उपाय सुचवा

Submitted by मया on 9 November, 2011 - 22:58

माझ्या desktop मध्ये सध्या programme दिसत न्हवता म्हणून मी format मारण्याचा निर्णय घेतला पण तो होत नाही आहे खाली दिलेला मजकूर येतोय.मी बूट device CD - रोम select केला आहे. cd सुद्धा bootable आहे तरी हा मजकूर येतोय उपाय सुचवा.
Reboot & select proper boot device or insert boot media in selected boot device & press ok key.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

CDROM चालतोय का ते एकदा तपासुन पहा. किंवा कधी कधी CD Writeकरताना higher speed ला burn केलेली असते आणि CD ROM हा कमी स्पीडचा असल्यास ती चालणार नाही.

एका एकी माझ्या संगणकातील IE 7 मधील फेवरिट्स अदृष्य झाले, तसेच आय ट्यून्स च्या लायब्ररीतील गाणीहि. आता IE-7 चालू करून फेवरिट्स केले तर ते स्टोअर होत नाही - Your local profile is corrupted अस मेसेज येतो. फायरफॉक्सचाहि हाच प्रॉब्लेम.
दोनदा नॉर्टन ३६० रन केला, सर्व काही ठीक असल्याचा रिपोर्ट आला.
नि आता इंटरनेट कमालीच्या बाहेर हSSळूSSS चालतंय.

laptop प्रोब्लेम

काल मी laptop मध्ये Kaspersky Antivirious टाकला (१ year ) पण नंतर संध्याकाळी laptop चालू केला त्यावेळी चुकून मी Security Center बघितलं तिथे virus protection off होत म्हणून मी on करायला गेलो आणि मी क्लीच्क केल. How does antivirus software help protect my computer आणि online Internet security २०१२. हे software basic दिसत मी आता विन्डोव्स सेचुरीत्य centre मध्ये virus protection on किवा off करायला गेलो कि तेच चालू आणि भरपूर virus detect होतात. आणि आता माझा इंटरनेट Explorer पण चालू होत नाही माझ्या कडे honesty वायर through net आहे ते पण चालू होत नाही. काय करू................

भ्रमर, धन्यवाद. खटपट केल्यावर तो प्रोब्लेम सुटला. आता अत्यंत हळू चालतो पण चालतो. तशी मला कुठे कसली घाइ आहे? पण बर्‍याच जणांनी साम्गितले मॅक घ्या.
म्हणून आता मॅकबद्दल प्रश्न:-
समजा स्वस्तातला स्वस्त मॅक घेतला नि अ‍ॅपलचे ऑफिस (माय्क्रोसॉफ्ट ऑफिस मॅकवर), नि दोन चार बाकीच्या अ‍ॅक्सेसरीज घेतल्यास काही फायदा आहे का? म्हणजे जवळपास दुप्पट पैसे द्यावे लागतात त्या मानाने.

काका, नक्की काय करुन प्रॉब्लेम सुटला???
मॅक हा साधारणपणे Graphics मधे किंवा Sound Engineering मधे काम करणारे घेतात, कारण त्याचा वेग. नेहमीच्या कामासाठी मॅक घेऊन तो underutilize केल्यासारखं होईल असं माझं मत आहे.

मया... एका वेळेस दोन दोन सिक्युरीटीचे प्रोग्रॅम्स चालू असतील तर घोळ होऊ शकतो... दोन्ही बंद करा आणि मग त्या पैकी एकच कोणतातरी वापरुन बघा.

नक्की काय करुन प्रॉब्लेम सुटला???
माझा पुतण्या हुषार आहे, पण तो भेटणे कठीण. एकदा तो योगायोगाने भेटला नि त्याला वेळहि होता. त्याने माझे सगळे रडगाणे ऐकून घेतले नि मग जरा विचार करून म्हणाला की नॉर्टन ३६० च काय कुठलेच अ‍ॅंटि व्हायरस सगळेच्या सगळे व्हायरस लगेचच्या लगेच पकडू शक्त नाहीत. तेंव्हा आता पुढे काय करायचे, तर माझी लोकल प्रोफाईल फाइल करप्ट झाली आहे म्हणून मी सेफ मोड मधे जाऊन अ‍ॅडमिन म्हणून लॉग इन केले, नि एक नवीन युजर बनवला. तेंव्हापासून मी तो युजर आय डी वापरून (नि देवाचे नाव घेऊन) काँप्युटर चालू करतो, आता वर लिहील्याप्रमाणे अत्यंत हळू चालतो, नि मधे मधे अडून बसतो. मग चक्क अनप्लग करून मग पाच सेकंदाने परत चालू! उगाच मायबोलीवर काही काही लिहीत बसण्याला आपोआपच आळा बसला!!
तेंव्हा आता नवीन घेऊन नये असे सौ. चे म्हणणे आहे!

