एअर इंडियाचा महाराजा कंगाल, भिकारी झाला व त्यास भिकारी करणारे मंत्री व लुटमार करणारे अधिकारीच होते. आता अति श्रीमंत, गर्भश्रीमंत वगैरे उपाध्यांनी प्रख्यात असलेले विजय मल्ल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही देशोधडीस लागली. अर्थात किंगफिशर देशोधडीस लागल्यामुळे मल्ल्या यांची श्रीमंती, त्यांचे ऐटबाज राहणीमान, त्यांची छानछोकी यात कुठेही कमी झालेली नाही. त्यांचे रंगढंग सुरूच आहेत, पण किंगफिशर देशोधडीस लागल्याचा सगळ्यात जास्त फटका प्रवाशांना व त्यांच्या कर्मचार्यांना बसला आहे. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरचे काय होणार याची सर्वाधिक फिकीर लागली आहे ती अर्थशास्त्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांना.
कारण बुडालेल्या किंगफिशरला मदतीचा हात द्या होऽऽ अशी करुण किंकाळी मल्ल्या यांनी मारताच मनमोहन सिंग यांनी परदेश दौर्यात असतानाच सहानुभूतीची ‘ओ’ दिली आहे. किंगफिशरला म्हणे सहा हजार कोटींचा तोटा झाला आहे व सरकारी खजिन्यातून मदत करावी अशी मल्ल्या यांची मागणी आहे. विजय मल्ल्या यांच्याकडे म्हणे आता सर्वच बाबतीत खणखणाट आहे. वैमानिकांचे पगार द्यायला पैसे नाहीत. विमानात इंधन भरायला पैसे नाहीत. इतकेच काय, विमानांचे ‘टायर’ बदलायलाही पैसे नाहीत. सध्या किंगफिशरची 27 विमाने विमानतळावर नुसती उभी आहेत. थोडक्यात किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला आली आहे व या भंगार डब्यात सरकारने तेलपाणी घालावे असे मल्ल्या यांचे म्हणणे आहे आणि मल्ल्या यांच्या कंपनीची दारू न पिताच सरकारला झिंग आल्याने
‘काय करणार तो बिचारा? त्याला वाचवले पाहिजे!’ या भूमिकेत सरकार शिरले आहे.
मल्ल्या यांचे इतरही अनेक उद्योग व जोडधंदे आहेत. विजय मल्ल्या हे जगातील दुसर्या क्रमांकाचे मद्यसम्राट आहेत. बंगळुरू आय.पी.एल. क्रिकेट क्लबचे मालक आहेत. नुकतीच जी ‘एफ वन’ नावाची कार रेस झाली त्याचे मालकही हे होतेच. त्यांच्या मालकीचे अनेक महाल, बोटी आहेत. आयपीएलच्या मैदानावर उघड्या कपड्यातील ‘चिअर्स गर्ल्स’ नाचवताना किती कोटींची उधळपट्टी त्यांनी केली हे त्यांनाच माहीत. चिअर्स गर्ल्सच्या उघड्या मांड्यांसाठी क्रिकेट टीमवर पैसा गुंतवताना त्यांना बुडणारे किंगफिशर दिसू नये ही कोणती धुंदी? कर्मचार्यांचे पगार थकले आहेत व विमाने जमिनीवर आहेत हे त्यांना त्या धुंदीत जाणवले नाही व आता ते सरकारकडे आर्थिक मदतीची याचना करीत आहेत.
प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी जी कठोर भूमिका या निमित्ताने घेतली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. बजाज यांनी अत्यंत परखडपणे सांगितले आहे की, ‘खासगी उद्योगांना अशाप्रकारे सरकारी खजिन्यातून आणि बँकांतून मदत करण्याची गरज नाही. दिवाळखोरीने जाणारा एखादा खासगी उद्योग मरत असेल तर त्याला खुशाल मरू द्या. सरकारी मदतीने तो पुन्हा उभा करण्याचे तत्त्व मला तरी मान्य नाही.’ बजाज यांनी जे सांगितले तेच सोळा आणे सत्य आहे. बजाज यांच्यासारखे अनेक उद्योजक खासगी क्षेत्रात पाय रोवून आहेत व देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर टाकत आहेत. ‘किंगफिशर’ची विमाने असतील तर बजाज यांचा स्कूटर्स, रिक्षा वगैरे वाहनांच्या निर्मितीचा प्रचंड व्याप आहे. अनेकदा बजाज यांच्यावरही संकटे कोसळली, पण त्यांनी किंवा त्यांच्यासारख्या बिर्ला, टाटा, गोदरेज वगैरे नामवंत उद्योगपतींनी कधी सरकारकडे मदतीची याचना केल्याचे दिसत नाही. खासगी उद्योग बुडत असेल तर तो खुशाल बडू द्यावा, पण तो वाचविण्यासाठी सरकारकडे हात पसरणे योग्य नाही.
