सिंहावलोकन

Submitted by आशुतोष०७११ on 18 November, 2011 - 09:31

आशियाई सिंहांचे वस्तीस्थान असलेल्या गीरच्या जंगलाला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. या विचाराला मुर्त स्वरुप अखेर या दिवाळीच्या सुट्टीत लाभले.

आपण भारतीय वन्यजीवांच्याबाबतीत तसे सुदैवीच. एक चित्ता सोडला तर वाघ,सिंह,बिबळ्या आदि प्राणी या भारतभुमीवर अजुनही तग धरुन आहेत. भारतातुन चित्ता नामशेष होण्याची कारणे मात्र वेगळीच आहेत.

अहमदाबादहून राजकोट, जुनागढमार्गे सासणगीरला पोचलो. दोन दिवसाच्या गीर मुक्कामात एकंदर ४ सफारी आधीच बुक करुन ठेवल्या होत्या. मुंबईहून निघण्यापूर्वी मित्रमंडळींनी 'काळजी न्को. गीरला सिंह हमखास दिसतोच' असा दिलासा दिला होता. गीरच्या हॉटेलमध्ये ईतरांशी बोलल्यावर काही रुट्सवर हमखास दिसतो असे कळले.

दुसर्‍या दिवशी सकाळी जंगल सफारीला निघालो तेव्हा रुट नं ३ चे परमिट मिळाले होते. गीर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा गाईड प्रत्येक जिप्सीमध्ये असतो. रुट नं ३ च्या गेटमधुन आत शिरत असतानाच सिंहाच्या गर्जना ऐकु येत होत्या. या सफारीवर असलेल्या शैलेशनामक गाईडने सांगितले की काल संध्याकाळपासुन रात्रभर त्याच्या गावात या गर्जना ऐकू येत होत्या. मनात म्हटलं,चला, सुरुवात तरी बरी झाली. ३ तास जंगलात फिरुन फक्त पक्षीदर्शन झाले, वनराज काही दिसले नाहीत.

IMG_1445 copy_skw.JPGIMG_1448 copy_skw.JPG

क्रेस्टेड ईगल
IMG_1462 copy_skw.JPG

टिटवी
IMG_1469 copy_skw.JPGIMG_1501 copy_skw.JPG

स्पॉटेड आउल
IMG_1509 copy_skw.JPG

काहीसे निराश होउनच परतलो. दुपारच्या सफारीला रुट नं २ मिळाला होता. आमचा जिप्सी ड्रायव्हर अतुल म्हणाला,"रुट नं २,५,६ मे १००% दिखाई देगा". ह्या सफारीवर तामसी लांघा नामक गाईड होता. त्याची चेहरेपट्टी आफ्रिकन वाटली म्हणुन न राहवुन त्याला विचारलंच. त्याने दिलेली माहितीनुसार जुनागढच्या संस्थानिकांच्या पदरी काही अ‍ॅबिसिनीयन गुलाम होते. जंजिर्‍याचा सिद्दी हा सुद्धा मुळ अ‍ॅबिसिनीयनच. ह्या अ‍ॅबिसिनीयाचा अपभ्रंश होऊन हबसाण झाला. हबसाणातुन आलेले ते हबशी. पुढे संस्थान खालसा झाल्यावरसुद्धा हे हबशी जुनागढ आणि आसपासच्या गावातच स्थायिक झाले. आता गाईड, ड्रायव्हर म्हणुन गीरमध्ये काम करतात.

रुट नं २ मधुन आत शिरल्यावर लगेचच एक बिबळ्या वेगात आमच्या जिप्सीसमोरुन पसार झाला. बिबळ्या हा प्राणी जेवढा धुर्त तेवढाच लाजाळु. त्यामुळे बिबळ्या वाघ्,सिंहांप्रमाणे सलग ५-१० मिनिटंसुद्धा दिसणं कठीण. तसेच पुढे निघालो तेव्हा ही वनराणी आमची वाट अडवुन बसली होती.

