तू

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी या भरलेल्या आभाळाचा कुणीच नाही
तेव्हाच मोर होतो मी जेव्हा बरसतेस तू

सारेच सारखे ऋतू मला ना कौतुक त्यांचे
मी वसंत आला म्हणतो जेव्हा बहरतेस तू

मी दगड मानतो देवळांमधल्या मूर्तींना
पण आस्तिक होतो त्यांना जेव्हा विनवतेस तू

ना नाती मानत पण नकळत मी तुझाच होतो
वाळूत आपली नावे जेव्हा गिरवतेस तू

विषय: 
प्रकार: 

"मी वसंत आला म्हणतो जेव्हा बहरतेस तू"

"ना नाती मानत पण नकळत मी तुझाच होतो
वाळूत आपली नावे जेव्हा गिरवतेस तू"

..... या ओळी फार आवडल्या.

<<मी या भरलेल्या आभाळाचा कुणीच नाही
तेव्हाच मोर होतो मी जेव्हा बरसतेस तू

सारेच सारखे ऋतू मला ना कौतुक त्यांचे
मी वसंत आला म्हणतो जेव्हा बहरतेस तू<<<

सुंदर ओळी!! Happy