मी एक मासा

Submitted by pradyumnasantu on 16 November, 2011 - 14:07

मी एक मासा

ठाउक मला प्राक्तन माझे
तरी उगाच पोहतो
अंताकडे नेणा-या प्रवाहासंगे
निवांत वाहत राहतो

काय असते कोण जाणे
अखेरच्या त्या क्षणापार
झळाळत्या कायेवर
कसला मसाला लागणार

अंगोपांगावरुन माझ्या
कशी फिरणार सुरी
गुलाबी नाजूक हातांनी
कशी लागेल मीठ-मिरी

निमूट राहीन पडून
कढईत की पाण्यात
जीवनाची सफर माझ्या
तळ्यापासून तळण्यात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"जीवनाची सफर माझ्या
तळ्यापासून तळण्यात"

छान...... वेगळा विषय आणि सहज हाताळणी.

ठाउक मला प्राक्तन माझे
तरी उगाच पोहतो
अंताकडे नेणा-या प्रवाहासंगे
निवांत वाहत राहतो>>>> छान. कविता आवडली.