तोरणा - लिंगाना - रायगड (व्हाया बोराट्याची नाळ )

Submitted by पवन on 26 November, 2011 - 03:53

प्रत्येक दुर्गप्रेमिंची व प्रत्येक कसलेल्या ट्रेकर्सचा अनेक ट्रेक पैकी एक आवडता ट्रेक म्हणजे अर्थातच तोरणा - लिंगाना - रायगड (व्हाया बोराट्याची नाळ ) . रायगड म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरी आणि हा मार्ग म्हणजे पालकीची वाट . खूप दिवसांपासून या ट्रेक चा प्लान मनात घोळत होता पण या मार्गासाठी एखादा ट्रेकर्स ग्रुप भेटत नव्हता . योगायोगाने हि संधी मला फेसबुक मुळे चालून आली अश्याच एका भटक्या मावळ्याची नुकतीच ओळख झ्हालेली त्या ग्रुपने (सह्याद्री ट्रेकर्स ने ) तोरणा - हरपुड - मोहरीचे पठार - बोराट्याची नाळ - लिंगाणा - वाघेरे - वारांती - रायगड असा २ दिवसांचा प्लान आखला होता. त्यामुळे मला आयातीचा संधी चालून आली मी त्या इव्हेंट ला कमेंट टाकून त्याचा ग्रुप जॉईन करण्याची परवानगी मागितली त्या मावळ्याने अख्या ट्रेक मध्ये पाहुण्यासारखी वागणूक दिली यार.
ह्या ट्रेक साठी आवर्जून उल्लेख करावी अशी मदत मायबोलीकरांची मिळाली. आनंदयात्री या मावळ्याचा "तोरणा (निवी) ते रायगड" हा ट्रेक अत्यंत उपयोगी पडला. त्याबदल त्याला मानाचा मुजरा. आमच्याकडे २ च दिवसांचा कालावधी असल्याकारणाने आम्ही १४ जण खाजगी वाहनाने तोरनेच्या पुढे २२ km अंतरावरील हरपुड या गावापासून ट्रेक ची सुरुवात करणार होतो. त्यामुळे वेळ खूप वाचणार होता. आनंदयात्रीने सांगितल्याप्रमाणे हरपुड ला स्वारगेट वरून एकच बस होती तेही दुपारी ३.३० pm ला आम्ही सकाळी ६.४५ ला स्वारगेट ला पोहोंचलो माझ्यासाठी सर्वच नवीन असलेल्या मावळ्यांची ओळख परेड झाली. स्वारगेट वरून वेल्ह्याला ८ am ला बस होती पण वेळेची बचत करण्यासाठी आम्ही खाजगी वाहनाने वेल्ह्या कडे कूच केली. आमच्यापैकी एक मावळा दिलेली वेळ चुकला होता. ट्रेकर्स लोक वेळेच्या बाबतीत फारच कडक असतात आम्ही त्याला आम्ही पुढे जातो तू आम्हाला जमेल तसे गाठण्यास सांगितले. पण साल्याचे नशीब लयं भारी कारण साला सातारा रोडवरील टोलनाक्याने आमचा ४५ min वेळ घेतला त्यामुळे चुकलेला मावळा आणि आम्ही एकाच वेळी वेल्ह्याला पोहोंचलो.

तोरणा ---

1.jpg

वेल्ह्यात हॉटेल विशाल मध्ये फक्कड मिसळ मारून वरून झक्कास चहा पिला चहाची चव अप्रतीम होती वेल्ह्यातून हरपुड (२२ km) जाण्यासाठी आम्ही एक खाजगी वाहन ठरवले. कसेबसे ७०० rs ला तो येण्यास तयार झाला.

3.jpg

हरपुडच्या पठारवरुन तोरणा...
4.jpg

रस्ता खूप खराब आहे त्याने हरपुड च्या वेशीवर आणून सोडले. त्यावेळी ठीक १२ वाजले होते इथून आमचा खरा प्रवास सुरु झाला. गावकऱ्याला लिंगाण्याचा रस्ता विचारून आम्ही लिंगाण्याकडे प्रस्थान केले गावातून डाव्या बाजूने एक पायवाट खाली दरीत उतरते दरीतून एक ओढा वाहत होता मस्तपैकी पाणी पिले जवळच्या बाटल्या भरून घेतल्या कारण पुढे सिंगापुरात पोहांचे पर्यंत पाण्याची सोय होणार नव्हती .