मॅक मधे व्हायरस येत नाहीत म्हणून त्याचा विचार करत होतो, पण ग्राफिक्स किंवा साउंड इंजिनिअरिंग यातले काही च करत नाही मी! मायबोलीवर वेडेवाकडे लिहायला काय करायचे आहे एव्हढे महाग मशीन!

कुठे हजार दोन हजार डॉलर्स सापडले तर घेईन पुनः काँप्युटर.
कुणि देतील का? नाही दिलेत तरी वाईट वाटून घेऊ नका. मी आपले सहज विचारले. भारतातले लोक प्रचंड श्रीमंत! असतीलहि त्यांच्याजवळ मला द्यायला!

Happy Light 1

मॅकवर व्हायरस येत नाहीत हा गैरसमज आहे. मॅकवर पण व्हायरस येवू शकतात, पण दुर्मिळ.
लिनक्स वापरा. No Virus, only Peace, that too for Free.

माझा desktop चालू केल्यावर Power Saver Mode वर जातो हा प्रोब्लेम solve करायला काय करू........

PC मध्येच PC चे configuration कसे बघायचे??? डेक्स्टॉप काढायचा आहे. तर configuration विसरलेय. कस मिळेल?? my computer च्या properties-general मध्ये फक्त RAM दिसतय बाकी कुठे मिळेल?? आणि ५ वर्षापुर्वीच्या डेकस्टॉपची आता रिसेल वॅल्यु किती मिळेल??

माझ्या internet explorer मध्ये मायबोली किंवा मराठी ओपन होत नाही आहे बॉक्स येतात? काय करु

हल्ली भ्रमर ईथे फिरकत नाही वाटतं.
साक्षी.. my computer च्या properties-general मध्ये प्रोसेसर कुठला आणि स्पीड पण कळतो. रॅम सोबत ती माहिती असते. त्याशिवाय All programs>Accessories>System Tools>System Information मध्ये पहा.
रिसेल वॅल्यु config कळल्याशिवाय आणि चालू स्थितित आहे की नाही हे कळल्याशिवाय सांगता येत नाही. जरा जरी बिघडला असेल तर तो स्क्रॅप म्हणूनच जातो. मी माझा तसाच काढला गेल्या वर्षी Sad

हसरी.. IE मध्ये View>Encoding>Unicode सिलेक्ट करुन बघा.

धन्यवाद नीलू, System Information मध्ये बघते. अग एकदम व्यवस्थित आहे पीसी , काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणुनच काही प्रॉब्लेम्स यायच्या आत काढायचा आहे. Happy आणि लॅपटॉपही आहेच. उगाच २-२ कॉ. कशाला म्हणुन.

साक्षीमी, bellarc advisor या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही सगळी माहिती मिळवु शकता. किंवा http://www.cpuid.com/softwares/cpu-z.html येथुन cpu-z मिळवुन ते वापरुनही करु शकता.

हसरी, नीलू सांगते त्यानुसार करुन पहा.

ओके भ्रमर, धन्स. ट्राय करते.
पाच वर्षांपूर्वीचा पिसी असेल तर ३०००-३५०० मिळावेत.>>> बस एवढेच Sad घेताना आम्ही ३०००० ला घेतलेला, मला वाटला मिनिमम १०००० तरी मिळतील Sad

हसरी.. IE मध्ये View>Encoding>Unicode सिलेक्ट करुन बघा.>>>>>>>>>>>>>>>> सिलेक्टच आहे तरीही नाही येत आहे.

>>>मिनिमम १००००>> साक्षी संगणकाना (जुन्या ) ईतके सुगीचे दिवस आले नाहीयत हल्ली नवीन पीसी १२ पासून मिळतो तर १० ला जुना कोण घेणार. आणि संगणकाच्या बाबतीत डिप्रिशिएशन वॅल्यू कायच्या काय असते आपण मनावर दगड ठेवून ऐकायची फक्त. रच्याकने तुझ्या पीसीचे कॉनफिग काय आहे ते तरी सांग.