IMG_1471 copy_skw.JPG

वनराणीने वाट दिल्यावर थोड्या वेळाने पुढे ही जोडी दिसली. दोघंही झोप पुर्ण करायच्या मागे होते. त्यामुळे आमच्या कडे फारसे लक्षं दिलं नाही. एक नजर टाकुन परत झोपी गेले.

IMG_1493 copy_skw.JPGIMG_1473 copy_skw.JPGIMG_1479 copy_skw.JPG

दुसर्‍या दिवशी सकाळी अजुन दिसतील या आशेवर परतलो. दुसर्‍यादिवशी सकाळच्या सफारीला रुट नं ६ मिळाला. जंगलात फिरत असताना ट्रॅकर्सची जीप आम्हाला ओव्हरटेक करुन गेली. आमच्या ड्रायव्हरने त्यांच्या मागेच जाउया म्हणजे सिंह लोकेट झाले असतील तर आपल्याला दिसतील म्हणुन त्यांच्या मागेच नेली. कान्हा,बांधवगडला जसे माहुत सकाळी वाघ लोकेट करतात आणि त्यानंतर 'टायगर शो' असतो तसा प्रकार गीरमध्ये नाही. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे गीरमध्ये हत्तीवरुन सिंह लोकेट करत नाहीत, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या व्हॅन्स सिंह लोकेट करतात आणि त्या रुटवर आलेल्या जिप्सीज तिथे क्रमाने सोडतात. ट्रॅकर्सनी २ सिंह लोकेट केले होते, दोघांचाही आराम चालला होता.

IMG_1504 copy_skw.JPGIMG_1506 copy_skw.JPG

थोडे पुढे गेल्यावर मात्र गीरमध्ये आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. त्याची ही झलक.

IMG_1002 copy_skw.JPGIMG_1520 copy_skw.JPGIMG_1523 copy_skw.JPGIMG_1525 copy_skw.JPGIMG_1536 copy_skw.JPGIMG_1537 copy_skw.JPGIMG_1539 copy_skw.JPGIMG_1543 copy_skw.JPGIMG_1545 copy_skw.JPG

गीरच्या जंगलातुन बाहेर पडलो. तेवढ्यात दुसर्‍या जिप्सीमधल्या काही लोकांनी रुट नं ५ वर सिंहीण आणि तिचे ३ छावे बघितल्याचं सांगितलं. दुपारच्या सफारीला पण रुट नं २ मिळाला होता पण वनराजांनी शेवटच्या सफारीला काही दर्शन दिलं नाही तरीसुद्धा ईतके सिंह दिसल्याचा आनंद मानुन गीरचा निरोप घेतला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.. Happy

तोषा, गीरच्या जंगलातुन फिरवुन आणल्याबद्दल आणि सिंहांचे घरबसल्या दर्शन घडविल्याबद्दल
धन्यवाद ! ............... कारण प्रत्यक्ष दर्शन लाभ घ्यायची आणि लाईव्ह डरकाळ्या ऐकायची माझी तरी हिंमत नाही बाबा................अगदी संरक्षक पेटार्‍यात बसले तरीही ! Happy

@स्वाती, काही पक्ष्यांची नावे लिहिली आहेत. गाईडने सांगितली होती नावे पण फोटोच्या नादात लक्षात राहिली नाहीत.उरलेली नावे जाणकार सांगतीलच.

@दिनेशदा,अजुन तळ्यात मळ्यात चाललय.

आशुतोष...
सुंदर आणि आटोपशीर वर्णन...
वनराज आणि त्यांचे मंत्रीमंडळ प्रत्यक्षात बघण्या एवढा मी 'शूर्-वीर' नाही. त्यामुळे ईथे दाखवलेल्या प्र.ची. मधुनच आनंद घेतला... धन्यवाद...!!!...

आशुतोष, ह्या वर्षी मी पण जुनागढला जावुन आले. माझ्याकडे हि गीर चे काहि फोटो आहेत. पण मला upload करता येत नाहित. तुमची हरकत नसेल तर इथेच टाकु शकते का ते फोटो?
आम्हि गेलो तेव्हा ते अगदि सुस्तावले होते, दुपारची वेळ होती.

Pages