रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रिय मिडीया म्हणजे सीएनएन्,बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजुने बातम्या देत होता व रशियन मिडीया त्याच्या बरोबर विरुध्द बातम्या देत होता.

एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतराष्ट्रिय मिडियाचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करुन घेतला.मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मिडीयाच्या बरोबर राहुन आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुध्द रशियन मिडीया जॉर्जियाची कशी चुक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते.एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालुन आलेले सीएनएन,बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मिडीयानी चांगलाच समाचार घेतला.बातमीच्या आधीच्या फुटेजमधे साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मिडीया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत्'.मग थोड्या वेळानी साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे ,त्यानंतर मग आकाशातुन कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करु लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरुन व इतर सर्व बाजुंनी अंगरक्षकांनी गराडा घातला.यावेळी आंतरराष्ट्रिय मिडीयानी सांगितले की आकाशातुन जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे.याचा समाचार घेताना रशियन मिडीयानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतक लगेच घाबरुन जाण्यासारख काहीच झाल नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरु नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.

एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मिडीया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड्'चा इतिहास देत होता.जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरीष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे.जॉर्जियाने विविध देशांकडुन खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मिडीया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डीफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे,इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतक डिफेन्स बजेट कशाला लागत्,तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युध्दसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.

यामध्ये अमेरिकेच्या भुमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भुमिका घेत होते.त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढ म्हणनच बाकी ठेवल होत.रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरीकन डिप्लोमॅट्स व 'एक माणुस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडिल 'पार्टनर्स' आम्हाला समजुन घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारस लक्ष देउ नये.रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली.अमेरिकेचे १२३ वरीष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत्,अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधुन स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतुन जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता.त्याचबरोबर रशियन मिडीया अशीही बातमी देत होते की अमेरीकेनी जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे.तो अमेरीकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणने होते.

हा मुळ वाद तसा जुनाच आहे.पंधरा वर्षांपुर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता.रशियाचे म्हणने आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले.त्यानंतर रशियन शांतीदुत दक्षिण आसेतियात गेले.त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे.त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले.म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरीक झाले.आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे.मग जॉर्जियाने त्श्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतीदुत व रशियाचे नागरीक्(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला.जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करुन सत्ता उलथवण्याचा आहे.साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरुन व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणुन हिणवले होते.पुतीन असेही म्हणुन गेले की साकश्विली बरोबर बोलणी होउ शकत नाहीत्.

आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली.पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मधे गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युध्दाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते.मात्र रशियात रहाणार्‍या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रिय मिडीया व रशियन मिडीया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.

शनिवार १६ ऑगस्ट २००८
बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्‍या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा जॉर्जियाला पाठींबा आहे वगैरे.

प्रकार: 

चिन्या, हे शीतयुद्धाचं सीक्वेल आहे असं म्हण हवं तर. जॉर्जियाला अमेरिकादी पाश्चिमात्य राष्ट्रांचं छुपं पाठबळ आहे. खुद्द जॉर्जियन राष्ट्राध्यक्ष साकश्विली अमेरिकासमर्थक भूमिकेचे आहेत. जॉर्जियाने रशियाविरुद्ध सामरिक तरतूद असावी म्हणून संरक्षणखर्चवाढीखेरीज इतरही व्यूहात्मक डावपेच आखायला सुरुवात केली होती. त्यांनी 'नेटो'च्या सदस्यत्वाकरता प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेशी युद्धसाहित्याच्या पुरवठ्याचे करार, सैन्यप्रशिक्षण इत्यादी लागेबांधे जोडणे आरंभले होते. या प्रयत्नांचे मुख्य कारण म्हणजे रशियाला व्यूहात्मक शह देणे हे होय. उत्तर ओसेशियाप्रमाणे दक्षिण ओसेशियादेखील रशिया काही कारणामुळे आपल्या पंखाखाली आणू पाहतेय, आणि नंतर आपल्या सार्वभौमत्वावरही संकट ओढवू शकते अशी जॉर्जियन सरकाराच्या मनात धास्ती आहे.

दुसरीकडे रशियाचे स्वतःचे दूरगामी हितसंबंध कॉकेशसाच्या या भागात नक्कीच आहेत. कारण या पेट्रोमुलखावर आपले काही अंशी प्रत्यक्ष तर राजनैतिक-वाणिज्य-औद्योगिक पातळ्यांद्वारे काही अंशी अप्रत्यक्ष वर्चस्व असावे असा त्यांचा प्रयत्न आहे. किंबहुना हे वर्चस्व अमेरिकेच्या हातात जाऊ न देण्याकरताही या खटपटी असतील असे वाटते.