9.jpg

दरीतून समोरच्या डोंगरावर जाण्याची वाट कांही सापडत नव्हती आम्हाला फक्त गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार एवढेच माहीत के वरती एक पठार लागेल आम्ही कसेतरी झाडीतून वाट काढत पठार गाठले. तिथे एक गुराखी भेटला त्याने समोरचा डोंगर पार करण्यासाठी रस्ता दाखवला. त्या पठारावरून डाव्या बाजूने एक रस्ता न सोडता ३० min आम्ही पठारावर पोहोंचलो तिथे एक गाडी वाट लागली बहुतेक ती(डावीकडे) खाली मढे घाटात जात असावी आम्ही पठारावरून उजवीकडे वळून सरळ ३० मीन चालत गेलो तो डाव्या बाजूने ती गाडी वाट न सोडता तासेचा पुढे गेलो तिथे एक बांधकाम झालेला कट्टा लागला आणि दूरवर नजर टाकली तर लिंगाण्या ने दर्शन दिले.

लिंगाण्याचे प्रथम दर्शन
12.jpg

तेथून पुढे १० min च्या अंतरावरून २ पायवाट जातात उजवी कडील वाट न सोडता थोडे पुढे गेल्यास एक झरा लागला.
या फोटोतील गावाकडे जाणारया रस्त्याने जाउ नका..
13.jpg

मनसोक्त पान्यावर ताव मारून टाक्या फुल करून आम्ही मोहरी गाव जवळ केले.

16.jpg

गावातील लोकांकडे बोराट्याच्या नाळीबद्दल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी या वर्षीचा पहिला मान तुमचा आहे असे सांगितले हे एकूण आमचा हुरूप आणखीनच वाढला(लयं भारी वाटले).पण आनंदयात्री ने त्याच्या लेखात बोराट्याच्या नाळीबद्दल केलेले वर्णन मनात धडकी भरवणारे होते. त्यामुळे मनात थोडीशी भीती होती. मोहरी च्या पठारावरून चालत असताना डाव्या बाजूची वाट पकडायची सोडून चुकून उजवी कडे गेलो आणि नेहमी प्रमाणे रस्ता चुकलो पण समोरचे दृश्य इतके बेभान करून टाकणारे होते की रस्ता चुकल्याचे कांहीच दुख राहिले नाही.
दुपारचे ३ वाजत आले होते भुकेने पोटात कावळे ओरडत होते. जवळपासचे सर्व पाणी संपले होते जवळ कोठे ही पाण्याची सोय नव्हती. आमच्या नशीबाने तिथे एक गुराखी भेटला त्याने तुम्ही पूर्ण उलटे आल्याचे सांगितले नाळ समोरच्या डोंगराच्या पलीकडील बाजूस आहे असे सांगितले. शेवटी मोहरीच्या पठाराला संपूर्ण वेढा मारून आम्ही लिंगाण्या जवळ पोहोंचलो. आम्ही आणि लिंगाणा यात जेमतेम २० फुट अंतर राहिले असेल. पण निसर्गाची किमया मधेखूप खूप खोल दरी होती.

23.jpg26.jpg

मोहरीच्या पठारवरुन लिंगाणा..
27.jpg81.jpg

नेहमी भेट्णारे मित्र कांही भेट्ले नाहीत मग यावरच समाधान मानले

5.jpg

पण इथून लिंगाण्याचे दर्शन घेण्यात एक वेगळीच मजा आहे. खरे तर जे होते ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ना म्हणूनच आम्ही वाट चुकलो. इथेच आम्ही सोबत आणलेली शिदोरी सोडली आणि यथेच्छ ताव मारला. ४ वाजता आलेले होते आम्हाला अंधार पडेपर्यंत नाळ उतरणे गरजेचे होते पण इथे आजून नाळेचा पत्ताच नव्हता गावकरी ने सांगितल्याप्रमाणे नाळ उतरण्यासाठी कमीत कमी ३ तास लागणार होते. शेवटी एक नाळ आम्हाला दिसली पण याकडे बघून कोणीच म्हणणार नाही की ही उतरणे शक्य आहे.

