अधिवास दाखला (Domicile Certificate) कसा मिळवावा?

Submitted by मास्तुरे on 16 November, 2011 - 02:06

पुण्यात १२ वीत असलेल्या विद्यार्थ्यांकडे १२ वी परीक्षेनंतर पुढील प्रवेशासाठी अधिवास दाखला (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे. हा दाखला कसा व कोठून मिळतो? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे तहसिलदार कचेरीत मिळतो.

तुमची जन्मतारीख व तुमचा अधिवास यासाठी काही पुरावे द्यावे लागतात.

१. गावच्या तलाठ्याचे पत्र.. ( पुण्यात तलाठी असतो का माहीत नाही.)
२. जन्म नोंदणी
३. स्कूल लिविंग

४. संबंधिताचे भाऊ, वडील इ यानी दिलेला प्रतिज्ञापत्र - अफेडविट

अशी चार प्रमाण पुरावे दिली की तहसिलदार दाखला देतो. नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल दोन्ही एकदमच करुन घ्या.. सारखीच कागदं लागतात.

मास्तुरे टीपी करू नका.. जलदगतीने हालचाल करा. कुठल्याही क्षणी अधिवास दाखल्याऐवजी मूळनिवासी असल्याचा दाखला अनिवार्य होणार असल्याचं वृत्त आत्ताच हाती आलंय..

मास्तुरे,
पुणे तालुका मुळशी आहे. ते ससूनकडून सोमवारपेठेत जायचा रस्ता आहे ना? ७१ नं बस चा रूट होता तो २० वर्षांपूर्वी Wink तिथे झेडपी कार्यालय आहे बघा? तिथं असेल तलाठी पुण्याचा.

आजकाल जे मिळतं ते Age, Nationality & Domicile असं सर्फिटिकेट मिळतं. पुण्याचा सेतू ऑनलाईन बघा बरं मिळतोय का? सेतू कार्यालय ही करेक्ट जागा आहे त्या कागदासाठी. अन खिशात ५०-५० च्या नोटा ठेवा. शक्यतो काकूंना सोबत न्या. चहापाण्यासाठी हे घे रे बाळा २० रुपये म्हणून त्या ३० रुपयांची बचत करू शकतील तुमची.

(हितचिंतकः मनापासून) इब्लिस

२०.. ३०.... ? मला १९९४ साली दोन्हीसाठी मिळून २०० रु मोजावे लागले होते.. Proud स्टँप पेपरचे वेगळे.. एक पूर्ण दिवस जातो. आपला आणि घरातल्या एका माणसाचा.. पण तेवढा वेळ द्यावाच लागतो. सगळे टाइप करणे, ते तपासून सह्या घेणे.. आणि शेवटी दाखला मिळवणे.. एजंट चांगला मिळणे महत्वाचे.

जामोप्या, ते काकू च करू शकतात!
अन हे लाजून २० रुपये घालतात खिशात. मी स्वत: पुण्यात पोलिसाला १ रुपयाची नोट लाच म्हणुन दिली आहे गुपचुप हातात. त्याने नोट म्हणून गुपचुप खिशात ठेवलिये.

इब्लिस, जामोप्या,

माहितीबद्दल धन्यवाद! मामलेदार कचेरीतही हा दाखला मिळतो असे कालच समजले. आता तिथे जाऊन विचारतो.

पण गेल्यावर्षीतर अधिवास दाखला आवश्यक नाही असे पेपरमधे आले होते ना?
तुम्हाला काही माहिती कळली तर प्लीज ईथे द्या. मलापण उपयोग होईल.
मी तलाठ्याचा दाखला वगैरे आणून ठेवले. पण पेपरमधे ती बातमी वाचल्यावर पुढचे काम थंडावले.

प्रज्ञा, दाखला काढून ठेव. इथे नाही तर तिथे कामास येतो. वेळ असेल तेव्हा करून ठेवावे. अ‍ॅडमिशन गेली उडत. ऐनवेळी निर्णय बदलला तर त्रास होतो फार.

अन हे लाजून २० रुपये घालतात खिशात. मी स्वत: पुण्यात पोलिसाला १ रुपयाची नोट लाच म्हणुन दिली आहे गुपचुप हातात. त्याने नोट म्हणून गुपचुप खिशात ठेवलिये.
----- लाच देणारा आणि लाच घेणारा दोन्ही दोषी असतात. तुमच्या लाच देण्याच्या प्रवृत्तीचा निषेध :स्मित:.

प्रज्ञा, दाखला काढून ठेव. इथे नाही तर तिथे कामास येतो. वेळ असेल तेव्हा करून ठेवावे.
---- अनुमोदन... स्वानुभव - अन्यथा पुढे फार मोठी आर्थिक किंमत, महत्वाचा/ मोक्याचा वेळ किंवा कधी महत्वाच्या संधी पण चुकवावी लागते. अगदीच किरकोळ गोष्ट म्हणुन दुर्लक्ष केले व नंतर खास वकिलातीची चक्कर (कामावर रजा, जायचे-यायचे भाडे) टाकावी लागली. २०० रुपयाची किंमत ५००० $ + मोजता न येणारा मनस्ताप.

