साद देती हिमशिखरे. भाग -१- पुणे ते फागू.

Submitted by शोभा१ on 10 November, 2011 - 02:27

किती सांगु मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. "
अरे घाबरू नका. मला वेड लागल नाही की हर्षवायूही झालेला नाही. पण काय झालं माहिती आहे का? मी १७ वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिल होत. पण एकंदर परिस्थिती पहाता मी माझ्या मनाला समजावलं, की आपल हे स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि माझ मन पण किती समजुतदार पहा , त्याने पटकन मान्य केल. (याच श्रेय, अर्थात माझ्या आई-वडिलांच्या संस्कराना). मी ते स्वप्न विसरून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी (स्वप्नाशी) संबधित काही ऐकल, पाहिल, तरी मला काही वाटेनास झाल. आणि .....................................................................
आणि अचानक ऑगस्ट महिन्याच्या दुसरया आठवड्यात माझ्या स्वप्नाला जाग आली. त्याच अस झालं, मी एका गुरुवारी संध्याकाळी, घरी गेल्यावर, मला एक आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे, "आपण, सिमला-कुलु-मनालिला जायच, असा विचार चालु आहे. " आणि अस्मादिकांच मन पाखरू पाखरू झाल. नंतर विचार-विनिमय करण्यात दोन दिवस गेले. आणि आम्ही रविवारी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमधे पोहोचालो. आम्ही ज्यांच्या बरोबर(आमचे कुटुंब मित्र) जाणार होतो, त्यांच रिझर्वेशन आधीच झाल होत.(आम्ही त्यांच्यानंतर १ महिन्याने रिझर्वेशन करत होतो) . त्यामुळे आम्ही तिकिटांची चौकशी केली, आणि माझ्या चेहरयावर १२ वाजले. कारणच तस होत. "८६ वेटिंग आहे. तिकिट कन्फर्म होणार नाही. " हे ऐकल्यावर दुसर काय होणार? पण 'आकुमि' याना फोन केल्यावर, "तुम्ही तिकिट काढा. आपण एडजेस्ट करू." हे ऐकून पुन्हा जरा हुरूप आला. परत सर्व चौकशी करताना, "तुम्ही सिमल्याला रहाणार नाही. आणि ओक्टोबरमध्ये तिकडे बर्फवृष्टि होत नाही. नोव्हेंबरमधे होते." हे ऐकून 'मग कशाला जायच तिकडे' असा विचार माझ्या मनात बंड करून ऊठला. पण 'आपल्यामुळे बाकिच्यांचा विरस नको. नशिबात असेल तर आपण गेल्यावर बर्फवृष्टि होइल'. अशी मनाची समजूत घातली. (किती ते माझं समंजस मन :फिदी Happy शेवटी आम्ही तिकीट,हॉटेल वगैरे बुक करून घरी आलो. आणि सर्वांच्या मनात 'लड्डू फूटने लगे'.
मग आपल्याला काय काय तयारी करावी लागेल याची चर्चा सुरु झाली. पण अजुन २ महिने आहेत. म्हणून सगळे निवांत झाले.
१५ दिवस भुर्र्रकन उडून गेले. आणि मग सुरु झाली खरी परिक्षा. दिनांक ४ सप्टेंबरला मला ताप आला, आणि तो दिवसंदिवस वाढतच जात होता. मी गादीवर पडल्या पडल्या, 'माझ तिकिट रद्द करा', अस सांगण्याच्या विचारात होते. पण गप्प बसले. 'जे जे होईल, ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान'. तापाने १५ दिवस मला साथ दिली. नंतर कंटाळून अशक्तपणाला खो देऊन तो गेला. (ज्यानी मला फोन, समस करून माझी चौकशी केली त्याना, आणि ज्यानी मनातल्या मनात मला मनापासून शुभेच्छा दिल्या, त्याना मनातल्या मनात, Wink आपल मनापासून धन्यवाद Proud )आणि त्यातच.....
दिनाक २२ सप्टेंबर, वहिनीचे वडिल आजारी झाले. ते तर इतके सीरियस होते की आम्ही जाणे, रद्द करण्याचे ठरविले. सगळ घर टेंशनमध्ये होत. घर, ऑफिस, आणि हॉस्पिटल, अशी तारेवरची कसरत चालु होती. ते ३ आठवडे, सीरियसच होते. नंतर २-३ दिवस ते बरे होते. जरा आशेचा किरण दिसला. आणि ते परत सीरियस झाले. आणि आम्ही जाण रद्दच केल. परत २-३ दिवसात ते बरे झाले आणि त्याना घरी सोडण्यात आले. आणि सगळ्यांच्या आग्रहामुळे, उरलेल्या २ दिवसात, आम्ही ५ माणसांची, १० दिवसांच्या प्रवासाची, तयारी करून ट्रिपला गेलो.
दिनांक २१.१०.११ सकाळी ८ वाजता, आम्ही पुणे स्टेशनवर, 'संपर्कक्रांति' मधे बसलो. ५ तिकिटे कन्फर्म आणि आम्ही १० जण निघालो होतो. दिवस मस्त गेला. चहा, नाश्ता, पत्ते खेळणं, अन्ताक्षरी, जेवण, यात दिवस कधी संपला, कळलच नाही. आणि सगळ्यांच्या मनात, एकच यक्ष प्रश्न उभा राहिला. ५ जणानी झोपायच कुठे? पण 'आकुमी' नी एक मिनिटात हा प्रश्न सोडवला. पटापट सगळ सामान (एकूण १८ डाग) आवरून, '५ बर्थ वर १० जणानी झोपायच,' (एका बर्थवर २ माणस?) अस जाहिर केल. त्यांचे आई-वडिल (सीसी.) पण आमच्या बरोबर होते. पण कुणीही, जराही न चिडता, एकमेकाना जगा करून दिली. अर्थात एका बर्थवर २ माणस झोपण सहज शक्य नव्हत. त्यामुळे कुणाचीच नीट झोप झाली नाही. मी तर बहुतेक वेळ बसूनच झोप काढली. पण सर्वात आश्चर्य मला त्या ५ जणांच वाटल. त्यानी जराही कुरकुर केली नाही. आणि सकाळी उठाल्यावरही नाखुशी दर्शविली नाही. त्याना शतश: धन्यवाद.
दिनांक २२.१०.११, आम्ही सुप्रभाती दिल्लीत प्रवेश केला आणि सूर्यनारायणाने आमचे स्वागत केले. मी कॅमेरा घेउन तयारच होते.
१. हा आहे दिल्लीतील सूर्योदय.