खुद्द अमेरिका या (आणि अशा बर्‍याच) बाबतीत दोन माकडांदरम्यान समान लोणीवाटप ठरवू पाहणार्‍या मांजरासारखी कावेबाज भूमिका घेत आहे असं वाटतं. त्याशिवाय जॉर्जियासारख्या छोट्या देशाच्या दक्षिण ओसेशिया, अब्खाझान नामक छोट्या प्रांतातल्या बंडाळीमध्ये एवढा रस कशाला घेतील?(हा रस स्पेन्-फ्रान्स यांमधल्या बास्कात घेणार नाही; कारण तिथे काही लोणी नाही. :फिदी:)

प्रसारमाध्यमांबद्दल म्हणशील तर बीबीसी, अमेरिकेतली सीएनएन वगैरे माध्यमं (हे जगातील बलाढ्य लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ!) अशा प्रसंगांमध्ये एखाद्या कम्युनिस्ट राष्ट्रातील सरकारी माध्यमाच्या प्रॉपगंड्यालाही उणेपणा आणेल असा प्रचारकी धडाका लावतात. तोच प्रकार रशियन प्रसारमाध्यमांतून! फार दूर कशाला जा? या वर्षाच्या सुरुवातीला राज ठाकरेने छेडलेल्या महाराष्ट्रीयवादी आंदोलनाचं हिंदी-इंग्लिश वाहिन्या/वृत्तपत्रांतलं वार्तांकन आणि मराठी वाहिन्या/वृत्तपत्रांतलं वार्तांकन पाहिल्यावरदेखील जनतेचा बुद्धिभेद करण्यास्तव माध्यमांकडून केला जाणारा पक्षपातीपणा दिसून येतो.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ.. तुझ्या पोस्टाला १००% अनुमोदन! तु जे कॉकेशसच्या तेलखाण्यांबाबत म्हणत आहेस ते १००% सत्य आहे.. इराकच्या तेलावर डोळा ठेवुन इराक युद्ध सुरु करणार्‍या बुश -चेनी-कॉन्डलिसा राइस या महा कटकारस्थानी त्रिकुटाचा डोळा जॉर्जियाच्या पुर्वेला असलेल्या अझरबाजानमधील कॉकेशसच्या तेलखाणिवर आहेच.. म्हणुनच तर जॉर्जियाच्या लोकशाहीचा इतका पुळका त्यांना आहे.

थोडक्यात काय.. सध्य परिस्थितीत जगातले सगळे देश.. तेलाच्या टंचाइत.. आपापल्या परीने...ती टंचाइ येन केन प्रकारे दुर करायचा प्रयत्न करत आहे.. इराकचे तेल सहजासहजी त्यांच्या ताब्यात मिळेल या अमेरिकेच्या स्वप्नाला.. इराकमधील गेल्या ४ वर्षांच्या रक्तरंजीत सिव्हिल वॉरमुळे.. तडा गेला आहे. तसेच व्हेनेझुएलाचा ह्युगो शावेज याने त्यांच्या तेलातला एक थेंबही अमेरिकेला देणार नाही अशी शपथ घेतली आहे... नायजेरियामधल्या सिव्हिल वॉरमुळे तिथले तेलही अमेरिकेला ऑफ लिमिट आहे.. आणि सध्या सौदि अरेबियाही.. जगात चायना व भारतासारखे मोठे खरेदिकार लाभल्यामुळे अमेरिकेला व युरोपियन युनिअनला आज काल भिक घालत नाही .. त्यामुळे कॉकेशसमधल्या तेलखाणींवर डोळा ठेवण्याचा हा अमेरिकेचा गनिमी कावा आहे. प्रत्यक्ष जॉर्जिया मधे जरी तेल उत्पादन होत नसले तरी त्यांच्या पुर्वेला असलेल्या अझरबाजानमधील तेल व नॅचरल गॅसचा पुरवठा.... बाकु-तब्लिसी-सिहान.. या पाइपलाइनद्वारे (जी ९० टक्के जॉर्जियामधुन जाते)युरोपमधे येत असतो.. तो पुरवठा खंडित होउ नये म्हणुन अमेरिकेचा व सर्व नाटो देशांचा जॉर्जियाला पाठिंबा.. आता रशियाच्या या प्रतिक्रियेमुळे फ्रांस्,इतर नाटो देश व अमेरिका.. अझरबाजानचा तेलपुरवठा खंडित होतो की काय या चिंतेत आहेत... म्हणुन ताबडतोब काँडलिसा राइस आज आधी फ्रांसला व मग तिब्लिसीला रवाना झाली आहे...

