समाज अमुचा इतका पुढारलेला आहे
रॉक गायकाच्या डोईला शेला आहे
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
हरकत नाही, "मंदिर" नामक ठेला आहे
पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
कर्जामध्ये गोराही बुडलेला आहे !
जेव्हा मिळते दर्शन नेत्यांचे जाणावे
निवडणुकीचा काळ नजिक आलेला आहे
गाडी माझी रोज थांबते बारसमोरी
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे
वाट पाहतो आहे, त्याने फोन करावा
यमास माझा मिस्ड कॉल गेलेला आहे
दुनिया इतकी कष्टी का हे विचारले मी
पुन्हा 'जितू'चा जन्म म्हणे झालेला आहे
मूळ रचना - 'बेफिकीर !'
विडंबन - ....रसप....
५ नोव्हेंबर २०११
===============================
मूळ रचना -
समाज अमुचा इतका सुधारलेला आहे
वेद गायला आमच्याकडे हेला आहे
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे
ज्यांना पहिले दर्शन मिळते त्या नेत्यांचा
पंढरपुरच्या वाटेवरती ठेला आहे
एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे
उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे
दुनिया इतकी सुखी कशी हे विचारले मी
कुणी म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे
-'बेफिकीर'!
छान अमोल केळकर
छान
अमोल केळकर