पक्षांची सकाळ (भाग - १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 November, 2011 - 15:14

दर रविवरी मी सकाळी कॅमेरा घेऊन टेरेसवर, अंगणात किंवा आमच्या बेडरुमच्या खिडकीत बसते. कारण ह्या वेळी पक्षी कोवळे उन अंगावर घेण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर बसायला येतात. इतर दिवशी फांदिवर बसायला आणि कॅमेरा हातात असायला योगायोग जुळून आला तर एखादा पक्षी कॅमेर्‍याच्या पिंजर्‍यात अडकतो. माझ्याबरोबर माझी मुलगीही तोंडावर बोट ठेउन निरिक्षण करते. कारण तिला माहीत आहे जर आपण आवाज केला तर पक्षी उडून जाणार. तर ही थोडक्यात पक्षांची सकाळ

सुरुवात पुष्पदेऊन म्हणजेच सोनकुसुमाने करते (इनरव्हिलच्या लागोपाठच्या कार्यक्रमांचा परीणाम :हाहा:)

१)

२) उठा उठा सकाळ झाली.

३) उठलो उठलो.

४) बाकीचे उठले का ?

५) धनेश

६) पोपट

७) निबंध लिहाव का ह्याच्यावर ?

८) हळद्या

९) काय म्हणताय राव ? घुबड

१०) आमच सकाळच भांडण झालय. - कोकिळ

११) मी नाहीच बोलणार.

१२) पाणकोंबडीची पिल्ले

१३) पाणकोंबडी

१४)

१५)

१६) ढोक / पेंटेड स्टॉर्क

हे पक्षी कोकणातल्या सकाळचे.
१७) पारवा

१८) सातभाई

१९) खाटीक (रूफस बॅक्ड श्राईक)
आमच्या घरासमोरच्या आवारात आला होता. टेरेसवरून फोटो काढला आहे. वेगळाच वाटला.

२१) हा ऑफिसला जातानाच्या रस्त्यावरच्या सकाळचा. सुगरण

२२) ही माहेरची सकाळ - पाणकावळा/कॉरमॉरंट

२३) हा कोतवाल आमच्याच केबलवरचा

२४) पनवेलमधील एका रिसॉर्ट मधील बदके

२५) हे इमू साहेब कोल्हापुरच्या सकाळचे

२६) हे साहेब रोज येतात पण फोटो काढायला भाव खातात. - भारद्वाज

२७) ह्या बुलबुलांचे २४ तास आमच्या घरात होते काही महिन्यांपुर्वी अगदी त्यांच्या बाळांसकट

२८)

ज्यांची मी नावे नमुद केली नाहीत त्यांची जाणकारांनी द्यावीत ही विनंती. अजुन २-३ पक्षी भाव खातात त्यामुळे त्यांचे फोटो टाकायचे राहीलेत. पण किती दिवस भाव खातील येतीलच कधीतरी कॅमेर्‍यात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा... काय व्हरायटी आहे...
तुझ्या घराला एकदा भेट दिलीच पाहिजे...

जोएस धन्यवाद. कॅनॉनचा आहे.

मार्को पोलो नक्की या पण हे सगळे पक्षी एकदाच नसतात. सध्या घुबड, हळद्या, धनेश, ते छोटे काळे, कोतवाल, कोकीळ, साळुंख्या दिसतात.

Pages