इलिनॉय १९ नोव्हेंबर गटग-वृतांत

Submitted by कल्पु on 20 November, 2011 - 21:51

इलिनॉय मधील मायबोलिकरांच गटग एकदाच झाल. अस म्हणतात की चार पाच वर्ष घाटत होत. खालील सभासद (नोंद घ्या की सर्व महिलाच आहेत) आणि त्यांचे 'अहो' उपस्थित होते.
विन
मैना
कल्पु
अमया
मुम्बैकर
सुप्रभात
सुप्रिता

विन आणि त्यांच्या 'अहों' नी यजमानत्व स्विकारून आग्रहाच आमंत्रण पाठवल होत. चहा आणि स्नॅक्स च पॉट्लक असा बेत ठरला होता. ५ ते ??? अशी वेळ ठरली होती. मी आणि आमचे अहो सर्वात उशीरा आलो. मग ओळख-पाळख, जोड्या जमवा, तुम्ही कुठचे, आम्ही कुठचे वगैरे झाल.
तो पर्यंत टेबलावर ही..... पदार्थाची गर्दी झाली होती. कॉर्न भेळ, स्पिनॅच पेस्ट्री, हांडवो, व्हेजि. कटलेट्स, समोसे (२ प्रकारचे), वडा-पाव, गोड शिरा, ढोकळा, फ्रुट सॅलड, कांदा-पोहे, होम मेड बर्फी. काय विचारू नका! काय खाउ नी काय नको अस झाल होत. त्यावर विन ने खास होममेड मसाला चाय केला. खाता खाता भरपूर गप्पा झाल्या. मायबोलीवरील काही आयड्यांना नक्की उचक्या लागल्या असणार. झुडपा आडून इलिनॉयच हितगुज वाचणर्‍यांचा जाहीर निषेध करण्यात आला. मग Northwest suburb centric गप्पा रंगल्या. Northwest suburb कशी रहायला मस्त आहेत आणि नेपरव्हीलच उगाचच हाईप आहे हे एकमुखाने मान्य करण्यात आल! पहीलच गटग असल्याने उपयुक्त महितीच (कुठे काय मिळत याच) ओव्हरलोड झाल. गंमत म्हणजे आम्ही सर्व प्रथमच भेटत आहोत अस वाटलच नाही. घरी जायची काही खास घाई नव्हती कारण तस कुणाला फारस commute नव्हत. अमयाला त्यातला त्यात जास्ती म्हणजे २५ मि!
मैनाचा लेक आणि अमयाची लेक टिव्ही (कंपल्सरी) पाहण्यात मग्न होते. दुसर्‍यांच्या घरातील खेळण्यांशी खेळायला मिळाल्यामुळे मुम्बैकरचा छोटा भलता खूष होता. यजमानांची नन्ही परी मात्र आलेल्या पाहुण्यांचे शूज ट्राय करण्यात मग्न होती. त्यामुळे आपल्या खेळण्यांशी कुणीतरी दुसर पोट्ट खेळतय हे तिच्या गावी ही नव्हत. माझ्या वासरांना शिंग फुटल्याने ती आली नाहीत. याशिवाय नेटवर ओळख झालेल्या--कधीही न पाहिलेल्या लोकांच्या घरी जाण डेंजरस नाही का अशी विचारणा करत होती. आता काय सांगणार त्यांना?

सुप्रिता आणि तिचे अहो मात्र फारच लवकर निघाले. दर महिन्याला गटग करू याना.. असा प्रेमळ आग्रह बर्‍याच लोकांनी धरला आणि ११ वाजता पब्लिक पांगल. सगळे इतके जवळ राहतात की मनात आणल तर महिन्यातून दोन गटग होतील!

विन आणि तिच्या अहोंना खूप धन्यवाद. ५/६ तास खूपच दंगा केला त्यांच्या घरात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्तांत वाचून कालच्या आनंदाचा पुनर्प्रत्यय आला.
नव्या राज्यात वाटणारा अनोळखीपणा एकदम कमी झाला.
विन आणि तिच्या यजमानांनी त्यांच्या घरी दंगा आणि पसारा करायला परवानगी दिली म्हणून त्यांचे आभार! मोठ्या मुलांसाठी विनने डिव्हिडीज आणून ठेवल्या होत्या तसेच बाकी तयारीही चोख होती.
सुप्रभातला सर्व वयाची मुले आणि त्यांचे वागणे अनुभवता आले. सध्याचे स्वातंत्र्य आता ती जास्त एंजॉय करू शकेल अशी आशा.;) सुप्रिता आणि कुटुंबीय यांनी पुढच्या गटगला इतक्या लवकर जायचे नाही असे कबूल करावे. गटगला माबो सदस्यांनी मजा केली तसेच अमाबोकरांनाही (सगळ्या नवर्‍यांनी)केली.
वृत्तांत लिहिल्याबद्दल कल्पूचे (झुडपाबाहेरून) आभार!

