कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

Submitted by जिप्सी on 13 November, 2011 - 01:06

दिवाळीत सलग ५ दिवसांची सुट्टी आली होती, पण ऐन दिवाळीत घर सोडुन जाणे पसंत नसल्याने पाचही दिवस घरीच होतो. अर्थात याच्या बदल्यात कुठेतरी जाऊन यायचे हा प्लान होताच ;-). मागे उत्तरांचल भटकंती करून आलो तेंव्हाच परत एकदा नोव्हेंबरमध्ये तेथे येण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण एकदा जाऊन आल्याने आता दुसर्‍या ठिकाणी जायचे मन करत होते. एक मित्र खानापूरचा (बेळगाव) असल्याने त्याच्याकडे जाण्याचा प्लान ठरला. मीही हा परीसर पाहिला नसल्याने पटकन तयार झालो. आधी ८-९ दिवसाचा प्लान ठरला, पण एका मित्राचा सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने एकुण ६ दिवसाचा प्लान केला गेला. यात बेळगाव (राजहंसगड, कलावती आई मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बेळगाव किल्ला, कमलबस्ती, कणबर्गी, गोकाक फॉल), हळशी, कित्तुर (कित्तुर किल्ला, कमल नारायण मंदिर), सौंदत्ती (यल्लमा मंदिर, पारसगड, हुळी येथील प्राचीन मंदिर), गोकर्ण, ओम बीच, इडगुंजीचा गणपती, याना हिल्स, सिरसी, मुरूडेश्वर, कारवार (धावती भेट) अशी ठिकाणे कव्हर केली. फुल्ल टु धम्माल आणि भरपूर फोटोज Proud अशा प्रकारे हि भटकंतीसत्कारणी लागली.

याच भटकंतीतील काहि निवडक फोटो मालिकेच्या स्वरूपात मायबोलीकरांसाठी घेऊन येत आहे.

फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो .................... प्रतिसाद म्हणतो मी. काय समजलेत Proud

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
(क्रमश:)

गुलमोहर: 

एक सो एक फोटो...डोळे निववणारे, चकित करणारे, मनाला उभारी देणारे........
सगळ्या फोटोमागे जे सुजाण, सजग, सौंदर्य टिपणारे डोळे आणि डोके आहे त्यांंचेही दर्शन घडवणारे.........
पुढील प्र चि च्यां प्रतिक्षेत......

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! Happy

मस्त रे, तु जात रहा आणि असेच फोटोज टाकुन भुंग्याला जळवत रहा.>>>>>>नक्कीच Wink
अधिक माहितीबद्दल धन्यवाद विवेक Happy

चातका, Proud

फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो >>> टिपीकल उ.कर्नाटकी मराठी.>>>>अगदी अगदी Wink

ते टायटल आमी कलर्स ऑफ उत्तर कॅनडा वाचलं की वो
तुझ्या लेखाचे नाव सारखे "फॉल कलर्स ऑफ उत्तर कॅनडा" असे आहे असेच वाटतेय !!>>>>> Happy Happy

रच्याकने, प्रचि २७ मधील पक्ष्याचे नाव काय आहे?

जिप्स्याण्णा सुंदर असतं की वो तुमचं फोटो म्हणतो मी. तुम्ही पण जरा देऊन सोडा की वो ... नावं म्हणतो मी.

लवकरात लवकर जिप्सीचं लग्न होऊ दे >> भुंग्याला बुधलाभर मध या वाक्याकरता Happy

काय रे जिप्स्या... २७ मधल्या फोटोच नाव काय विचारतोस.. तुला तळ्याकाठी गाती लाटा ही कविता आठवत नाही का त्याला बघितल्यावर...

बाकी फोटोंबद्दल काय बोलणार!!!!!

काय जिप्शीराव फोटो काढता म्हणून सांगू तुम्ही! आमचं दोस्त मंडळी पण म्हणत्यात की जरा असलं फोटो काढून दाखव की जरा! काय ते शिनरी , पक्षी-बिक्षी दाखवता तुम्ही!
असच काढत राव्हा तुम्ही सांगतो ...फोटो ओ Happy

बेळगावला येवून कुंदा आणि मांडे खाल्लं-बिल्लं का नाही! असलं बाहेर काय मिळायचं नाही म्हणून सांगतो.

पहिल्या प्र.ची. तील छकुली मस्त आलिये :-), सुंदर झक्कासच सगळे .........
पण आजुन सुरुवात होते न होते तोच संपला प्रवास आस वाटल , प्र.ची. लवकर टाक दोस्ता ..........
आवडलेले सेव्ह ले तर चालतील ना ? .........

जिप्स्या एकदम झ्याक ........... Happy
प्रचि ३,७,८,१५,२०,२१,२५,२८ खासच.

तुझा बॉस दर महीन्याला तुला सलग ७ दिवसांची सुट्टी देवो आणि तु आम्हाला रोजच आश्या खास प्रचि Wink

काय सुंदर फोटो आहेत.....

हा भाग १ आहे ना?? अजुन फोटो येताहेत ना???

ती नदी घटप्रभा आहे ना? गोकाकची??

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

हा भाग १ आहे ना?? अजुन फोटो येताहेत ना???>>>>>येस्स्स Happy
ती नदी घटप्रभा आहे ना? गोकाकची??>>>>>>नाही, ती मिरजान किल्ल्यावरून दिसणारी नदी आहे. (गोकर्ण जवळ) नाव माहित नाही. Sad

अत्यंत सुंदर प्रकाशचित्रे. पाहून मनाला फार समाधान होते, मन शांत होते.
ही चित्रे माझ्या मित्रांना, कुटुंबियांना बघायला पाठवू का?

योग्या... फोटो मस्तच काढले आहेस...
सगळे आवडले... ते घुबड खुप क्युट वाटतय.. Happy
बाकिचे फोटो पण लवकर येऊ देत....

बेळगावला जाताना रस्ताभर पिवळा टॅबेबुया, फुलल्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत.
(मला त्या फोटोची पण अपेक्षा होती.)
गोव्याहून कोल्हापूरला जायला थेट बस असूनही मी बर्‍याचदा बेळगाव मार्गे जायचो.
बेळगाव्-कोल्हापूर रस्ता खुपच आवडता. बस नुसती घरंगळत गेल्यासारखी जायची. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना खोदलेल्या खडकांत मस्त रंगीबेरंगी थर आणि आकृत्या दिसतात.

अनेक जागांचे असे मनाने काढलेल फोटो आहेत माझ्याकडे, काश जिप्स्याला त्या जागी पाठवता आले तर..
एक अशीच आठवणारी जागा म्हणजे, गगनबावड्यातून खारेपाटणला उतरताना, नदीचे एक भन्नाट वळण लागते. केवळ काही क्षणापुरते बघितलेले ते दृष्य मी आजही विसरु शकत नाही.

Pages