पेपर प्लेट पासून बनवलेले वॉल हेन्गिंग

Submitted by पूनम ब on 15 November, 2011 - 15:36

wall hanging.jpg

साहित्य:
२ चौरस आकाराच्या पेपर प्लेट
व्हाईट स्कूल ग्लू
रद्दी पेपर
टिश्यू पेपर
सेलो टेप
अक्रालिक कलर

कृती:
रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे. सर्व डिझाईन कव्हर केल्या नंतर ८-९ तास ड्राय होऊ द्यावे. ड्राय झाल्या नंतर अक्रालिक रंगानी डिझाईन रंगवून घ्यावे. वोल हेन्गिंग आणखी उठावदार बनवण्यासाठी स्टोन आणि स्पार्कल चा वापर करू शकता.
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/

गुलमोहर: 

खुपच छान!!! एकदम नवे आणि फ्रेश!!!

माझी १० वर्षाची लेक हस्तकलेची वेडी आहे. माझा नवरा गमतीने तिला "क्राफ्ट महर्षी" म्हणतो. तीला आता हे दाखवते. म्हनजे पुढला आठवडा दुपारी ३ ते ४ हेच चालेल घरात. ती कुठुन कुठुन पुस्तके जमवुन काय काय करत असते. कालच तिने माझ्या साठी आझ्या ओढणी चा एप्रन हाताने शिवला. अप्रतीम झालाय.

पुनश्च धन्यवाद!!!

मोकिमी, तुझ्या लेकीने बनवलेल्या वस्तू आणि शिवलेल्या अ‍ॅप्रनचाही फोटो हस्तकला विभागात डकव.

मस्त Happy

सर्वांचे खूप खूप आभार प्रतिसाद बद्दल..नवीन कलाकृती बनवण्याच्या उत्साहात फोटो काढायचे राहूनच गेले..त्यामुळे स्टेप बाय स्टेप फोटो देणे जमले नाही..पुढच्या वेळी नक्की स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन. Happy मोकिमी ताई, तुमची लेक खरेच कलाकार आहे हो..ओढणीचा एप्रन खरेच खूप नवीन प्रकार ऐकायला मिळाला..:)
माझा ब्लोग http://kandepoherecipes.blogspot.com/

छान Happy