बोराट्याची नाळ..
29.jpg30.jpg31.jpg

भरपूर rock patches छोट्या छोट्या दगडाला तटलेले मोठे मोठाले दगड पाहून मनात धडकीच भरत होती एखादा दगड निसटला तर सगळेक चिरडले जाण्याचे भीती होती.

82.jpg83.jpg84.jpg

तुम्हीच सांगा आमची अवस्था काय झाली असेल.
85.jpg

असे rock patches आहेत.
90.jpg

पण आनंदयात्रीने वर्णिल्या प्रमाणे मधमाश्या वगैरे कांही भेटले नाही. नाळ चांगली प्रशस्त होती. महत्वाचे म्हणजे आता बोरीच्या झाडा झुडपाची अडचण वगैरे म्हणावी तशी राहिली नाही. पण उतरणे इतके अवघड होते कि ६ वाजत आले होते तरी आम्ही जेमतेम ५०० ते ६०० ft उतरलो होतो अंधार बराच पडला होता.

नाळीतुन लिंगाणा दर्शन..
32.jpg

नाळीतून च उजवीकडे एक वाट लींगण माची कडे जाते पण अंधार पडल्यामुळे आम्हाला ती वाट कांही सापडली नाही शेवटी दापोली गाव गाठण्याचे ठरले पण गाव किती दूर आहे याबद्दल कांहीच माहिती नव्हती आम्ही कांही उत्तम ट्रेकर्स नसल्यामुळे सोबत असलेल्या मोबाइलच्या torch पेटवल्या मी ,निलेश , श्याम्या आणि संजय भरभर दरी उतरून पुढे आलो पुढे एक संगम लागला आणि डोक्यात ट्यूब पेटली हा आनंदयात्रीने वर्णिल्या प्रमाणे (सिंगापूरची नाळ आणि बोरात्याची नाळ यांचा संगम तर नव्हे. आनंदयात्रीच्या लेखाच्या प्रिंट्स मागे निलेश कडे राहिल्या होत्या त्यामुळे त्यांची वाट बघण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता ) सिंगापूरच्या नाळेला मात्र पाणी होते आम्ही पाणी पिऊन तिथेच बसलो त्यांना येण्यास तब्बल १ तास लागला मोबाइलच्या उजेडात आनंदयात्रीच्या प्रिंट्स वाचू लागलो त्यात लिहिल्या प्रमाणे एका दगडावर काढलेल्या बाणाच्या शोधात आम्ही पुढे निघालो. संगमापासून जेमेतेम १० min तच एक मिणमिणता दिवा आम्हाला दिसला आम्ही लगेच त्या दिशेने निघालो ओढ्याने आता नदीचे रूप घेतले होते. आम्ही एक आरोळी ठोकली पलीकडून त्याला रिप्लाय आला. आम्ही पळतच त्यांना गाठले. ओढ्यावर तीन गावकरी खेकडे भाजण्याचा(खेकडे बिर्याणी चा ) बेत करत होते. आम्ही पण आमची चूल इथेच मांडली त्यावेळेस साधारण १० pm झाले होते. संजय ने फोडणी दिलेला मसाले भात अगदीच अप्रतीम झाला होता.

जेवण बनवताना मवळे..
94.jpg

जेवण उरकून आम्ही गावातल्या दत्ताच्या मंदिरात मुक्काम केला.

सकाळी ५ am चा गजर लाउन ७ am ला उठलो परत त्याच ओढ्यावर अंघोळी केल्या. मस्तपैकी पोहे बनवून त्यावर ताव मारला.

नाळीचा खालुन घेतलेला फोटो..
138.jpg

दापोली गावातुन लिंगाणा..
34.jpg40.jpg

दापोली गावातून रायगड साठी २ मार्ग आहेत १) दापोली - महाड - रायगड २) दापोली - वाघेरे - वारांती - रायगड वाडी - रायगड
आम्हाला रायगड रायगड वाडीतूनच करायचा होता दापोली वरून सकाळी ९ am ला महाड ला बस आहे. दापोली गावाहून २० min अंतरावरील कोंडी या देवस्थान ला आलो.