अरे बापरे, सगळे ११ पर्यंत होते म्हणजे मी बरंच मिसलं की.
पण, बरं झालं मी घरी परतले..छोटुला खूपच रडत होता..सा.बा. त्याला झोपवत होत्या पण तो अजिबात दाद देत नव्हता. मी घेतल्यावर लगेचच झोपला १५ मिनटात. सा. बा. म्हट्ल्या कि शेवटि मुलांना आईच लागते (अर्थात टोमणा नवर्याकडे बघून ) Happy

खरच खूपच छान वाट्लं सगळ्यांना भेटून.
विन, तिचे यजमान आणि लेकः तुम्हि केलेले अगत्य, उत्साह आणि व्यवस्था खूपच छान होती.

सगळे इतके जवळ राहतात की मनात आणल तर महिन्यातून दोन गटग होतील! >>>अनुमोदन!!

सुप्रिता आणि कुटुंबीय यांनी पुढच्या गटगला इतक्या लवकर जायचे नाही असे कबूल करावे.>>एकदम कबूल!!

झालं का गटग... वा छान.. मस्त वृ. Happy

जुन- जुलै मधे छोटेखानी गटग झालं होतं हो... मी, केदार भेटलो होतो.. त्या वेळेस इकडं कोणी फिरकायचं नाही Proud

एकदम छान वृतांत, कल्पु. तुम्ही सगळे एवढ्या प्रेमानी आलात आणी आपलचं घर समजुन वावरत होतात ह्यातच सगळं आलं. माझ्या आणी अहोंकडुन मनापासुन धन्यवाद, तुम्ही सर्व घरच्या सारखेच वागत होतात त्यामुळे अगत्य वै. काही करण्याच प्रश्नच नाही आला. . आता लवकरच परत भेटुयात Happy

कल्पु, तु लिहिलेला वृ, मस्तच ! (मला $५ चा फाईन नको आहे.) माझी लेक कधी नव्हे ते एकापाठोपाठ २ आवडत्या मुव्हीज पाहायल्या मिळाल्यामुळे खुष होती. त्यामुळेच रात्री ऊशीरापर्यंत थांबता आल. विन चे त्याकरता तिच्यातर्फे खास आभार.

नेपरव्हीलच उगाचच हाईप आहे हे एकमुखाने मान्य करण्यात आल >>> Lol नेपरव्हिल आहे म्हणून शिकागोला शान Happy जाऊदे झालं.

आयड्यांवरून फक्त संयुक्ता गटग झाले असे वाटत आहे.

केदार, तुम्ही का नाही गेलात? जरा बरे असते थोडा वेळ गंमत जंमत करण्यात. सारखे कसले गंभीर नि विद्वत्तापूर्ण असे बोलायचे, लिहायचे!! बा. रा. च्या ए. वे. ए. ठि. ला येऊन काही शिकला नाहीत का?
मला तर गंभीर होताच येत नाही, नि विद्वत्तेची मायबोलीवर काय गरज?

नेपरव्हिल आहे म्हणून शिकागोला शान!
अस का? मग "शान" सोडून पुण्याला का पळून गेलात?
संयुक्ता कस? झाडून सर्वांचे "अहो" आले होते ना!

केदार, तुम्ही का नाही गेलात? जरा बरे असते थोडा वेळ गंमत जंमत करण्यात. सारखे कसले गंभीर नि विद्वत्तापूर्ण असे बोलायचे, लिहायचे!! बा. रा. च्या ए. वे. ए. ठि. ला येऊन काही शिकला नाहीत का?
मला तर गंभीर होताच येत नाही, नि विद्वत्तेची मायबोलीवर काय गरज? >>>>

Rofl

झक्की मी गंभीर व विद्वत्तापूर्ण लिहितो असे आत्ताच मला कळाले. Happy

कल्पना - चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, म्हणून गेलो. Happy

...