रॉकस्टार

Submitted by मी मुक्ता.. on 12 November, 2011 - 11:19

The most awaited music drama of the year is finally released... "रॉकस्टार" हा म्युझिक ड्रामा तर झालाय पण ती एक प्रेमकथा आहे. आणि त्यात एका रॉकस्टारची कथा फार कमी आहे. एक कोणतीही जनरल लव्ह स्टोरी म्हणून खपून गेली असती (ज्यात हिरो पोटापाण्याचा उद्योग म्हणून गायक आहे.. Wink ) फिल्मविषयी चांगली गोष्ट म्हणजे म्युझिक. गाणी पहिल्यांदा ऐकली तेव्हा अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटलेला. अस वाटत होतं की Rockstar music is lacking of rock पण फिल्म पाहताना फक्त म्युझिकच रॉकचा फील देतं. कारण मूळ कथेत फारसा दम नाही. एक चांगला विषय आणि इम्तियाज सारखा दिग्दर्शक असताना कथा खूप चांगल्या पद्धतीने मांडली जायला हवी होती. जे झालेलं नाहीये. मुळात नायकाचं संगीताविषयीचं प्रेम, रॉकस्टार बनण्याची इच्छा, त्याचं मध्यमवर्गीय असणं यातली कोणतीच गोष्ट ठळकपणे व्यक्त होत नाही. बर्र, पूर्वायुष्य जाऊ दे पण त्याचा नंतरचा पण संघर्ष नीट मांडला न गेल्यामुळे त्याचं अग्रेसिव्ह होणं पण पटत नाही. त्याचा आधीच्या आयुष्यातला इनोसन्स दाखवायला रणबीरला जमलं नाही. मतिमंद वाटतो. त्यामानाने नंतरचा अभिनय बराय..(कदाचित तो त्याच्या स्वभावाच्या जवळ जाणारा असावा.. Wink ) त्याचं हीरविषयीचं प्रेम जसं व्यक्त झालय तसं त्याचं संगीताविषयी पण व्यक्त व्हायला हवं होतं. दोघांची केमिस्ट्री चांगली आहे पण कथेत त्यांच्या प्रेमाची खोलीदेखिल नीट आली नाहीये. नातं बांधलं जातानाचा आणि घट्ट होतानाचा काळ तो इंपॅक्ट सोडत नाही आपल्यावर. आता नर्गिस फाकरीविषयी, इम्तियाजला परदेशी नायिकांमध्ये काय इंटरेस्ट आहे हे एक कळत नाही.. Wink त्याला काश्मिरी ब्युटीच वापरायची होती तर आपली (?) कॅट काय वाईट होती? आणि नाही म्हणायला बॉलीवूडमध्ये इतकी वर्षे काढल्यावर थोडा फार अभिनय करते ती. त्यामानाने नर्गिस म्हणजे काहीच नाही. दिसायला पण कॅटसारखी नाही, नाचताही येत नाही, अभिनयही नाही.. संवाद असायला हवे तितके फाडू नाहीत. पण चांगलं संगीत आणि तेही मुबलक वापरल्यामुळे चित्रपट बघू शकतो आपण शेवटपर्यंत. (पावणेतीन तास..) इर्शाद कामिलचं लिरीक्स पण भारी. भारी अशा अर्थी की एका सिनेमाचं संगीत म्हणून जे असतं त्यापेक्षा प्रयत्नपूर्वक ते वेगळं ठेवायला चांगलच जमलय त्यांना. बाकी, शम्मी कपूर ला बघून भरुन आलं मला तरी. कथानकाला वेग आहे. १४ गाणी असूनही जास्त वाटत नाहीत हे विशेष.
एकूणातच चित्रपट एकदा पाहू शकतो पण एका रॉकस्टारची कथा म्हणून नाही तर एक म्युझिकल लव्ह स्टोरी म्हणून. आणि म्हणायचंच झालं तर चित्रपटाचे खरे रॉकस्टार आहेत रेहमान आणि कामिल.. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच पाहिला 'रॉकस्टार'. हिरोची वेंट्री दमदार. ''साड्डा हक्क' गाण्यात रणबीरने स्टेज पेटवलय अ़क्षरशः , आणखी एका प्रसंगातील त्याची आणि शम्मी कपूरची जुगलबंदी आवडली, म्हणजे शहनाई व गिटार Happy . आणि 'नादान परिंदे' गाण्याच्या सुरुवातीचा त्याने व्यक्त केलेला राग आणि अ‍ॅटिट्यूड. गाणी जाम आवडलीत.
बाकी चित्रपट ठिकठाकच वाटला. तेवढचं काश्मिर व प्रागचं सुंदर दर्शन झालं.

मी मागच्या रविवारी पाहिला... नर्गिस म्ह्हणजे 'अरेरेरेरे".. इतका छान इंटेन्स रोल होता... सोनं करता आलं असतं..

रणबीर मात्र- छान!!! एका कलाकाराचा मॅडनेस, तो मधेच 'लॉस्ट लूक" ही ट्राईड हीज बेस्ट..

गाणी अर्थातच अव्वल!! "साड्डा हक" साँग तर वॉव... जब्बरदस्तं!!

हवा हवा ही सह्ही, बर्बाद करे अल्फाज मेरे- खूप खूप खुप्प्च वेळ रेंगाळत राहिलय मनावर! रेहमानजींनी मोहितकडून भरपूरच चांगलं काम काढून घेतलंय Wink

Pages