२. आणि हा दिल्लीतील भास्करोदय

३. हे तुरे कसले? हे आम्हाला पडलेल कोडं, दिनेशदा नक्की सोडवतील. Wink

४.
५.

६.

७. ही मस्त शेती.

८. आणि हे सुगरणीचे खोपे. मला बहिणाबाई आठवल्या.

९. जाता जाता काढलेला हा एक फ़ोटो.

आम्ही दिल्लीला १०.३० वाजता पोहोचलो. आमच्या गाड्या, आम्ही जाण्यापुर्वीच हजर
होत्या. (२ तवेरा, विकास व रणधीर या ड्रायव्हरसहित)
१०. हा आहे दिल्लीचा लालमहाल.

आता सगळे निद्रादेवीला शरण आले होते. चहा नाश्ता, रेल्वेत झाला होता, पण
'वीर' ना त्यांच्या पोटाची, आणि ठरलेल्या हॉटेलवाल्यांची काळजी होती. म्हणून
आम्ही चहा घेतला. अशाच एका हॉटेलमध्ये दुपारी जेवून आम्ही मार्गस्त झालो.
११. हा असाच एक फ़ोटो.

हे सूर्यास्ताच्या आधीचे काही फ़ोटो.
१२.

१३.

१४. हे आहे पिंजोर गार्डन. संध्याकाळी ५.५०ला आम्ही येथे पोहोचलो.
From
१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

२५.

२६.

२७.

२८.

२९.

हे सर्व पाहून सगळ्यांचा प्रवासाचा थकवा पार पळून गेला. आणि नव्या उत्साहाने
आम्ही पुढच्या प्रवासाला सज्ज झालो.
पहिला मुक्काम, फागू येथे होता. तेथे पोचायला रात्र झाली. 'थंडीने शब्द गोठणे' म्हणजे काय? याचा प्रत्यय तिथे गेल्यावर प्रत्येकाने घेतला. सगळ्यांचे दात कड्कड वाजत होते. बोललेले नीट समजतच नव्हते. एकमेकांची ही अवस्था पाहून, त्याही स्थितीत हसू येत होते. धावत-पळतच खोली गाठली, आणि प्रथम 'रुमहिटर' चालू केले. तेव्हा कुठे सर्वाना हुश्श झाल. Proud
दुसरया दिवशी, लवकर उठून प्रथम, सृष्टीसौंदर्य पाहिले.
३१. हा आहे फागूचा सुर्योदय.

३२.

३३.

३४.

३५. सूर्यकिरणे, वृक्षांची भेट घेऊ लागली.

३६. आम्ही ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला ते हेच हॉटेल.

भेटूच दुसर्‍या भागात Happy

गुलमोहर: 

प्रकाशचित्रे चागंली आहेत आणि वर्णन ही. Happy
पण काही फोटो तुम्ही चालत्या गाडीतून वगैरे काढलेले दिसतायत त्यामुळे ते हललेले आलेत, वरच्या फोटोतून ते काढून टाकलेत तर आणखी छान वाटतील. कारण त्या फोटोंमुळे इतर चांगले फोटोही नीट कळत नाहीत.
धन्यवाद !