हसरी कदाचित तुमच्या पीसी मध्ये युनिकोड फॉण्ट ईन्स्टॉल झाले नसतील. ईथे बघा अधिक माहिती मिळेल.

>>पाच वर्षांपूर्वीचा पिसी असेल तर ३०००-३५०० मिळावेत.
२००० मिळालए तरी भरपुर झाले.>> तेव्हढे मिळू शकतात जर तुम्ही डिलरला न विकता डायरेक्ट विकलात तर.. olx, sulekha ईथे मोफत जाहिरात देऊन.

माझ्या डेस्कटॉप मधे सारख कॅलक्यूलेटर सुरु होत. बंद केले नाही तर दहा मिनीटात पाच सहा कॅलक्यूलेटरच्या विंडो नक्की. वैताग येतो. काय झाल असाव? अविरा अ‍ॅण्टीव्हायरस आहे पण स्कॅन मधे काही विशेष सापडत नाही.

श्रीकांत, कीबोर्ड उलटा केउन त्यावर एक जोराची थापट मारा आणी पहा. काही key combinations मुळे असं होउ शकतं.

कोणाकडे जुना computer विकायचा असल्यास कृपया सांगा आणि त्याच बरोबर थोडीशी त्याची माहिती हि सांगा. लगेच पैसे दिले जातील.

विंडोज एक्सपी पीसी बुट होताना पुन्हा पहिल्या स्क्रीन ला येतो, जिथे सेफ मोड्,लास्ट क....्ए ऑप्शन येतात, फॉर्मट करावाच लागेल ?

माझ्या एक्सपी असलेल्या डेस्कटॉपला असेच होत होते. Sad
फॉर्मट करून परत एक्सपी टाकल्यावर सुतासारखा सरळ आला. Happy

मया, Intel Pentium 2.66/ 865 Chipset Mobo/1 GB /80 GB/17" LCD आहे. हवा असल्यास संपर्कातुन मेल करा.

अनिल७६, सेफ मोड मधे बुट होतो का ते पहा.झाल्यास start > run > cmd > enter > chkdsk c: /r ही कमांड द्या. जर एखादी XP Live Cd or Linus live CD असेल तर त्याने बुट करुनChek Disk करुन पहा.

भ्रमर,
धन्यवाद !

एल्सीडी नविन आहे, पण सीपीयु खुप जुना आहे, त्याला खर्च करत बसण्यापेक्षा नविन घेण्याचा विचार आहे,
मेमरी २-४ जीबी,३००-४०० जीबी हार्डडिस्क्,ईंन्टेल आय ३ कितीपर्यंत बसेल ?

अनिल७६

Intel Core i-3 2100 (3.1 GHz Processor, 3 MB Cache) ~ Rs. 19000 (VAT PAID)
Gigabyte H61 based motherboard
2B DDR3 1066 MHz RAM
Western Digital 500 GB SATA Hard Disk
ATX Cabinet with Power Supply

Windows 7 टाकणार असाल तर 4 GB RAM टाका. (Win7 64-bit) Rs. 500 additional.

मि माझ्या संगणाकावर काही केल तर आय.पी वरुन कळतं. मला तो लॉक करायचा आहे कसे करायचे प्लिज कोणी सांगाल का?

.

मि इंटरनेट वर मेल किंवा कोणत्या साइट ओपन केल्या आहेत हे आय पी अ‍ॅड्रेस वरुन कळतं. हे असं होत का? माझ्या दादाला

माझ्या कॉम्पुटर मध्ये copy करून आणलेले game चालू होत नाहीत थोडस दिसत आणि निघून जात.
तोच मी दुसऱ्या कॉम्पुटर मध्ये game टाकला तर दिसतो.
कुठल software हव का ते दिसण्यासाठी किंवा काही जण सांगतात कि kaspersky antivirus आहे म्हणून तस होत.

काय केल्याने game दिसू लागतील....................

@ भ्रमर अरे हे ३ D असावेत , क्रिकेट, WWE , शूटर games असेच आहेत. आणि तुला तो कॉम्पुटर विकायचा आहे ना तो कितीला देणार.

मी ज्या वेळी system चालू करतो त्या वेळी खालील Error येतो उपाय सुचवा.
पाहिलं खाली दिलाला error येतो.
Shift + F 10

नंतर DHCP ..... असे दोन ते मिनिटे राहत.