देवी वरदायनी मातेचे मंदीर..
141.jpg

तेथून वारांती बस ठीक १० am ला आहे. या बसमुळे आमचे १५ km अंतर चालणे वाचले. वारांती गावाच्या पुढे एक धारण होत आहे . या धरणाच्या भिंतीच्या कडेने भिंतीवर आलो. भिंतीच्या तेथून २ मार्ग लागतात एक शिंदेवाडी मार्गे रायगड वाडीत निघतो दुसरा सरळ डोंगर चढून टकमक टोकाच्या खालील टकमक वाडीत निघतो. वारांती ते टकमक वाडी अंतर २ तासाचे आहे.

ट्कमक वाडीतुन झालेले ट्कमक टोकाचे दर्शन
45.jpg148.jpg

टकमक वाडीतून पुढे रायगड वाडी तेथून रायगड च्या खिंडीत प्रवेश केला.

बेलाग रायगड....
46.jpg

खिंडीत पोहोचण्यास दुपारचे २ वाजले. तितक्यात एक ग्रुप गडावरती निघाला होता . आम्ही भज्यावर मस्तपैकी ताव मारला पाया खूप दुखत होते गड चढण्याची बरयाच जणांची इच्छा होता नव्हती इतक्यात आमच्या ग्रुपमध्ये शर्यत लागली जो कोणी त्या ग्रुप ला महादरवाज्याच्या आत गाठेल तो विनर. मग काय आम्ही पळतच सुटलो अवघ्या ३५ min मध्ये रायगड सर केला. रायगड आज पर्यंत ३ वेळेस सर केला आहे पण प्रत्येक वेळेस टकमक टोक मिस करत होतो. म्हणून या वेळेस सरळ टकमक टोकच गाठले.

जगदीश्वराची पिंड..
116.jpg

मुजरा त्या रायगड बांधणारयाला..
118.jpg

जगदीश्वराचे दर्शन घेऊन महाराजाच्या चरणी माथा टेकवून ,हिरोजी इंदुलकरांना अभिवादन करून बाजारपेठ मार्गे नगारखाना ,सातमहाल पाहून बाकी मावळ्याची वाट पाहत महादरवाज्यात बसलो.

117.jpg153.jpg

सह्याद्री ट्रेकर्सचे मावळे...
111.jpg

सातमहालातुन गंगासागर तलाव व सह्याद्री...
53.jpg54.jpg

वेळे अभावी गड पूर्ण पाहता न आल्यामुळे परत एकदा रायगडावर एक ऐतिहासिक ट्रिप काढण्याचे ठरवले. येताना मात्र गाडी सुसाट निघाली १७ MIN च गड उतरला. खिंडीतून महाड ला शेवटची बस ५ वाजता आहे आम्ही ती मिस केली होती शेवटी एका खाजगी वाहनाला ५०० rs ला ठरवले आणि ७ वाजता महाड गाठले. महाड - पुणे बस मात्र ११ वाजता होती. शेवटी वेळेचा उपयोग आम्ही चवदार तळे पाहण्यासाठी केला. रात्री ११ च्या बस ने पहाटे ४ वाजता पुण्यात प्रवेश केला . अशाप्रकारे ट्रेक अगदी वेळेत आणि ठरविल्याप्रमाणे झाली.
या ट्रेक ने मला बरेच कांही दिले ..........निलेश मुळे मला हा ट्रेक करण्याची संधी मिळाली, सह्याद्री ट्रेकर्स सारखा ग्रुप मला मिळाला. वेल्ह्यातला चहा ,मोहरीच्या पठारावरून लिंगाण्याचे दर्शन बोराट्याच्या नळीतला प्रवास,या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा मिळालेला पहिला मान, मोहरीच्या पठारावरून दिसणारे सह्याद्रीचे ते रौद्रभीषण कातळ, ओढ्याकाठी बनवलेला मसालेभात, टकमक टोकाचा तो बेलाग कडा. पूर्ण प्रवासात गावकरी लोकांनी केलेली मदत, या ट्रेक साठी झालेली मायबोलीकर आनंदयात्रीची अप्रत्यक्ष झालेली मदत हे सर्व न विसरणारे.
मावळ्यानो हा ट्रेक आयुष्यात एकदा तरी करावा.

