मायबोलीवर प्रवेश करताना (लॉगिन) एक महत्वाचा बदल.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीवर प्रवेश करण्याच्या पायरीत (लॉगिन) एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. हा बदल काही आठवड्यांनी जास्त प्रकर्षाने जाणवेल.

यापूर्वी लॉगिन करण्यासाठी मायबोली आयडी वापरावा लागत असे. या पुढे काही आठवडे आयडी किंवा ईमेल यापैकी काहीही एक वापरून मायबोलीवर प्रवेश करता येईल. तुमच्या परवलीच्या शब्दामधे (पासवर्ड) काहीही बदल नाही आणि तोच चालेल. तुमच्या आयडीतही काही बदल नाही.

मायबोलीकर मायबोलीवर वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात. त्यातलाच एक मार्ग म्हणजे मोबाईल फोन. ज्यांच्याकडे अगदी आधुनिक फोन आहेत त्यांना सहसा देवनागरी आयडी वापरून प्रवेश करायला अडचण येत नाही. पण हे सगळयांनाच जमतं असं नाही. कधी कधी देवनागरीतला आयडी फोनवरून लॉगीन करण्यासाठी किचकट असू शकतो. किंवा काही फोनवर मोबाईलवरून देवनागरीत वाचता आले तरी लिहता येत नाही अशा अनेक अडचणी येतात आणि मग फक्त मोबाईलसाठी म्हणून त्यांना आणखी एक ( Happy ) डुप्लि़केट आयडी घ्यावा लागतो.

आतापासून ही नवीन सोय वापरून तुम्ही ईमेल देऊन मायबोलीत प्रवेश करू शकता. कृपया सगळ्यांनीच ईमेल वापरून लॉगिन करायची सवय करा. काही आठवड्यांनी फक्त ईमेल वापरून मायबोलीत प्रवेश करता येईल. म्हणजे प्रवेश करताना कुठल्या पानावर आहे, तिथे देवनागरी चालते आहे का रोमन हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. भविष्यातल्या इतरही काही सुविधा देण्यासाठी ईमेलद्वारे लॉगिन आवश्यक ठरते आहे.

तुमचा आयडी बदलणार नाही. तो तुम्हाला हवा त्या भाषेत तसाच राहिल आणि तुमच्या लेखनावर पूर्वीप्रमाणेच दिसत राहील.

विषय: 
प्रकार: 

आणि भविष्यात जर तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्हाला लॉगिन पण करता येणार नाही आणि मेल वर पासवर्डही मागवता येणार नाही. त्यामुळे नेहमीच जी ईमेल तुम्ही वाचता/वाचू शकता तीच देणे योग्य होणार नाही का?>> हो पण जो मेल सध्या वापतो तो पोफाईलला देऊन लॉगॉन करता येईल का?

मुक्तेश्वर कुळकर्णी,
तुम्ही माझे सदस्यत्व>> संपादन>> सदस्य खाते येथे जाऊन E - mail address या फिल्डमध्ये असलेला ईमेल आयडी खोडा, तुमचा सध्याचा वापरातला ईमेल आयडी द्या, सेव करा. मग तुम्ही तो ईमेल आयडी देऊन लॉग इन करू शकता.

ई मेल आणि आय डी असे दोन्ही ऑप्शन ठेवावेत.. टिक मार्क करायला एक सोय असली की झालं.. दोन्ही होईल.. log.JPG

लॉगिन विथ इ मेल हा ऑप्शन बाय डिफॉल्ट ठेवावा. म्हणजे मोबाईलवाल्याना तो वापरता येईल.. कॉम्पुटर वापरणारे लोक आय डी च्या ऑप्शनला क्लिक करुन आय डी ने लॉगिन करु शकतील.

हे ठीक आहे, पण लिहीलेल्या साहित्यावरती आयडी काय दिसणार? इ-मेल की घेतलेला आयडी?

शिवाय, फार तर १०% लोकं मोबाईल वरून लॉगिन करत असतील. त्यासाठी समस्त माबोकरांना बदल करायला लावणं योग्य वाटत नाही (इ-मेल टायपायला जास्त वेळ लागतो Proud ). म्हणून जामोप्याला अनुमोदन!

दृपालचा प्रॉब्लेम त्यापेक्षा १००% लोकांना सतावतो, तो सोडवायला प्राधान्य दिल्यास आम्हाला जास्त फायदा होईल असं मला वाटतं. अर्थात, तुम्हाला तुमची शक्ती कुठे खर्च करायची ते जास्त चांगलं समजतं! आज काही तास मला वाटतं कुणालाच लॉगिन करता येत नव्हतं!

चिमण, पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी शेवटचे वाक्य वाच. पुढच्या सगळ्या comment साठी त्याच्या वरचे वाक्य वाच.

>>आज काही तास मला वाटतं कुणालाच लॉगिन करता येत नव्हतं!
काम चालू रस्ता बंद. तसे होते अधूनमधून.. मग ऑफिसमधले काम करायचे. रस्ता बंद काम चालू.

मी पण इंग्रजी अक्षरात आणखी एक आयडी घेण्याच्या विचारातच होते. कारण मोबाईल वरून देवनागरीत वाचता आले तरी स्वताचा देवनागरीतला आयडी लिहिता येत नव्हता.
त्यामुळे जबरदस्ती फक्त आणि फक्त वाचावेच लागत होते. वेळीच बदल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Happy

काही आठवड्यांनी फक्त ईमेल वापरून मायबोलीत प्रवेश करता येईल. >> म्हणजे ईमेल आयडी टायपत बसावं लागेल.....त्यात जरा जास्तच वेळ जाईल.... Sad

favicon आत पूर्ववत दिसतो आहे. तुमच्या गावात दिसे पर्यंत काही तास जाऊ शकतात. पण २४ तासाच्या आत दिसायला हवा.

Pages