Dangling Pointer

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझं मन एक dangling pointer
ह्र्दयातल्या रिकाम्या जागेकडे डोळे लावून बसलेलं
ती जागा रिकामी आहे हे मान्य न करणारं...
एक dangling pointer!
location free झालंय...
पण memory free नाही झाली अजून
मी आपली उगाचच मनाची समजूत घालते
आणि memory reallocation ची वाट पाहते
मलाही माहीत्ये
जेव्हा त्या location ला असलेल्या memory वर
दुसर्‍या कोणाचा data लिहायला जाईन मी
तेव्हा येईल एक जोरदार error!
आणि मग न सापडणारे bugs आयुष्यभर!
memory बरोबर सगळ्या भावनाही होतील corrupt
आणि मग प्रत्येक टप्प्यावर येतील segmentation faults...
किंवा system instabilities!

त्या वेड्या dangling pointer ला हे नाही समजत
की आधी point होणारा object जास्त invalid होता...
आणि valid आहे खरंतर त्याचं नसणं!

विषय: 
प्रकार: 

त्या वेड्या dangling pointer ला हे नाही समजत
की आधी point होणारा object जास्त invalid होता...
आणि valid आहे खरंतर त्याचं नसणं!
>>
छान !

शेवटचा पॅरा लॉजीकल आहे. नाहीतर काही लोक वेड्यासारखे (पुनर्जन्माची आशा ठेऊन?) system reinstall मागे लागतात.