शुभं भवतु |

Submitted by आनंदयात्री on 23 November, 2011 - 23:50

दोस्तहो नमस्कार!

समाजामध्ये अनेक गरजू, वेळेअभावी-पैशांअभावी अडलेले लोक आपल्याला दिसत असतात. आपल्यापैकी अनेकजण कधी वैयक्तिक तर कधी संघटितपणे त्यांना मदत करत असतात. बरेचवेळा असंही होतं, की हाताशी पैसे असतात, मनात इच्छा असते पण त्या मदतीसाठी सत्पात्री झोळी सापडत नाही. या आणि अशा प्रकारच्या सर्व मदतीची आवाहने, प्रतिसाद याविषयीच्या गप्पांसाठी हे पान सुरू करत आहे.

आजूबाजूला एखादी मदतीसाठी आवश्यक परिस्थिती दिसल्यास इथे लिहू, चर्चा करू आणि फलस्वरूप त्या त्या याचकापर्यंत ती मदत पोहोचवूया.. हवं तर दिवसातून थोडासाच वेळ काढून, पण नेमाने इथे या, आणि इतरांचे जगणे सुसह्य करण्यासाठी आपलेही "दोन पैसे" द्या. कुणास ठाऊक, येथील गप्पांमधून पुढेमागे एखादं संघटित कार्यही उभं राहील!

इथल्या चर्चेतून मदत मिळालेल्या प्रत्येकाचं भलं व्हावं, तसेच अशा शुभगोष्टींमध्ये अनेकांचा सहभाग उत्तरोत्तर वाढत जावा या सदिच्छेसह - शुभं भवतु |

विशेष सूचना: या पानाचा हेतू केवळ चर्चेसाठी एक हक्काची जागा उपलब्ध करून देणे हा आहे. सर्व प्रकारची मदत ज्याने त्याने स्वतःच्या जबाबदारीवर करायची आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नचिकेत, खरेच उल्लेखनीय धागा आहे. अभिनंदन आणि धन्यवाद!!

शुभं भवतु.

बादवे, ह.बा., कैलास, विशाल, आर्या, चनस, भुंगा, विवेक इ.,

कधी कधी ठरवून आपल्याला "मैत्र जिवांचे" च्या काही चर्चा ह्या धाग्यावर करता येईल असे वाटत आहे. नचिकेतला त्याची हरकत नसावी

विदिपा...अनुमोदन!
आपल्यालाही चर्चा करता येइल नि बाकीच्यांना ही त्यात सहभाग घेता येतील्..तसेच नवनवीन कल्पना शेअर करता येतील.

अगं दक्षे, मग वाहून गेलेल्या पानावरचे डिटेल्स कसे मिळणार.
फॉर एक्झाम्पल, वरची लंपन ची पोस्ट काही वेळात वाहून जाणार, मग तो नं पुन्हा कसा गो मिळायचा...?

यात्र्या नुसत्याच शुभेच्छा देउन झाल्यात तरी पोष्टी संपायला आल्यात एखाद्याची मदतीची हाक पण अशीच विरुन जाईल ना रे ! Sad

धन्यवाद रे नचिकेता! आम्हाला आमची योग्य 'जागा' दाखवुन दिलीस. Proud

<<फॉर एक्झाम्पल, वरची लंपन ची पोस्ट काही वेळात वाहून जाणार, मग तो नं पुन्हा कसा गो मिळायचा...?<<
हम्म... हे आहे खरं कारण हा चर्चेचा धागा आहे. महत्वाच्या नोंदी, पत्ते, फोन नंबर्स यात्र्याला त्याच्या वरच्या इन्ट्रोडक्टरी पोस्टमधे अ‍ॅड करावे लागतील. (उदा. अश्विनी के ने श्लोकांच्या धाग्यावर केलय तसं)

हेच कचा हेच
मी पण हेच म्हणतेय!
नचिकेआ, समजा मला उद्या कालच्या एखाद्या माहितीचा वापर करायचाय, त्या संस्थेचा पत्ता, कॉ नं वाहून गेलेले असतील.. मग?

ह्म्म... बरं मग कसं करायचं म्हणता?
ती इन्फो वर अ‍ॅड करू?
>> स्ध्या करशीलही, घाग्याचा व्याप वाढल्यानंतर काय?
एखादं अनेक्चर?
खूळाचट सजेशन आहे वाट्ट हे Uhoh

अरे म्हणजे तू वर intro मधेच एखादी लिंक वगैरे द्यायचीस, जिथे हे सारे पत्ते, नं नोंदवलेले असतील

तिथे पत्ते नोंदवायला सगळ्यांनाच अ‍ॅक्सेस असला तर, तू इथे नसतांनाही माहिती अपडेट होत राहिल, असं काहीसं...

कुणाच्या सजेशन्स असतील तर त्या या धाग्यावर तसेच नचिकेतच्या विपुत चिकटवत जा. म्हणजे इथून वाहून गेलं तरी नंतर नचिकेत धाग्याच्या डोक्यावर अपडेट करेल. तो सारखा कसा काय हा धागा बघत बसेल?

शुभेच्छा Happy

यापेक्षा वाहून न जाणारा धागा काढला तर ???

