माझी काशीयात्रा (सचित्र)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे वाचण्याआधी अतिथि देवो भव (http://www.maayboli.com/node/30467) वाचावे. काशीबद्दलची काहीशे वर्षांपुर्वी लिहिलेली ती एक कथा आहे. खुद्द काशीनगरी मात्र त्यापेक्षा कितीतरी प्राचीन आहे.


शंकराच्या काशीतील पुनरागमनाच्यावेळी जशी आरती केली गेली होती तशीच अजुनही गंगातिरी केली जाते.


गंगेच्या सानिध्यात सुर्यनमस्कारांची मजा काही अौरच.


इथेही अठराव्या शतकाच्या सुरुवातीला जयपुरचे राजे महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेले जंतर-मंतर आहे.


सुरजकुंड


जिकडे-तिकडे मुर्त्या, गायी बांधायला सुद्धा.


आणि जिकडे-तिकडे गायी पण.


काशीत मेलात तर मुक्ति मिळते. जिवंत असतांना सुद्धा सर्वांना मुक्तपणे फिरता येते. बदक, बकरी, बैरागी, घाटावर कुणालाच मज्जाव नाही.


कालमर्दानेश्वर: अशी काही नेहमीपेक्षा वेगळी लिंग असलेली मंदिरे पण इथे आहेत.


विश्वनाथाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अजुन काही मंदिरे. विश्वनाथ मंदिरात फोटो नाही काढता येत. जबरदस्त पोलीस पहारा असतो. अनेक जातीय चकमकी इथेच झाल्या आहेत. येथे असलेली ज्ञानवापी (विहीर) ही गंगेच्याही आधिची आहे. या मंदिराइतकीच गर्दी 'न्यु एज' देवी संतोषीमातेच्या मंदिरातही असते. देवादिकांच्या उत्क्रांतीचा ठोस पुरावा. काशीला भारतमातेचेही एक मंदिर आहे.


भोसले घाट आणि पेशव्यांचा गणेश घाट.


रामलिला वाराणसीत हौसेने केल्या जाते. हे त्यात वापरलेले प्रॉप्स तर नाहीत?


नागकुण्ड - ईथुन पाताळात प्रवेश करता येतो. आम्हाला इथे प्रवेश मिळवायला मात्र त्रास झाला. पुजारी मंदिराला कुलुप लावून गायब झाला होता. इतर अनेक जुन्या मंदिरांप्रमाणेच आजकालच्या यात्रेकरुंना या मंदिराचे महत्व नाही. आमच्या रिक्षेवाल्यालाही हे मंदिर माहीत नव्हते. हे दाट मुस्लीम वस्तीत आहे. दिवोदासाने देवांना जसे स्वर्गात परत पाठवले तसेच नागांना पाताळात पाठवले. दिवोदासाचा विवाह नागराज वासुकिची कन्या अनंगमोहिनी हिच्याशी झाला होता. व्याकरणकार पतंजलिचे घर इथे होते असे म्हंटल्या जाते.


मणिकर्णिका घाटाकडे जाणारी एक चिंचोळी गल्ली.


गल्लीच्या तोंडाशी काशीतील असंख्य लिंगांपैकी काही. मुक्ती मिळालेला एक उंदीर.


मुक्तीची वाट पहात असलेली गाय.


मणिकर्णिका कुंड.


घाटाचे जरा बरे रूप.


महास्मशानाच्या लौकिकाला साजेशी महालाकडे.


शेजारील मसणेश्वर


… व त्याचाकडे निर्वीकार पणे पाहु शकणारी कोंबडी.


इतके पक्षी का? प्रेत तर नाही ना त्या बोटीत? अंत्येष्टि म्हणजे अग्निला शरीर अर्पण करणे. त्याआधी ते गंगेत बुडविण्यात येते. शवाला शिवस्वरुप प्राप्त होते. अखंड जळत असलेल्या आगीतुन चिता पेटवली जाते. कवटी फोडल्यावर आत्मा मुक्त होतो. गंगेतील पाणी उरलेल्या राखेवर टाकण्यात येते व लोक मागे न वळता आनंदात निघुन जातात. आता जर ते उघडपणे रडले तर मृताला त्रास होतो असे म्हणतात.


पिशाचमोचन जवळ पिशाच योनीतुन मुक्तीकरता झाडाला ठोकलेले खिळे.


दंडपाणि भैरव व काळभैरव. काशीला मृत्यु पावलात तर तुम्ही जन्म-मृत्युच्या फेऱ्यातुन मुक्त होता. उठसुठ कुणालाही त्याचा (गैर-)फायदा होणार नाही हे पाहणे हे या दोघांचे काम - थोडक्यात म्हणजे अपात्रांना काशीतून हुलकावून लावणे. दंडपाणि याकरिता संभ्रम ाणि उद्भ्रम नामक सहायकांची मदत घेतो. जेंव्हा हे त्यात मग्न नसतात तेंव्हा हे अन्नपुर्णेला काशीतील सर्वांना अन्न पुरविण्यास मदत करतात. गणेश आणि भैरवाप्रमाणे दंडपाणि काशीचे एक प्रमुख दैवत आहे. मुळात हा एक यक्ष होता व नंतर शिवाच्या घोळक्यात त्याला स्थान द्यावे लागले असावे. तो पण एक गणेश आहे, पण ५६ गणेशांपैकी एक नाही. दंडपाणिला खुष केल्याशिवाय देवांनाही काशीत स्थान नाही मिळु शकत.


लाट/कपाळीभैरव: दाट मुस्लीम वस्तीत एका कुंडाच्या बाजुला एक चौथरा व त्यावर हा भैरव. बाहेर तंबु ठोकुन बसलेला एक पोलीस. या भैरवाला ईथुन हलवण्याचे अनेक असफल प्रयत्न झाले आहेत. मुळात हा दंड ६०-७० फुटांचा होता व मणिकर्णिका घाटावरील महास्मशान स्तंभ असावा. भैरव येथे अपात्रांना भैरवी-यातना द्यायचा.


काशीतील काही टिपीकल दृष्ये?


जवळच असलेल्या सारनाथमधील स्तूप. जपानच्या मदतिने डागडुजी सुरु होती. येथुन जवळच बुद्धाचे पहिले प्रवचन झाले होते.
-----------------------------------------
मूख्य संदर्भ: Diana Eck यांचे City of Light (CUP, 1999)
फोटो माझ्या २००६ नव्हेंबर-डिसेंबर दौऱ्यावेळचे

विषय: 
शब्दखुणा: 

शर्मिला, ते फोटो आणि घाटाच्या पायर्‍या बघतानाही.
ओपोराजितो आठवणे हा रेंच्या अद्भुत छायाचित्रणाचा परिणाम की दुसर्‍या कोणी तिथे चित्रण केलच नाही म्हणून माहित नाही. पण पहिली शक्यता अधिक वाटते.

अपात्रांना काशीतून हुलकावून लावणे. दंडपाणि याकरिता संभ्रम ाणि उद्भ्रम नामक सहायकांची मदत घेतो. >>

काशीची बकाल अवस्था होणे हे कदाचित "संभ्रम आणि उद्भ्रम" यांचे काम असु शकेल. जेणेकरुन खर्‍या श्रद्धावंताची परीक्षा होईल, इतर लोक बकालपणा, घाण पाहून दुरच राहतील.

अर्थातच तीर्थस्थळी अशी करणे याचे समर्थन नाही करु शकत.

Pages