सवाई गंधर्व संगीत महोत्सव २०११

Submitted by हर्ट on 4 November, 2011 - 04:34

नमस्कार मित्रांनो, ह्या वेळेसचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव २०११ कधी आहे? तारखा कुठल्या आहेत? वेळा काय आहेत? किती सत्र होणार आहेत? कोण कोण गाणार आहेत? तिकिट कुठे मिळतील आणि त्यांच्या गटानुसार किमती काय आहेत इत्यादी सर्व प्रश्नांची मला नीट सविस्तर उत्तरे हवी आहेत. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, लाजो...
या वर्षीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहियत... खरं तर 'महान व्यक्तीमत्वा'चीच अनुपस्थीती या वर्षी प्रकर्शाने जाणवणार...

http://www.esakal.com/esakal/20111107/5402673148863506124.htm

ही घ्या सवाईची माहिती... अजून पूर्ण डिटेल्स त्यांनीही दिलेली नाहीत... पण यंदा पाच दिवस आहे सवाई.. रविवारचे सकाळचे सत्र नसून मंगळवारी रात्री पासून सुरु होणार आहे...

कमला नेहरू पार्क च्या समोर 'शिरीष ट्रेडर्स' कडे काल फक्त भारतीय बैठकीची तिकिटं उपलब्ध होती.
५ दिवसांचं सिझन तिकीट - रु. ३५०/-