कॉंग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांच्या अकलेची नव्हे तर बेअकलेची तारीफ करावी तेवढी थोडी. कधी काय मुफ्ताफळे उधळतील व अकलेचे चांदतारे तोडतील याचा नेम नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्दुसरा अपवाद वगळता सलगपणे राहुल गांधीचे घराणेच दिल्लीची गादी उबवीत आले आहे व आताही युवराज राहुलचेच नाव कॉंग्रेसचा अध्यक्ष आणि मनमोहन सिंगांच्या जागी भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात आहे. अर्थात या लल्लूची तेवढी कुवत आहे काय? हा प्रश्न आहेच. उत्तर प्रदेशात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तेथील एका सभेत युवराजांनी उत्तर भारतीयांना विचारले, ‘पंजाबमध्ये जाऊन किती दिवस मोलमजुरी करणार? किती दिवस महाराष्ट्रात जाऊन भीक मागणार?’ युवराज राहुलच्या या वक्तव्याने राजकीय माहोल पुन्हा एकदा गरम झाला आहे व चारही बाजूंनी संतापाचे काहूर माजले आहे. उत्तर प्रदेशचा विकास होऊ शकला नसल्यामुळेच तेथील गोरगरीब लोकांवर उपासमारीची, बाहेरच्या राज्यांत जाऊन मोलमजुरी करण्याची, भीक मागण्याची वेळ आली आहे. सध्या उत्तर प्रदेशात ‘मायावती’ राज आहे व या राज्यात जिवंत माणसापेक्षा कांशीराम-मायावतीच्या पुतळ्यांचे मोल जास्त आहे. मायावतींचे राज्य हे भ्रष्ट व अकार्यक्षम असल्यानेच उत्तर हिंदुस्थानींवर बाहेरच्या राज्यांत जाऊन भीक मागण्याची वेळ आली असे युवराज म्हणतात, पण ते तितकेसे बरोबर नाही. उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ कॉंग्रेस पक्षानेच राज्य केले व त्यांच्याच राजवटीत उत्तर प्रदेश सर्वाधिक रसातळाला गेले. तेथील मुख्यमंत्र्यांची नामावली काढली तर त्यात सर्वाधिक मुख्यमंत्री कॉंग्रेसचेच दिसतील. इतकेच कशाला देशावर सर्वाधिक ‘राज्य’ करणारे पंतप्रधानही उत्तर प्रदेशनेच दिले. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, व्ही. पी. सिंग असे दिग्गज पंतप्रधान ही कॉंग्रेसचीच देन होती. व्ही. पी. सिंग जनता दल सरकारचे पंतप्रधान होते हे खरे असले तरी मूळचे ते कॉंग्रेसवालेच. तरीही उत्तर प्रदेशच्या लोकांवर भीक मागण्याची वेळ यावी हे युवराजांच्या कॉंग्रेसचेच पाप नाही तर काय?
----------------------------------------------------------------------------------
युवराज राहुल गांधी यांची मुफ्ताफळे
Submitted by विजय आंग्रे on 16 November, 2011 - 10:24
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंग्रे सायेब, तुम्ही लय
आंग्रे सायेब,
तुम्ही लय अँग्री होवून, या मायबोलीवरच्या ५६८ सभासदवाल्या चालू घडामोडी सदरात, या देशाच्या युवराजांबद्दल (तुमचा शब्द) जुनीच मळमळ टाईप करून, त्यात त्यांच्या माय / बाप / आज्या सोबत सगळ्याच काँग्रेसवाल्यांचा उद्धार केल्याने, सव्वाशे कोटीच्या देशात काय कुरळ्या केसाइतका फरक पडणारे?
तशी हे पाप माझे नव्हे असे म्हन्न्याची ष्टाईल आप्ल्या देशात लई जुनी हाय.

ता.क. तुम वर लिव्लंय थितं युवराजांची माय आन बाप काढायचा र्हायलाय. आजी आन पंजोबा हैत.
दुसरे पक्ष आले निवडून तरी काय
कुणीही निवडून आले तरी, मला
कुणीही निवडून आले तरी, मला काय त्याचे? मला दोन वेळा चहा, दोन वेळा नाश्ता, दोन वेळा भरपेट जेवण आणि गप्पा हाणायला नाका मिळाला की झाले, बरोबर ना जा.मो.प्या.?
आज चक्क सकाळमध्ये राहुलवर
आज चक्क सकाळमध्ये राहुलवर (अर्थातच सौम्य) टीका करणारे संपादकीय छापून आले आहे. पण सकाळने काँग्रेसच्या विरोधात लिहिले म्हणजे सूर्य नैऋत्येला उगवला असे म्हणता येईल. राष्ट्रवादी कॉन्ग्रेसविषयी काही कधीकाळी छापले तर मात्र तेव्हा पश्चिमेला उगवला असं कन्फर्म होईल.
http://www.esakal.com/esakal/20111116/4625614508346056638.htm
या अशा घटनाना मराठी मिडीयाच
या अशा घटनाना मराठी मिडीयाच जास्त भाव देते, काल एकाही इतर भाषिक वर्तमानपत्रात या बाबतची बातमी नव्हती की एकाही हिंदी न्युज चॅनलवर. मात्र मराठी न्युज चॅनलवर या बाबत चर्चा आणि वाद-विवाद चालू होते.
राहुल जीं चे बिहार मधील
राहुल जीं चे बिहार मधील यशाबद्दल अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
लेखात शिव्या आहेत कि शिव्यात
लेखात शिव्या आहेत कि शिव्यात लेख आंग्रे साहेब.
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/abdullah-deewane-smri...
दिसला कळफलक लागला बडवायला असं झालंय युवराजांच.
https://www.thehindu.com/news
https://www.thehindu.com/news/national/government-note-in-sc-casts-doubt...
या खटल्यात सरकारने सादर केलेल्या टिपणात काय म्हटलं होतं पहा .
the “physiological limitations” of women officers, lower physical standards of women officers compared to men, prolonged absence due to pregnancy, children’s education, husband’s career prospects, etc, were great challenges for women officers to meet the exigencies of service.
composition of rank and file being male predominantly drawn from the rural background with prevailing societal norms, troops are not yet mentally schooled to accept women officers in command of units”. It explained that “a soldier relies heavily on his physical prowess to engage in combat”.
It said, “Officers have to lead from the front. They should be in prime physical condition to undertake combat tasks. Inherent physiological differences between men and women preclude equal physical performance resulting in lower physical standards. Physical capacity of women officers in the Indian Army remain a challenge for command of units.
It highlighted the environmental and physiological realities of Army posting; the difficult terrains, isolated posts and adverse climate conditions coupled with the internal security situations in the North East and Jammu and Kashmir. “These conditions have a major bearing on the employment of women officers in light of their physiological conditions accentuated by the challenges of confinement, motherhood and childcare,” it said.
Changed battlefield environment, hybrid nature of warfare composing of non-linear battlefields and counter-insurgency operations have also been quoted as reasons against bringing women officers to the frontline
बरं मग ?
बरं मग ?
आता ते मिसाइल , रडार वगैरे
आता ते मिसाइल , रडार वगैरे आले तर बायका तिथे काम करतील की