२०० रुपयाची किंमत ५००० $ + मोजता न येणारा मनस्ताप.<<
सहाणूभूती!

निषेधाचा आनंद. ते रु.२०० ऐवजी ५ सहस्त्र $ खर्च करताना मनस्ताप होतो ते "ऐकूण आणंड झाळा."
१ रुपयाची नोट आठवते का कशी दिसते? अन शेवटी कधी वापरली चलनात? ज्याची जळते, त्याला कळते. जळतांना विझवावी लागते Wink हव्या असतील तर १ रूपयाच्या नोटा इमेल करतो. प्रिन्टाऊट काढून ठेवा. विझवायला कामी येतात.
ता.क. आता खोटे चलन वापरले म्हणून निषेध करा.

मी गेल्याच वर्षी हा दाखला करून घेतला होता मुलीसाठी.
(तुम्ही महाराष्ट्रात गेली १५ वर्षे वास्तव्य करून आहात असा अर्थ ह्या दाखल्याचा असतो)
माहीती (आठवत आहे त्याप्रमाणे)खालीलप्रमाणे.
लागणारी डॉक्युमेंटस -

१. विजबीले/कॉर्पोरेशन टॅक्स बिले सलगपणे मागील १५ वर्षांची - हो. ही आवश्यक असतात. अनेकांचे डोमिसाईल ह्याच गोष्टीमुळे लटकते. ही तुम्हाला MSEB मधे मिळू शकतात. भाड्याचे घर असेल तर वेगळी प्रोसीजर आहे. आम्ही स्वतःच्या घरात रहात असल्यामुळे ही बिले उपलब्ध होती. ही सर्व बिले दाखवून एक अ‍ॅफिडेव्हीट करून घ्यावे लागते. हे बाहेरसुद्धा करता येते. त्यासाठी कलेक्टर कचेरीत जावे लागत नाही. दिडशे रु. लागले होते ह्या अ‍ॅफिडेव्हिट साठी.
२. वडीलांचा जन्मदाखला/कॉलेज लिव्हींग सर्टीफिकेट (आईचे असले काय किंवा नसले काय्...का...ही फरक पडत नाही )
३. मुलाचा जन्म दाखला, शाळेकडुन्/कॉलेजकडून पण एक दाखला घ्यायचा असतो.
४. फोटो, पॅन कार्ड , पासपोर्ट ची झेरॉक्स
४. १० रु चा रेव्हेन्यु स्टॅंम्प (फॉर्म घेताना ही किंमत कन्फर्म करणे.)
शिवाजीनगर कोर्टासमोर अन्न-धान्य गोदाम म्हणून एक ऑफिस आहे. तिथे सकाळी १० पासून ५ पर्यंत हे कामकाज चालते. सकाळी सकाळी दहाला गेल्यास काम पटकन होते.
पहिल्यांदा फॉर्म आणणे. फॉर्म आणल्यावर नीट वाचणे. बर्‍याच गोष्टी तो वाचून नीट कळतात. मुलीच्या शाळेत हा फॉर्म मिळाला होता आम्हाला.

मग ही सगळी डॉक्युमेंटस जोडायची-सर्व अ‍ॅटेस्ट करून घ्यावी लागतात.

फॉर्म नीट भरला आहे ना ह्याची खात्री ऑफीसमधे चौकशी खिडकीवर करता येते. ती जरुर करून घ्यावी.

सर्व डॉक्युमेंटस दिली की मग ते वेळ देतात त्या वेळेस जाऊन दाखला आणायचा.

मी सर्व डॉक्युमेंट्स प्रोसेस करून मग तो फॉर्म भरला होता व हे सर्व काम मी एकटीनेच केले होते. (तेव्हा माझा नवरा बाहेरगावी होता.) मी पालक म्हणून माझी सर्व डॉक्युमेंटस(माझे बर्थ सर्टीफिकेट, माझे डोमिसाइल, लग्नाचे सर्टीफिकेट वगैरे) जोडले होते. तरीही मुलीचा दाखला मिळाला नाही कारण हे सर्व वडीलांच्या डॉक्युमेंटसवर अवलंबून असते. असो. अजून काही माहीती हवी असल्यास संपर्क करावा. गडबडीत वरील माहीती आठवेल तशी लिहिली आहे. चु.भु. दे. घे.

ता.क.
पहिल्यांदा दाखला मिळाला नाही. मग माझ्या नवर्‍याने तिथे जावून त्याची सर्व कागदपत्रे जमा केली व दाखला घेवून आला. सारांश - आयांनी उगीच तिथे चकरा मारू नये. वडीलांच्या खात्यावर हे काम टाकून द्यावे बिनधास्त.

१५ वर्षे एकाच शहरात रहात नसाल तर काय करायचे? कुठून दाखला घ्यायचा?
<<तरीही मुलीचा दाखला मिळाला नाही कारण हे सर्व वडीलांच्या डॉक्युमेंटसवर अवलंबून असते. >> प्रचंड वैताग.

अरूंधती, सुमेधाव्ही,

माहितीबद्दल धन्यवाद!