नंतर शेवटी खाली दिलेला error येतो आणि नंतर system चालू होते.

PXE - EAQ - Network Boot Canceled by keystroke
PXE - MQF- Exiting PXE ROM

माझी अशी इच्छा आहे system चालू केल्यावर direct चालू व्हावा.

@ मया : LAN Boot Option / PXE Boot enable आहे. Bios Setting >>> Boot Options मधे बघ. तुझा नंबर मला संपर्कातून कळव

एका कंपनीच इमेल account rediffmail मध्ये आहे ते पूर्ण कंपनी वापर करते. परंतु काही जण direct rediffmail या website वर लॉगीन करून करतात तर काही जणांनी Outlook express मध्ये rediffmail Account configure करून घेतलं आहे पण प्रोब्लेम असा होतो आहे कि outlook express मधली माणस जेव्हा एकधा मैल वाचून झाला कि त्यांच्या personal फोल्डर मध्ये टाकतात त्यावेळी rediffmail direct use करणाऱ्यांना तो मैल दिसत नाही उपाय सुचवा.

कंपनी बरीच un professional दिसते आहे. असो. Outlook Express मध्ये Tools >>>> Accounts >>> Properties >> Advancec ....Leave Message on sever ला Check mark देणे.

या कंपनीला Mail Server विकण्याचा पर्याय तुझ्याकडे आहे. Happy

भ्रमर मित्रा हे तर मी पण त्यांना सांगितलं पण तिथे बसते ती माझी मैत्रीण बोलते कि आम्ही करतो नंतर मधेच कधी ते आपोआप निघून जातो तो मार्क. शेवटी म्हणून मी इथे कोणाला माहित आहे का ते बघत होतो. काही दुसरा उपाय ते तिथे राहातच नाही आहे टिक

कधी ते आपोआप निघून जातो तो मार्क >> असं आपोआप नाही होत रे!! माझ्यामते यावर उपाय म्हणजे gmail मधे configure करुन दे.

डेल लॅपटॉपमधुन सीडी बाहेर येत नाहीये, काय करु? सगळे eject चे ऑप्शन्स ट्राय केले, रन होतेय पण इजेक्ट होत नाहीय.

युएसबी मधील फाईल्स ओपन होत नाहीयेत. फार जुना नाहीये युएसबी, २-३ महिन्यांपुर्वीच डेटा ट्रान्स्फर केलेला. करप्ट होईल या भीतीनेच मेलमध्ये सेव करायला घेतला तर फोल्डरमध्ये फाईल्स दिसतायत, पण इमेजेस्/वीडीओज ओपन करायला गेलं तर करप्टेड दाखवातायत. काय करता येतील. खुप महत्वाचे फोटोज, वीडीओज आणी इतर डेटा आहे, तो इतरत्र पुन्हा मिळण शक्य नाहीये. डेटा कसा रिकव्हर होईल, काही सुचवा? प्लीजच...

@ साक्षीमी
एक काम कर cd laptop च्या आत मध्ये बाहेर काढायला जे बटन असत ना त्याच्या बाजूला एक बारीक छिद्र असेल त्यात ना U पिन, सुई (MIGHTY PAPERCLIP ) अथवा बारीक जे त्या छिद्रात जाऊ शकेल ती त्या छिद्रात टाक आणि दोन्ही एकाच वेळी प्रेस कर जेणे तो drive open होईल.
नाही तर तुला आजून एक उपाय सांगतो laptop open करायला सुधा सोपा असतो.

@ पाणिनी
पहिला तो usb drive स्कॅन करून घे पूर्ण पणे तुझ्या अथवा दुसऱ्या कुठल्याही system मध्ये काही error येतो का बघ तोच usb चे फोल्डर दुसरीकडे disatat का बघ

मया, cd laptop च्या आत मध्ये बाहेर काढायला जे बटन >>> हे कुठे असतं? सीडी ड्राईव्ह च्या बाजुला एकही बटन नाहीय, छिद्र दिसलं पण बटन कुठेय??
सॉरी फोर लेट रीप्ल्य? सभासदत्व घेतलेच नव्हते आणि प्ततिसादाची वाट पाहत होते?? आता शोधुन काढला बीबी तेव्हा दिसला प्रतिसाद Proud

लेटेस्ट अ‍ॅन्टीवायरस कोणता चांगला आहे?

Pages