शोभा छान वर्णन. वेताळ ने सांगितल्याप्रमाणे काही फोटो कमी करता आले तर पहा.
दुसर्‍या भागाची वाट बघतोय.

मस्त लिहलंयस शुभुतै..... फोटोही छान आलेत...मला १६ नंतरचे प्रचि आवडले Happy

काही फोटो तुम्ही चालत्या गाडीतून वगैरे काढलेले दिसतायत त्यामुळे ते हललेले आलेत, वरच्या फोटोतून ते काढून टाकलेत तर आणखी छान वाटतील. >> हो शोभातै मन मारुन काढुन टाक ते...
संमजंस आहेस की नाही? Wink

चांगला प्रयत्न शोभा Happy

काही फोटो तुम्ही चालत्या गाडीतून वगैरे काढलेले दिसतायत त्यामुळे ते हललेले आलेत, वरच्या फोटोतून ते काढून टाकलेत तर आणखी छान वाटतील. >> हो शोभातै मन मारुन काढुन टाक ते...>>>>अगदी अगदी Happy

काय शोभातै - एकदम हिमालयाकडेच कूच -वा वा वा वा - फारच छान संधी मिळाली - आता यापुढील वर्णन जरा सविस्तर येउ द्या....

शोभा वर्णन छान.
ते सुर्यास्ताचे/ सुर्योदयाचे जास्तीचे फोटो उडवून टाक.

(हा बीबी थोडा थंड पडला की मग ते फोटो उडव, म्हणजे बीबी वर येईल आणि अजून जास्तीचे प्रतिसाद मिळती. :फिदी:)

शोभे,,,,, Angry
मार खाणारेस तु आता... अजिब्बात पत्ता लागु दिला नाहीस कुणाला!!!!
अन म्हणे सर्प्राईज द्याय्चं होतं...

बाकी फोटो छान गं बयो...डायरेक्ट हिमालयात भरारी घेतलीस Proud
लईच एन्जॉय केलेलं दिस्तय. Happy

धमाल फोटो. Happy
डायरेक्ट हिमालयात???? आयला राव कळवायचं तरी होतं.... बघून घेऊ..... Angry

डायरेक्ट हिमालयात???? आयला राव कळवायचं तरी होतं.... बघून घेऊ..... >>>>स्मिहा, ’कास’चा बदला... Proud
गिरी, गुरुपौर्णिमा कधी आहे बघून ठेव रे. Wink

मार्को पोलो, गिरी, अनिल, मुकु, साधना, धन्यवाद.
आता पुढचे फोटो येऊ द्या....>>>साधने तेच काम सुरू आहे. Happy

शोभा, सबकुछ लई लई भारी ... वर्णन आणि फोटो सुद्धा..
मस्तच... पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. लवकर टाक.:)

छान Happy

प्रज्ञा, प्रिति, रोहित, धन्यवाद.
१. प्रज्ञा, :पुढच्या भाग लवकर येऊ देत.
२. प्रिति, :पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. लवकर टाक.>>>>>अग, मी म्हणजे काय जिप्सी आहे का? धपाधप ८-१० भाग टाकायला.

............. ^
कुठे तो?... ^
............. ^
............. ^

कुठे मी ?.. \/
........... \/
........... \/
........... \/
स्वगतः त्याला कुठे ऑफिसात दुसरं काम असत? ह्याच कामाचा पगार मिळतोय त्याला. Proud
(त्याचा साहेब, त्याच्याकडे भावी जावई, म्हणुनच बघतोय बहुतेक. :स्मित:)
जिप्स्या Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 घे रे. Wink

शोभे Proud
मी म्हणजे काय जिप्सी आहे का? धपाधप ८-१० भाग टाकायला. >>>>>वेळ मिळेल तसे पटापट फोटो टाकत जायचे, नाहीतर कंटाळा येतो (स्वत:लाही ;-)). हेमावैम.

कुठे तो?... ^>>>>>>>"मुंबईत" Proud
कुठे मी ?.. \/>>>>>>"पुण्यात" Proud

स्वगतः त्याला कुठे ऑफिसात दुसरं काम असत? ह्याच कामाचा पगार मिळतोय त्याला. >>>>>>हापिसात मायबोली अ‍ॅक्सेस नाही :भोकाड पसरणारा बाहुला", पण रीमोट डेस्कटॉपने कधीकधी अ‍ॅक्सेस करतो. Wink इच्छा तेथे मार्ग Proud

त्याचा साहेब, त्याच्याकडे भावी जावई, म्हणुनच बघतोय बहुतेक. >>>>>नssकोss दोन्ही ठिकाणचे टॉर्चरींग सहन नाही होणार Proud