यात रशियाचा पण स्वार्थ असायची शक्यता नाकारता येत नाही.. कारण जर अझरबाजानमधील तेल पुरवठा खंडित झाला तर ते तेल युरोपला जायच्या ऐवजी अझरबाजानला रशियाला विकावे लागेल.. किंवा युरोपला रशियातल्या कॉकशसच्या खाणितले तेल जास्त किंमतीत घ्यावे लागेल.. पण त्यात मला तरी तथ्य वटत नाही कारण रशियाच्या कॉकेशसमधील तेलखाणि तेलाने एक वेळ सम्रुद्ध होत्या पण त्यांचा साठा मध्यपुर्वेतील तेलखाण्यांइतका.. जगातील तेल भाव ठरवण्याइतका मोठा सध्यातरी नाही.

आणि चिन्मय.. कोण खरे सांगत आहे हे सर्व सापेक्ष आहे.. बातम्या कोण सांगत आहे व कोण ऐकत आहे यावर त्या बातम्यांचे खरे खोटेपण अवलंबुन असते.. खरे खोट्याचा शहानिशा करण्यासाठी व जाणुन घेण्यासाठी जो वेळ आणि अभ्यास करावा लागतो.. त्यासाठी आजच्या धकाधकीच्या जिवनात वेळ कोणाला आहे?

फ्,मुकुंद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!!!
तुम्ही दोघांनी लिहीलेले मुद्दे बरोबर आहेत्.पण माझ्यामते इथे फक्त तेलच नाही तर राजकीय वर्चस्व हा जास्त मोठा मुद्दा आहे. सध्या रशियाचे शेजारी देश रशियाविरुध्द भुमिका घेउ लागले आहेत त्यामुळे रशियाला वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशा युध्दाची गरज होती असे काही लोकांना वाटते.तर अमेरीकेच्या विरुध्द भुमिका हल्ली रशिया उघडपणे घेउ लागला आहे उदा.इराणचा आण्विक कार्यक्रम्,अँटी मिसाइल बसवणे वगैरे.त्यामुळे अमेरीकाही स्वतःच वर्चस्व वाढ्वण्यासाठी रशियाच्या शेजारी देशांचा उपयोग करत आहेच आणि यातुन तेलाचा फायदाही त्यांना होण्याची शक्यता आहे.

वरील तिन्ही विवेचनांना माझे १०० टक्के अनुमोदन. संघर्षाची कारणे कळली. दोष कुणाचा याला काहीच अर्थ नाही. खरे तर अमेरिकेचा पाठिंबा नसता तर जॉर्जिया सारखा लहान देश रशिया सारख्या बलाढ्या देशासमोर उभा राहिलाच नसता.

सगळ्यात गंमत म्हणजे परवा जोन स्ट्यूअर्ट च्या डेली शो वर. अमेरिकेचे युनो मधले प्रतिनिधी नि काँडी राईस मोठमोठ्यानी ओरडत होते, की 'एका स्वतंत्र देशाच्या राज्यकर्त्यांना उडवून देण्याचा अधिकार दुसर्‍या देशाला नाही!' आणि मग हळूच 'युरोपमधे' असे म्हणत होत्या. म्हणजे मध्यपूर्वेत इराकच्या बाबतीत अमेरिकेने काय केले हो? असा प्रश्न कुणि विचारू नये, कारण युऱोप वेगळे नि मध्यपूर्व वेगळे!!
राजकारणामधे निर्लज्जपणा, खोटेपणा यांना काही लिमिट नसते! अमेरिका तर जगात त्यात नंबर एक. त्या मानाने लालू प्रसाद नि इतर भारतीय नेते अजून कच्चे लिंबू!

चिन्मय.. तु म्हणतोस ते बरोबर आहे.. या भागात राजकिय वर्चस्व असावे हा मुळ मुद्दा आहे.. रशिया व अमेरिका-युरोपिअन युनिअन हे दोघेही या युरोशियामधे राजकिय वर्चस्व ठेउ पाहात आहेत.. आणि त्याचे मुळ कारण कॅस्पिअन समुद्रातील व कॉकेशसमधील तेल हेच आहे... ते कसे हे मी अगदी सोप्या भाषेत समजावायचा प्रयत्न करतो..