मला वाटलं की तू कायम स्वरूपी धागा काढला आहेस.
पण पोस्ट्स वाहून जाणार असतील तर .........
विचार कर...... कुठल्या स्वरूपाचा धागा योग्य ठरेल
चर्चेत म्हटलंय की प्रस्तावनेत लिंक ठेवायच्या
पण,
प्रस्तावना वाचायची किती लोकांना सवय असते ??

नचिकेत,

हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद! वर्तमानपत्रात अनेकवेळा कोणाच्या तरी शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत पाहिजे आहे, अशा स्वरूपाच्या छोट्या बातम्या येत असतात. त्यापैकी काही जणांना मला आर्थिक मदत करायची इच्छा आहे. परंतु ती कशी करावी हे लक्षात येत नाही. या धाग्याच्या माध्यमातून काही मदत करता आली तर आनंद वाटेल.

ए नचिकेत, बागेश्री बरोबर बोलते आहे. किती आणि काय काय म्हणून अ‍ॅड करशील वरती? त्यापेक्ष अ‍ॅडमिनला विनंती कर हा धागा वाहवायचा थांबवा म्हणून. किंवा तुलाही एडिट करता येईल बहुतेक. त्यामुळे कोणाचीही हाक ऐकली नाही असं होणार नाही, आणि सर्व माहीती शाबूत राहिल.

मास्तुरे वर्तमानपत्रात आलेल्या बातमीत त्या रूग्णासाठी मदतकार्याचा ओघ सुरू रहावा म्हणून एक अकाऊंट नं दिलेला असतो, त्यावर आपण पैसे जमा करायचे असतात. (हे फक्त तुमचा माहितीसाठी) अर्थात तुम्ही त्या शहरात नसाल तर प्रॉब्लेम येऊ शकतो.. पण ऑनलाईन ट्रान्स्फर हा अजून एक उपाय.

या पानाचा हेतू चांगला आणि या ग्रूपच्या उद्देशासाठी समर्पकच आहे. पण थोडा पुढचा विचार करून पहा.

१. प्रत्येक आवाहनाचा विषय वेगळा, व्याप्ती वेगळी. त्यामुळे पैसे गोळा करण्यासाठी लागणारा वेळही वेगळा. मग एकतर अगोदरचा मजकूर वाहून जाईल. किंवा वाहते पान नसले तरी आत कुठल्यातरी पानावर जाईल.
२. वर फोन नं दिले तर सगळे एकाच व्यक्तीला संपादित करता येईल. मग ते सगळे एकाच व्यक्तीवर अवलंबून होईल.

३. काम संपले (किंवा काही कारणाने नंतर मजकूर उडवायचा असेल) तर वेगवेगळ्या प्रतिसादांमधून एका विशिष्ठ आवाहनाशी निगडित प्रतिसाद संपादित करणे ही मोठी डोकेदुखी ठरेल.
४. एखाद्या आवाहनाबद्दल मित्रांना कळवायचे असेल आणि त्याला लिंक पाठवल्यावर त्याने पाहण्याच्या अगोदर इतर दुसर्‍या आवाहनाबद्दल प्रतिसाद आले तर मित्राला काही कळणार नाही आणि कदाचित तो दुसर्‍याच कामासाठी मदत करेल.

एक आवाहन आहे की वैयक्तिक पातळीवर मदत हवी आहे (विशेषतः पैशाची ) अशा प्रकारचे संदेश या ग्रूपमधे टाकू नयेत. जमा केलेले पैसे योग्य व्यक्तीलाच/कारणालाच मिळाले का नाही याची शहानिशा करणे शक्य नसते आणि इंटरनेटच्या माध्यमातून बरेच गैरव्यवहार हि वाढले आहेत. त्यामुळे एखाद्या संस्थेची माहीती देऊन त्या संस्थेला मदत हवी असेल तर त्या बद्दत अवश्य आवाहन करा. पण व्यक्तिला मदत करणे अपेक्षित आहे अशा सारखे धागे उडवले जातील

या कारणासाठी प्रत्येक विषयासाठी/कार्यासाठी वेगळा धागा सुरु करावा. आणि म्हणूनच हा धागा बंद करत आहोत.

इथे मायबोलीवरच ७-८ वर्षांपूर्वी एका व्यक्तीने आपण अपंग आहोत. मला शस्त्रक्रियेसाठी पैशाची गरज आहे असे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या अगोदर अतिशय सुंदर कथा आणि कविता लिहून त्या व्यक्तीने मायबोलीकरांचा विश्वासही संपादला होता. सुदैवाने त्याच्या अकाऊंटमधे पैसे न जमा करता काही मायबोलीकर त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करू लागले तेंव्हा ती व्यक्ती खोटी आहे हे लक्षात आले. सध्याच्या धकाधकीच्या काळात एखाद्या मायबोलीकराने इथे वाचून त्याच्या अकाऊंटमधे पैसे जमा केलेही असते. ही घटना जुन्या मायबोलीकरांना आठवत असेल.
याच कारणास्तव कुठल्याही वैयक्तिक मदतीबद्दल इथे लिहू नका. आपले हात एकदा पोळले आहेत.