवन >> ग्रेट नाहि आहे मी. साधा मावळा आहे.
दादाश्री >> धन्यवाद!!

ईनमीन तीन , रोमा >> धन्यवाद!!
दिनेशदा >>धन्यवाद. हा आमचा गच्चीवरील पसारा आहे.