शून्याचा शोध नक्की कुणी लावला

Submitted by पुरोगामी on 7 November, 2011 - 03:41

शुन्याचा शोध भारताने लावला असे शाळेत सांगितले होते. पण नुकतेच वाचले की तो शोध अर्बी लोकान्नी लावला होता. भारतात आर्यभटाने शुन्य शोधुन काढले असे वाचून अभिमान वाटला होता. विमानाचा शोधही एका भारतातल्या माणसाने खुप पुर्वी लावला होता. पण ते क्रेडीट राईट ब्रदर्सला गेले. तसेच शुन्याच्या शोधाचे झाले असेल का ? सर्च इंजिनवर सर्च केल्यावर शुन्याचा शोध अरबान्नी, ज्युन्नी व भारतियान्नी लावला अशा लिन्क्स येतात. म्हणजे शून्य नक्की कुणी शोधले होते ? तुम्हाला काय वाटते ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शून्याचा शोध कपिल सिब्बल यांनी लावला कारण संपूर्ण ३जी घोटाळ्यात शून्य रुपयांचा भ्रष्टाचार झाला असे त्यांचे म्हणणे आहे! हा शोध मूळ शून्याच्या शोधापेक्षाही जास्त 'ग्राऊंडब्रेकिंग' आहे.

आगाऊ.... हा हा हा..... ( माझ्या नेटवर्क वर स्मायली येत नाहित)

नरेन्द्र
खरेतर कुठलेच डोक्युमेन्टेशन नसल्याने काहीही प्रुव्ह करणे कठीण आहे. पण सर्वत्र समज आहे की हा शोध भारतात लागला. ह्याचे कारण आपले गणितीक सिध्धन्त हे फार पुर्वी पासुन मान्ड्ले गेले आहेत. अरबी समाज हा फार मागस व टोळ्यान्चा समाज होता. त्यामुळे जरी हा शोध त्यान्नि लावला असेल, तरी ते शाबित करणे कठीण आहे.

भारतात लागला असा उल्लेख एका पर्शियन गणितज्ज्ञाने त्याच्या ए.डी ८२५ मधील पुस्तकात केला आहे.
इथे पहा -- http://library.thinkquest.org/22584/

>> अरबी समाज हा फार मागस व टोळ्यान्चा समाज होता.
पर्शियन/अरेबियन समाजातच बीजगणित उदयास आलं. अल्जिब्रा या शब्दाचे मूळ पर्शियन/अरेबियन आहे असं म्हणतात.

अरबी म्हणजे कोणते? त्या प्रदेशात सगळेच अरब आहेत. अरब हा काही जात किंवा धर्म नाही. मराठवाड्यात जसे सगळे मराठे नाहीत अथवा मराठी बोलणारेही नाहीत तसेच हे. बॅबिलोनियन व इजिप्शियन इ प्राचीन संकृती गणित भूमिती बाबत पुढारलेल्या होत्या...
बर्‍याचदा एखाद्या विषयावर अनेक ठिकाणी संशोधन चालू असते . दळण्वळणाच्या अभावी ते माहीएतही होत नाही. रामन इफेक्ट चाच शोध जर्मनीमद्ये त्यात सुमारास लागला. मात्र रामन यांचे कार्य जगापुढे अधिकृत रीत्या प्रथम सादर झाले म्हणून रामन इफेक्ट. फार कशाला. सात अब्जावे बाळ म्हणून दोन चार मुलांचे अधिकृत क्लेम आहेत त्यात एक भारतात आहे Happy

चिमण ....

मला जे म्हणायचे आहे ते बहुतेक नक्कि स्पष्ट झाले नाही. मी कुठेच म्हन्टले नाही की तो समाज असे शोध लावु शकत न्हवता. पण नन्तर मागस व टोळ्यान्चा समाज झाल्याने डोक्युमेन्टेशन नीट झालेले नाही.

आर्यभट्टाने हा शोध लावला असे मानले जाते कारण गीते मध्ये "शुन्य" ही कल्पना आहे. म्हणजे नथिन्ग. काहिच नसणे. आर्यभट्टाने "शुन्या" ला प्लेस व्हल्यु दिली. थोडक्यात त्याची "जागा दाखवली."

अल्जिब्रा या शब्दाचे मूळ पर्शियन/अरेबियन आहे असं म्हणतात.>>>

हो आहे, पण हा शब्द पहिले वापरला गेला तो ग्रन्थ इ.स. ७८०-८५० ह्या कालवधित. तर "बीजगणीत" हा शब्द आर्यभट्टाने वापरला तो इ.स. ४७६ ते ५५० ह्या कालावधीत.
अल्जिब्रा चे मुळ इजीप्त मध्ये मानतात आणि त्याही पुर्वी तो ब्रम्हगुप्त ह्या भारतिय गणिती ने मान्डल्याचा उल्लेख आहे. ह्याचा कालावधी आहे इ.स. ५९८ ते ६६८. म्हणजेच बीजगणिताचा आद्य जनक म्हणुन आर्यभट्टाचाच उल्लेख करावा लागेल. कालन्तराने मुसल्मान गणितिन्नि त्याची प्रगती केली.

म्हणजेच ह्याचा शोध लागला असेल भारतात पण त्याचा उत्कर्ष मात्र पर्शिया मध्ये झाला असेल.

ही लिन्क वाचा

http://www.answers.com/topic/algebra

म्हणजेच अल्जेब्रा चा अर्थ रीयुनियन. रीयुनियन ओफ अडिशन आणि सब्ट्रक्शन.

आगाउ ला १००% अनुमोदन !!

कपिल सिब्बल ला शून्याच्या शोधा बद्द्ल आणी दिग्वविजय सिगंला शून्याच्या वापराबद्दल ( ०% बुद्धी वापर)

क्रेडीट द्यायलाच पाहीजे.

अलजिब्रा : हा शब्द al-jabr ह्या अरेबिक शब्दावरून आला आहे. al-jabr चा अर्थ मोडलेले पुन्हा जोडणे,

ईब्न मूसा अल-ख्वारिझ्मी जन्मः ७९० म्रुत्यु: ८५० ठिकाणः बघदाद. यालाच Father of Algebra अस
संबोधण्यात येते.
याने लिहीलेल्या ग्रंथा मध्ये Hisab al-jabr w'al-muqabala हा प्रमुख ग्रंथ आहे. ह्या त कोठेही शुन्या बद्दल
लिहिलेले नाही.
याचाच दुसरा ग्रंथ Hindu-Arabic numerals वर बेतलेला होता. मूळ अरेबिक ग्रंथ काळाच्या ओघात नाहीसा
झाला.

आता प्रस्थापित अरेबिक अन्क लिपि बघा. हि लिपि सर्व गल्फ देशात वापरली जाते.

arabic numbers.png

या लिपीत शून्य सद्रुष्य चिन्ह हे ५ ह्या अन्का साठी दिलेले आहे आणी शून्या साठी फक्त एक ठीपका (.)

रेफेर्न्सः http://www.math.tamu.edu/~dallen/history/arab/arab.html

चालू घडामोडीत कशाला हा धागा काढला? धार्मिक विभागात काढला असता तर सगळे संस्कृतीरक्षक आले असते. Proud