निसर्गाची किमयाच न्यारी....

143.jpg144.jpg145.jpg146.jpg147.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा मिळालेला पहिला मान >> मस्तच रे , जबरदस्तच झाला हा ट्रे़क Happy

आरे झक्कास ट्रेक झाला तर Happy व्रूतांत पण सहीच, प्र ची पाहुन फार चालायला लावनारी भटकंती दिसतेय पण खुप दिवस करायच ठरवलय बघु कधी होतोय बाकी प्र.ची. सुंदर Happy
वरदायनी मातेचे मंदीर..>>>> छान आहे.
या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा मिळालेला पहिला मान >> मस्तच रे ,+१

छान झाला ट्रेक, आणि वर्णनही छान.....:स्मित:
या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा मिळालेला पहिला मान <<<< अभिनंदन

या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा मिळालेला पहिला nomber छान झाला ट्रेक, आणि वर्णनही छान अभिनंदन अभिनंदन> मस्तच.

मस्त रे पवन राजे ............. दोन नम्बर (माफ कर एक नम्बर आदिच झअलेल आहे मनुन .... Happy )................
या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा पहिल मान मिलल्य बदल अभिनन्दन..................................
(मरथि त्य्पिन्ग कच्चि आहे सम्जुन घे ...........)

मस्तच!!

या वर्षी बोराट्याची नाळ उतरण्याचा मिळालेला पहिला मान >>>>>>>मानंल सगळ्यांना, .तुम्हा सगळ्या मावळ्यांना __/\__ Happy

मस्त लेख व प्रचि. बोराटा नाळीचे व्यवस्थित दर्शन.
बोराटा नाळ उतरतांना साधारण मध्यावर एक मोठा बोल्डर पडला आहे. तो नीट जपून उतरावा लागतो. त्याच्या थोडं खाली आल्यावर उजवीकडील रायलिंग कड्याला चिकटून एक अस्पष्ट वाटेचा वळसा मारल्यावर आपण लिंगाणा व रायलिंगच्या बेचक्यात येतो. हा १००-१५० फुटांचा कातळावरील वळसाच बोराटा नाळीची थरारकतेची ग्रेड वाढवतो. लिंगाणा- रायलिंगच्या घसार्‍याच्या घळीत आल्यावर डावीकडे लिंगणमाचीकडे वाट जाते. आता या माचीवरील वस्ती उठली आहे पण एक-दोन घरे आहेत. तिथून खाली पाने गांवात उतरता येतं.

>>बोराटा नाळ उतरतांना साधारण मध्यावर एक मोठा बोल्डर पडला आहे. तो नीट जपून उतरावा लागतो. त्याच्या थोडं खाली आल्यावर उजवीकडील रायलिंग कड्याला चिकटून एक अस्पष्ट वाटेचा वळसा मारल्यावर आपण लिंगाणा व रायलिंगच्या बेचक्यात येतो. हा १००-१५० फुटांचा कातळावरील वळसाच बोराटा नाळीची थरारकतेची ग्रेड वाढवतो.

आम्ही हा patch पावसाळ्यात केला होता.. तरी लोक सांगत होते की सिंगापूर च्या नाळेने जा.... तो patch केल्यावर कळाले की केव्हढी मोठी रिस्क घेतली होती.

अभिनंदन रे!
Happy

बोराट्याच्या नाळेतून उतरलात - सार्थक झालं... ते आमचं राहून गेलं...

ओढ्यावर 10 pm ला जेवलात (खेकडे बिर्याणी वाला पॅराग्राफ) आणि गावातल्या दत्तमंदिरात मुक्काम केलात!
रात्री उतरून आलात की कॉय?

बाकी मोहरी पठावरून लिंगाणादर्शन म्हणजे काय सांगावं म्हाराजा!!! Happy

हो आम्हास संगमावरच रात्रीचे ९ वाजले होते.
त्या रात्री चंद्राच्या उजेडात संगमावर बसुन तुझ्या लेखाच्या प्रिंट्स वाचताना खुप मजा आली .

मस्तच.