तु जर या भागाचा इतिहास बघितलास तर गेल्या १०० वर्षात आल्फ्रेड नोबेल्(ज्याने नोबेल पारितोषिक देण्यास पैसे दिले आहेत्)पासुन ते दुसर्‍या महायुद्धात हीटलर.. ते सध्याचे बुश-चेनी-व यांच्यापर्यंत..(व सध्या वेगाने विकसित होणारा चायनाही!) सगळ्यांनी या कॉकेशसमधील व युरोशियामधिल तेलखाणींवर आपला डोळा ठेवला आहे. १९४५ ते १९९० पर्यंत.. जोपर्यंत संयुक्त रशिया होता... तो तेलसाठा फक्त मॉस्कोच्या हातात होता... पण रशियाची शंभर छकले झाल्यापासुन.. या तेलखाणी आता अझरबाजान्,कझाकिस्तान्,आर्मेनिया व टर्कमेनिस्तान अश्या देशात विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे अचानक मॉस्कोची या तेलावरील मालकी निघुन गेली.. व या सर्व भागातील तेलसाठ्यावर परत एकदा अमेरिकेचे( वरच्या माझ्या पोस्टात दिलेल्या कारणांमुळे) व युरोपिअन युनिअनचे लक्ष गेले.. २१ व्या शतकात जर युरोपला व अमेरिकेला आपले जिवनमान राखायचे असेल व आपले औद्योगीक विकासिकरणात वर्चस्व टिकवायचे असेल तर या भागातिल तेलाचा व नॅचरल गॅसचा पुरवठा त्यांना महत्वाचा वाटु लागला... मग ९० च्या व या दशकात ब्रिटन्,फ्रांस व अमेरिकेने त्याला पुरक असे राजकिय पवित्रे घेण्यास सुरुवात केली. ते पवित्रे घेताना वर झक्की म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेने(म्हणजे या बुश्-चेनिच्या सरकारने) सर्व लाज लज्जा सोडुन.. जॉर्जियाचे प्रेसिडंट.. एडवर्ड शेव्हर्नाट्झे.. यांचा कसा काटा काढला व त्यांना सत्तेवरुन पद्च्युत करुन.. अमेरिकेत शिकलेल्या.. अमेरिकाधार्जिण्या.. साकश्विली.. या.. कठपुतळी बाहुल्याला.. जॉर्जियाच्या... अध्यक्षपदावर कसे आणले. हे जगजाहीर आहे. तसे करण्यामागे बुश चेनी काँडेलिसा राइस मंडळींचे खरे कारण हे होते की शेव्हर्नाट्झे यांचे धोरण खुपच बोटचेपी व रशियन धार्जिणे होते.. त्यांनी मॉस्कोला जॉर्जियामधे चार मिलिटरी तळ ठेउ दिले.. त्याने बुश चेनी यांच्या कंपुचा नुसता तिळपापड झाला.. कारण त्यांचे बाकु-तिब्लिसी- सिहान या पाइपलाइनच्या प्रकल्पाचे स्वप्न.. त्यामुळे अपुरे राहणार होते.. जोपर्यंत रशियाचा तळ जॉर्जियामधे आहे तोपर्यंत... अमेरिकेच्या शेव्हरॉन व ब्रिटनच्या ब्रिटिश पेट्रोलिअम व डचच्या शेल कंपनींच्या... या पाइप प्रकल्पाला मोकळे रान मिळाले नसते... म्हणुन मग जॉर्जियामधुन शेव्हरनाट्झे यांची.. अमेरिकेच्या आशिर्वादाने... उचलबांगडी झाली व साकश्विली यांचे.. नावापुरते लोकशाही असलेले सरकार सत्तेवर आले.... साकश्विली सत्तेवर आल्यावर अमेरिका व युरोपियन युनिअनने आपले स्वप्न फक्त बाकु-तिब्लिसी-सिहान या पाइपलाइनपुरतेच मर्यादित न ठेवता... कझाकिस्तान व टर्कमेनिस्तानमधील तेलही.. कॅस्पिअन समुद्राला वळसा घालुन.. किंवा कॅस्पिअन समुद्रातुन पाइपलाइन आडवी टाकुन.. आझरबाजानमधील बाकुपर्यंत आणुन.. ते तेल व नॅचरल गॅस मग बाकु-तिब्लिसी-सिहान पाइपलाइनमार्गे.. युरोपमधे आणायचे.. असाही प्लान करुन ठेवला आहे...