हे खासगी उद्योग सरकारी धोरणांपेक्षा त्यांच्या अव्यवहारी कारभारामुळे, उधळपट्टीमुळेच बुडत आहेत. एखादा दारूडा त्याच्याकडे श्रीमंती आहे म्हणून रोज उंची मद्य पिऊ लागला तर काय होणार? त्याचे यकृत हे त्या अती मद्यपानाने बिघडणार व तो श्रीमंत दारूडा मरणार. शरीरशास्त्र हेच सांगते. विजय मल्ल्या यांनी त्यांच्या विमान कंपनीत जी चमकधमक आणली. सुंदर ललना, इतर मौजमस्तीच्या बाबी आणल्या. तो सर्व प्रकार त्यांना घेऊन बुडाला.
एकीकडे मल्या मोठ्ठे घर
एकीकडे मल्या मोठ्ठे घर बांधण्यात पैसे घालत आहेत तर दुसरीकडे विमानकंपनीची बिलं थकवत आहेत..
श्रीमंताच्या गोष्टी..
जामोप्या आणि मोहन की
जामोप्या आणि मोहन की मीरा,
चांगली चर्चा चाललीये. धन्यवाद!
जामोप्यांच्या या दुव्यात विजय मल्ल्यांनी स्पष्ट म्हंटलंय की परदेशी गुंतवणुकीस परवानगी द्या.
हा बनाव कशासाठी रचलाय त्याचं कारण कळलं आम्हाला!
किंबहुना अजय पाटील इथे म्हणतात तशी परदेशी गुंतवणूक मागील दाराने सुरु झाली आहे. जामोप्यांनी दिलेल्या या दुव्यात स्पष्टपणे म्हंटलंय की किंगफिशरचे लक्झेंबर्ग स्टॉक एक्स्चेंजवर नाव नोंदले जाताच कंपनीचे कर्जदाते (बँका) ग्लोबल डिपॉझिटरी रिसीटस् विकून प्राधान्यभागांचे (प्रेफरन्स शेअर्स) भागभांडवलात रूपांतर करणार (इक्विटी बनवणार).
या आडमार्गाऐवजी मल्ल्यांना थेट गुंतवणूक हवी आहे. ही नेहेमीचीच रड आहे. सरकारकडे पैसा नाही म्हणून खाजगी क्षेत्रात पैसा आहे असं दाखवून निर्गुंतवणूक करायची. मग खाजगी क्षेत्र भिकेला लागलं म्हणून परदेशी पैसा आणायचा.
पार्टिसिपेटरी नोटेद्वारे परदेशातून काळा पैसा भारतीय भांडवलबाजारात (कॅपिटल मार्केट) ओतला जातोय. कसा ते इथे पहा. तशीच काहीशी स्थिती विमानवाहतुकीची होईल. एकदा का हा मार्ग भ्रष्टाचार्यांच्या व्यवस्थितपणे पचनी पडला, की रेल्वे, रस्ते इत्यादि उद्योगही 'संकटात' सापडतील. मग काय आनंदी आनंद गडे!
आपला नम्र,
-गामा पैलवान
निर्गुंतवणूक ही एखाद्या
निर्गुंतवणूक ही एखाद्या प्रॉफिटेबल आणि चांगल्या कंपनीबाबत शक्य असते... जी कंपनी बुडीत आहे, तिची निर्गुंतवणूक करायला गेलं तरी ते शेअर घेणार कोण?
अॅसेटस् तर असतातच ना! उदा.:
अॅसेटस् तर असतातच ना! उदा.: एसटी. नफ्यात नसली तरी एसटी स्टँड फुंकून पैसे करण्याचा घाट घातला जातोय.
की विमाने चालली अन नै चालली,
की विमाने चालली अन नै चालली, काय फरक पडतोय? कुणाला? अन कितीसा?
आजकालच्या जगात विमाने अत्यंत महत्वाची, फक्त ती किंगफिशरचीच असली पाहिजेत असे काही नाही. इतर कंपन्या आहेत.
मल्ल्याला सांगा नोकरांच्या पगाराची काळजी असेल तर दे स्वतःचे थोडे पैसे, नि पुनः असल्या आतबट्ट्याच्या व्यवहारात पडू नकोस!
