किंगफिशरला कर्ज मंजूर

Submitted by pradyumnasantu on 16 November, 2011 - 22:43

किंग्फ़िशरला कर्ज मंजूर !!

येतो बरंका सायेब!
खरं तर निघत न्हाई पाय
पन मुदत देना्र न्हाई म्हन्तासा
गरीबानं करावं तरी काय?

ईमान कंपनीला तुमी
दिले म्हणे चारशे कोटी
जप्ती आननार सांगतासा
माज्या पन्नास हजारापोटी

त्यांच्या ईमानातून
फिरशीला ढगांच्या तळ्यात
तवा ईचारा वरूणदेवाला
बरसशील का गरीबाच्या मळ्यात

ईमानातली परी आणंल तुमास्नी पक्वानाचं ताट भरल्यालं
तवा माजी पोरं खात असतील शिळंपाकं उरल्यालं
ब्यांक-म्यानेजरसायेब, इमानात जवा किंगफ़िसर बीअर पिशीला
तवा इसरू नगा म्या आनि माझी बायको सुशीला

बाटली हाये आमच्याबी खिशात
ईख पिवून उद्याच्याला, आमी बी येनार आकाशात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

राज्यशास्त्र म्हणजे पोलिटिक्स. ते जीवनात सर्वत्र खेळावे लागते. तुम्ही आम्ही साधी माणसे. त्यात कमी पडतो.
इथले यशस्वी कलाकार पहा. २४,३०,७० प्रतिसाद दिसतील. निम्मे स्वतःचेच असतात. उदा. "अमुकजी,धन्यवाद" "तमुकजी, प्रतिसादाबद्दल आभार" इतेच २४ पैकी १२ प्रतिसादांचे गणित सुटेल. उरले बारा, ते कुठून आले तेही आता ओळखा.>>>>..बोला कविराज आता तुम्हाला जे प्रतिसाद आलेत ते तुमचे नातेवाईक म्हणून की तुमचे काव्य चांगले आहे म्हणून?

किंग्फ़िशरला कर्ज मंजूर !!>>>>>
विदारक सत्य मांडलय आपण.