आणि चिन्मय कहर म्हणजे... डेमॉक्रेसीचा पुळका असलेल्या या बुश चेनी सरकारने अझरबाजानमधील डि़क्टेटरशिपकडे.. सोयिस्कर रित्या कानाडोळा केला आहे.. कारण तो हुकुमशहा पुर्णपणे अमेरिका धार्जिणा आहे.. व त्याचा बाकु-तिब्लिसी-सिहान पाइपलाइनला पुर्ण पाठिंबा आहे व आझरबाजानचे तेल तो अमेरिकेला विकायला एका पायावर तयार आहे...त्यामुळे त्याची डि़क्टेटरगिरी...पुर्णपणे माफ!:) एवढा मोठा तेलसाठा असुनही आझरबाजानमधे एकदम दारिद्र्य आहे.. कारण? सगळा तेलाचा पैसा त्या हुकुमशहाच्या तिजोरित जातो.... आहे की नाही अमेरिकेच्या निर्लज्जपणाचा कळस?

असो... पण हे सगळे होत असताना रशियासुद्धा काही गप्प बसले नव्हते.. मग त्यांनीही आपला एक पाय जॉर्जियामधे असावा म्हणुन उत्तर ओसेशियामधील रशियन लोकांना फितुर करण्याचे काम त्यांनी चालुच ठेवले... त्या भागातील दोन्ही पक्षाचे लोक.. जॉर्जियन.. व रशियन.. मधल्या मधे असे भरडले जात आहेत... आतापर्यंत अमेरिकेला व युरोपिअन युनिअनला वाटत होते की रशिया मुग गिळुन गप्प बसेल .. पण आता त्यांनीही आक्रमक पवित्रा घेउन.. अलबत.... ओसेशियाच्या नावाखाली... अमेरिकेला व युरोपियन युनिअनला दाखवुन दिले की ते अमेरिकेला व युरोपियन युनिअनला असे त्यांचे कॉकेशसमधील बॅकयार्ड...फुकट आंदण म्हणुन... मनमानी करायला देणार नाहीत...

चिन्मय तर आता तुला कळेल की जॉर्जिया का इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकत घेत आहे( खर म्हणजे अस म्हटले पाहीजे की का अमेरिका जॉर्जियाला एवढा मोठा शस्त्रपुरवठा करत आहे)...आणि व्लादिमिर पुतिनला हा साकश्विलीरुपी अमेरिकन कठपुतळी बाहुला का आवडत नाही ते.. व ते दोघेही अशी परस्परविरोधी विधाने का करत आहेत ते...व एकंदरितच त्या भुभागातील राजकिय पवित्र्यांचा विरोधाभास!

झक्की ,तुमच बरोबर आहे.
मुकुंदना पण अनुमोदन.अमेरीकेच्या तेलाच्या मागणिचे तुम्ही व्यवस्थित वर्णन केले आहे त्याबद्दल धन्यवाद्.अमेरीकेला कॉकॅशिअस मधुन तेल हवे आहे यात वाद नाही.मुळात रशियाने दक्षिण आसेतियातील लोकांना पासपोर्ट देउन चांगलाच डाव आखला. त्यामुळे यावेळी जेंव्हा आसेतियावर जॉर्जियाने हल्ला केला तेंव्हा रशियाला मधे पडता आले कार्ण त्यांचे नागरीक मारले जात होते म्हणुन.
काहीकाही लोकांच म्हणन आहे की साकश्विलीनी चांगलाच डाव टाकला होता. रशियाने जर प्रतिहल्ला केला नसता तर आसेतियन्स मरत होते त्यामुळे आसेतियन्सनी परत रशियात जायला पाठींबा दिला नसता आणि रशियानी हल्ला केला आणि साखश्विलीनी आंतरराष्ट्रिय मिडीयाला हाताशी धरुन आता रशियाची ओळख ऍग्रेसर( हल्लेखोर?) झालीय. त्यामुळे रशियाने आता एक बाजु घेतली आहे.आता रशिया जॉर्जिया आणि आसेतियन्सच्या भांडणात मध्यस्त म्हणुन येउ शकत नाही.