पैसे संपले तर शेतकर्यांनी काय केले ते. तसे कर म्हणावे!! "काय फरक पडतोय? कुणाला? अन कितीसा?" इतर अनेक लोक आहेत जगात!
च्यायला, काही लोक म्हणजे मी जगतो हे जगावर उपकार अश्या थाटात वावरतात.
बँक कर्मचारी संघटना हेच
बँक कर्मचारी संघटना हेच बोंबलुन सांगताहेत आतापर्यंत , एका अर्थाने बरे झाले ह्या कारणाने विषय
परत चर्चेला आला. ह्यालाच म्हणतात privatisation of profits and nationalisation of losses.
सरकारला यातून काहीच मिळत नाही
सरकारला यातून काहीच मिळत नाही असे थोडेच आहे? मल्ल्या म्हणतो त्याप्रमाणे सरकारी कर किती आहे. १००० भाडे असेल तर तर २००० कर असे ३००० तिकीट आहे....
आजच्या बातमीने सगळे स्पष्ट
आजच्या बातमीने सगळे स्पष्ट झाले !! सगळे फॉरेन फन्डीन्ग साठी !! सगळ्या जगात विमान कम्पन्या तोट्यात आहेत. आर्थात तो बुक लॉस झाला. आज मल्ल्य्या बोलता बोलता म्हणाले की रिअल ईस्टेट विकुन टाकायची नाही. ह्याचाच अर्थ माझ्याकडे अजुन पोटेन्शियल आहे. आणि रस्ता देखिल. बॅन्का गप्प आहेत कारण त्यान्च्या कडे ही रिअल ईस्टेट गहाण आहेच. त्यान्चे पैसे कुठुनही मिळणारच.
अनेक प्रतिक्रिया वाचल्या. त्यावरुन लोक अजुनही वैयक्तिक "मल्ल्या" आणि कम्पनी "किन्ग फिशर" हे एक समजुन त्यात गल्लत करत आहेत. दोन्ही वेगळे आहेत. आज पर्यन्त टाटा किन्वा बिर्ल्ला नी त्यान्ची अनेक युनिटस बन्द केली असतिल. कितीतरी निर्गुन्तवणुका झाल्या असतिल. पण एखाद्या विशिष्ट उद्योग किन्वा लाईन ऑफ बिजनेस ची अशी समस्या जी जगभर भेड्सावत आहे, ती अशी चव्हाट्यावर आली न्हवती. मल्य्या शो ऑफ करण्यात तरबेज असल्याने त्यान्नि ही नाटके केली. उद्या कम्पनी बन्द केली तर कोणी म्हणायला नको की प्रयत्न केले नाहीत. कामगार सन्घटना ना नन्तर सरकार कडे जायला तोन्ड नसेल. म्हणुन स्वतः मल्याच सरकार कडे गेले. एफ्.डी.आय. ला पर्वानगी द्या नाहीतर मी काहीही करायला मोकळा आहे.
मल्या बघताहेत रेमन्ड मध्ये सिन्घानियान्ची काय हालत आहे ते.
आर्थिक दिवाळखोरीमुळे बुडीत
आर्थिक दिवाळखोरीमुळे बुडीत निघालेल्या किंग फिशर एअरलाइन्सला ‘सिकॉम’ पतसंस्थेने मदतीचे पंख दिले आहेत. किंग फिशरला 400 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय ‘सिकॉम’ने घेतला आहे.
तब्बल 468.66 कोटी रुपयांनी तोट्यात असलेल्या किंग फिशर कंपनीची मदतीसाठी धावाधाव सुरू आहे. किंग फिशरचा हा धावा सिकॉमने ऐकला असून कर्जाची तयारी दर्शविली आहे. किंग फिशरची मूळ कंपनी असलेल्या ‘यू बी समूहा’ला ही पतसंस्था कर्ज देणार असल्याचे समजते. किंग फिशरचा या कर्जाशी थेट संबंध नसेल. यू बी समूहच त्यासाठी जबाबदार असेल.
काय आहे ‘सिकॉम’?
‘सिकॉम’ ही महाराष्ट्रातील उद्योगांना कर्ज पुरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेली पतसंस्था आहे. अडचणीत सापडलेल्या वा गरजू उद्योगांना कर्ज पुरविण्याचा अधिकार ‘सिकॉम’ला आहे. राज्य सरकारच्या सेवेतील व्यक्तीच या पंतसंस्थेच्या अध्यक्षपदी असून सिकॉमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा 49 टक्के निधी आहे.
किंगफिशर एअरलाईन्स इंडियन
किंगफिशर एअरलाईन्स इंडियन एअरलाइन्स मध्ये विलीन करून घ्यावी. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटतील. ते शक्य नसेल तर जेट, सहारा इ. कंपन्यांना किंगफिशर विकत घ्यायची परवानगी द्यावी.
सत्यम गाळात गेल्यावर टेक महिंद्राने ती कंपनी विकत घेऊन हातभार लावला, तेच धोरण किंगफिशरच्या बाबतीतही आखता येईल.
मला पण सरकारी पैशाने एक विमान
मला पण सरकारी पैशाने एक विमान कंपनी (हवाई सुंद-यांसहीत) चालू करायचीये...
- किरण मल्ल्या
( सीईओ, नवसागर एयरलाईन्स )
@ मास्तुरे : हे पटले मला. .
@ मास्तुरे : हे पटले मला. . .
@ वेताळ_२५ : तुम्ही प्रश्ण काय विचारता? एकदा सरकारचा 'मित्र' म्हणला कि मग असे प्रश्ण नाही विचारयचे बाबा
....
मग तुमच्या माझ्या सारखे ओरडले काय कि मेले काय ...
किंग्फिशर चा शेअर आज
किंग्फिशर चा शेअर आज +18.31% वाढला, कुणी पैसे कमवले का?
२-४ दिवस वाढेल.. मग गाळात
२-४ दिवस वाढेल.. मग गाळात रुतलेल्या म्हशीगत अडकून पडेल. सत्यमचेही असेच झालेव होते.
शोर्ट टर्म साठी असेच शेअर
शोर्ट टर्म साठी असेच शेअर पकडायचे असतात. ज्यानी घेतले त्यानी दोन दिवसात ३०/३५ % कमावले.
मल्ल्या म्हणतो त्याप्रमाणे
मल्ल्या म्हणतो त्याप्रमाणे सरकारी कर किती आहे. १००० भाडे असेल तर तर २००० कर असे ३००० तिकीट आहे....
अहो तेच सगळे दुसर्या एअरलाईनलाहि लागू पडते. एक किंगफिशर बुडली तर सगळे लोक काय प्रवास करायचे थांबवतील का? इतर कंपन्यांकडे जातील! म्हणजे परत तेव्हढाच कर सरकारला मिळेल! मल्ल्याला नाही खाता येणार एव्हढेच! ज्यांच्या नोकर्या गेल्या त्यांना (पगार देणार्या) कंपनीत नोकर्या मिळतील.
मल्ल्याचे काय एव्हढे कौतुक? जरा बजाज चे ऐका.
मल्ल्या कर्नाटकाचा आमदार की
मल्ल्या कर्नाटकाचा आमदार की खासदार काहीतरी आहे... तिजोरीच्या किल्ल्या त्याच्याच कनवटीला आहेत. सरकारची परवानगी हा केवळ फार्स आहे.
अहो पण असा काही कायदा आहे का
अहो पण असा काही कायदा आहे का की खाजगी कंपन्यांना सरकारने पैसे द्यायचे? नसेल तर तो कायदा करायला विधानसभेचे बहुमत नको का? तशीच पद्धत असते ना लोकशाहीत??
अरे हो, विसरलोच! भारताबद्दल बोलतोय् आपण! कसले कायदे, कसली लोकशाही, गुंडगिरीवर चालणारा देश!!
Manmohan Singh disappoints me
Manmohan Singh disappoints me more and more with every passing day
let it fail and so the banks that made the loans......
मल्ल्या कर्नाटकाचा आमदार की
मल्ल्या कर्नाटकाचा आमदार की खासदार काहीतरी आहे...
---- डॉ. विजय मल्या कर्नाटकातुन राज्यसभेवर अपक्ष खासदार म्हणुन निवडले गेलेले आहेत.
.
.
>>> मल्ल्या कर्नाटकाचा आमदार
>>> मल्ल्या कर्नाटकाचा आमदार की खासदार काहीतरी आहे...
---- डॉ. विजय मल्या कर्नाटकातुन राज्यसभेवर अपक्ष खासदार म्हणुन निवडले गेलेले आहेत.
मल्ल्या २००९ पर्यंत कर्नाटकातून निवडून गेलेला राज्यसभेचा अपक्ष खासदार होता. २००९ मध्ये त्याच्या खासदारकीची मुदत संपली. त्यानंतर तो परत आमदार/खासदार झालेला नाही.
त्या हे पण पहा मधे हे रत्न
त्या हे पण पहा मधे हे रत्न सापडलं. शंका आली म्हणून तारीख पाहिली.. मनोरंजन झालं..
Pages